logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!” कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे." "महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला. दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.

8 hrs ago
user_SM Rokhthok News
SM Rokhthok News
Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
8 hrs ago

महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!” कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे." "महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला. दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!” कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे." "महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला. दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.
    1
    महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!”
कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे."
"महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला.
दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.
    user_SM Rokhthok News
    SM Rokhthok News
    Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    1
    दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    46 min ago
  • बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.
    1
    बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..
    1
    🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी
🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी
सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या हलवाई गणेशासमोर डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या  विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण . शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या हलवाई गणेशासमोर डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या  विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भक्तिमय उपक्रमामुळे परिसरात चैतन्यपूर्ण आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले. हलवाई गणेशासमोर विद्यार्थ्यांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण दरवर्षीप्रमाणे यंदाही हलवाई गणेशासमोर विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. डेक्कन स्कुलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी  अथर्वशीर्षाचे महत्त्व व महती विशद करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  यावेळी  मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे उपाध्यक्ष वैभव लांडे, शरद मुसळे,  मंडळाचे माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, अशोक काळे,  प्रेम मुसळे,श्याम परदेशी, अविनाश जाधव, प्रणव मुसळे, बाळासाहेब ढोबळे  ,सिंकदर मन्यार  रमणलाल मुसळे, नारायण काळे, श्याम कोळपकर , शिक्षक सखाराम पुरी, आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष  मयूर काळे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. आभार अशोक काळे यांनी मानले. हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. काही वर्षांपूर्वी मंडळाने विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून वाचलेल्या निधीतून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मंडळाचा उत्सव मंडप खड्डेविरहित ठेवण्याची परंपराही कायम आहे. शहरात महिलांसाठी सामूहिक महिला आरतीचा उपक्रम सर्वप्रथम मंडळाने सुरू केला. पर्यावरण संवर्धनासाठी महिला आरतीच्या वेळी महिलांना तुळशीची तसेच देशी वृक्षांची रोपे भेट देण्यात येतात. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटली जातात. गणेशोत्सव काळात बंदोबस्त व स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिस व नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळ्यातून सन्मान केला जातो. आरोग्य शिबिरे, जनजागृती, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप असे उपक्रमही राबविले जातात. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आतापर्यंत ३५ हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. कोरोनाकाळात गरजू नागरिकांना अन्नधान्य किट, तसेच सांगली व महाड परिसरातील पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत मंडळाने केली. लोकवर्गणीतून हलवाई गणेशाला चांदीचे आभूषणे अर्पण करण्यात आली असून गणेशजयंतीच्या महाप्रसादासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. दरवर्षी पौराणिक, धार्मिक किंवा सामाजिक विषयांवरील देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. विविध धर्मांचे नागरिक मंडळाच्या उपक्रमात सहभागी होतात. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीनेही मंडळाच्या कार्याची दखल घेऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण, मुलांना खाऊवाटप तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची सांगड घालणारे मंडळ म्हणून हलवाई चौक गणेश मित्र मंडळाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
    4
    हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या हलवाई गणेशासमोर डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या  विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण .
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या हलवाई गणेशासमोर डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या  विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भक्तिमय उपक्रमामुळे परिसरात चैतन्यपूर्ण आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले.
हलवाई गणेशासमोर विद्यार्थ्यांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण
दरवर्षीप्रमाणे यंदाही हलवाई गणेशासमोर विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. डेक्कन स्कुलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी  अथर्वशीर्षाचे महत्त्व व महती विशद करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
यावेळी  मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे उपाध्यक्ष वैभव लांडे, शरद मुसळे,  मंडळाचे माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, अशोक काळे,  प्रेम मुसळे,श्याम परदेशी, अविनाश जाधव, प्रणव मुसळे, बाळासाहेब ढोबळे  ,सिंकदर मन्यार  रमणलाल मुसळे, नारायण काळे, श्याम कोळपकर , शिक्षक सखाराम पुरी, आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष  मयूर काळे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. आभार अशोक काळे यांनी मानले.
हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. काही वर्षांपूर्वी मंडळाने विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून वाचलेल्या निधीतून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मंडळाचा उत्सव मंडप खड्डेविरहित ठेवण्याची परंपराही कायम आहे. शहरात महिलांसाठी सामूहिक महिला आरतीचा उपक्रम सर्वप्रथम मंडळाने सुरू केला.
पर्यावरण संवर्धनासाठी महिला आरतीच्या वेळी महिलांना तुळशीची तसेच देशी वृक्षांची रोपे भेट देण्यात येतात. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटली जातात. गणेशोत्सव काळात बंदोबस्त व स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिस व नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळ्यातून सन्मान केला जातो. आरोग्य शिबिरे, जनजागृती, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप असे उपक्रमही राबविले जातात.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आतापर्यंत ३५ हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. कोरोनाकाळात गरजू नागरिकांना अन्नधान्य किट, तसेच सांगली व महाड परिसरातील पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत मंडळाने केली.
लोकवर्गणीतून हलवाई गणेशाला चांदीचे आभूषणे अर्पण करण्यात आली असून गणेशजयंतीच्या महाप्रसादासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. दरवर्षी पौराणिक, धार्मिक किंवा सामाजिक विषयांवरील देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. विविध धर्मांचे नागरिक मंडळाच्या उपक्रमात सहभागी होतात. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीनेही मंडळाच्या कार्याची दखल घेऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे.
१५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण, मुलांना खाऊवाटप तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची सांगड घालणारे मंडळ म्हणून हलवाई चौक गणेश मित्र मंडळाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गोदावरी-कृष्णा खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याचीही मागणी माआ. भिमराव धोंडे बीड (प्रतिनिधी) : आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील पाणी या तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे. आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) हे तालुके दुष्काळग्रस्त व पाणीटंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखले जात असून, या भागातील शेती, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न वारंवार गंभीर होत आहे. त्यामुळे गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून या तालुक्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. मोर्चाच्या दिवशी या विषयाशी संबंधित जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी खोरे विकास महामंडळ तसेच संबंधित तांत्रिक व प्रशासकीय विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे मोर्चाच्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाहीची दिशा निश्चित करता येईल. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ऊस, सोयाबीन, तूर, मूग, कापूस, उडीद, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन १०० रुपये आणि लहान जनावरांसाठी ५० रुपये या प्रमाणात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. आष्टीला मंजूर ५.६८ टीएमसीपैकी उर्वरित ४ टीएमसी पाणी द्या निवेदनानुसार, कृष्णा खोरे प्रकल्पातून आष्टी तालुक्यासाठी ५.६८ टीएमसी पाणी मंजूर झाले असून त्यापैकी १.६८ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र मंजूर कोट्यातील उर्वरित ४.०० टीएमसी पाणी अद्याप उपलब्ध झालेले नाही. आष्टी तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई आणि शेतीची गरज लक्षात घेता मंजूर असलेले उर्वरित ४ टीएमसी पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन व प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी आणि दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
    1
    आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
गोदावरी-कृष्णा खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याचीही मागणी माआ. भिमराव धोंडे
बीड (प्रतिनिधी) : आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील पाणी या तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे.
आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) हे तालुके दुष्काळग्रस्त व पाणीटंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखले जात असून, या भागातील शेती, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न वारंवार गंभीर होत आहे. त्यामुळे गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून या तालुक्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे.
