खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीचा चिमुकली काढला लकी ड्रॉ खामगाव: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत प्रथम मानाचा लाकडी गणपती , तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, व राणा गणेश मंडळ असतात तर त्यानंतर लकी ड्रॉ प्रमाणे इतर मंडळे सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लकी ड्रॉ नुसार विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असून अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणुक निघणार आहे.यामध्ये शिवाजी नगर पोलिस स्टेशन तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अशा एकूण 28 गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे. या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलिस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पो.स्टे.चे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर ,शिवाजी नगर पो.स्टे.चे ठाणेदार मंदार पुरी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रिश अनुपकुमार छतवाणी वय 3 व आर्