मोर्चाच्या दिवशी या विषयाशी संबंधित जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी खोरे विकास महामंडळ तसेच संबंधित तांत्रिक व प्रशासकीय विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे मोर्चाच्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाहीची दिशा निश्चित करता येईल.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या
खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ऊस, सोयाबीन, तूर, मूग, कापूस, उडीद, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन १०० रुपये आणि लहान जनावरांसाठी ५० रुपये या प्रमाणात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
आष्टीला मंजूर ५.६८ टीएमसीपैकी उर्वरित ४ टीएमसी पाणी द्या
निवेदनानुसार, कृष्णा खोरे प्रकल्पातून आष्टी तालुक्यासाठी ५.६८ टीएमसी पाणी मंजूर झाले असून त्यापैकी १.६८ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र मंजूर कोट्यातील उर्वरित ४.०० टीएमसी पाणी अद्याप उपलब्ध झालेले नाही. आष्टी तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई आणि शेतीची गरज लक्षात घेता मंजूर असलेले उर्वरित ४ टीएमसी पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन व प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी आणि दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येते NALSA अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षा युनिट योजना 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला मोहोळ जिल्हा सोलापूर येथे नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षण युनिट 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
    1
    मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येते NALSA अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षा युनिट योजना 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला
मोहोळ जिल्हा सोलापूर येथे नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षण युनिट 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • विरोधकांनी संविधानाचा अपमान केला; नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पल हार घालून २५ हजार कर्जतकरांचा अपमान - सुनील शेलार यांचा हल्लाबोल कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून विरोधी नगरसेवकांनी केवळ नगराध्यक्षांचाच नव्हे तर संविधानाचा, घटनेचा आणि कर्जतच्या २५ हजार जनतेचा अपमान केला आहे, असा घणाघात भाजप नेते व नगराध्यक्षा पती सुनील शेलार यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी दलित वस्ती निधी दिला नाही तर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी विरोधकांनी दिली होती, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. निधी वाटप सर्वानुमते झाले - सुनील शेलार यावेळी बोलताना सुनील शेलार म्हणाले की, "दलित वस्ती निधी वाटपाचा विषय हा एकट्या नगराध्यक्षांचा विषय नाही. या संदर्भात सर्व नगरसेवकांनी एकत्रित विशेष सभा घेऊन सर्वानुमते निधीचे वाटप केलेले आहे. प्रभाग क्रमांक १५ ला यापूर्वीच सर्वात जास्त निधीचे वाटप झालेले आहे. कर्जत शहरातील इतर प्रभागात देखील मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय बांधव राहतात. त्यांनाही विकासापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे त्या प्रभागात देखील निधी दिला पाहिजे, या सर्व समावेशक भावनेने हा निधी देण्यात आला आहे. यात कोणताही गैरव्यवहार किंवा नियमबाह्यता झालेली नाही." "मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी मुद्दामहून या विषयाला वेगळे वळण देऊन नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान केला. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे," असेही शेलार म्हणाले. या घटनेचा निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.
    1
    विरोधकांनी संविधानाचा अपमान केला; नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पल हार घालून २५ हजार कर्जतकरांचा अपमान - सुनील शेलार यांचा हल्लाबोल

कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून विरोधी नगरसेवकांनी केवळ नगराध्यक्षांचाच नव्हे तर संविधानाचा, घटनेचा आणि कर्जतच्या २५ हजार जनतेचा अपमान केला आहे, असा घणाघात भाजप नेते व  नगराध्यक्षा पती सुनील शेलार  यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी दलित वस्ती निधी दिला नाही तर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी विरोधकांनी दिली होती, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
निधी वाटप सर्वानुमते झाले - सुनील शेलार
यावेळी बोलताना सुनील शेलार म्हणाले की,
"दलित वस्ती निधी वाटपाचा विषय हा एकट्या नगराध्यक्षांचा विषय नाही. या संदर्भात सर्व नगरसेवकांनी एकत्रित विशेष सभा घेऊन सर्वानुमते निधीचे वाटप केलेले आहे. 
प्रभाग क्रमांक १५ ला यापूर्वीच सर्वात जास्त निधीचे वाटप झालेले आहे. कर्जत शहरातील इतर प्रभागात देखील मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय बांधव राहतात. त्यांनाही विकासापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे त्या प्रभागात देखील निधी दिला पाहिजे, या सर्व समावेशक भावनेने हा निधी देण्यात आला आहे. यात कोणताही गैरव्यवहार किंवा नियमबाह्यता झालेली नाही."
"मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी मुद्दामहून या विषयाला वेगळे वळण देऊन नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान केला. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे," असेही शेलार म्हणाले.
या घटनेचा निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.
    user_SM Rokhthok News
    SM Rokhthok News
    Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.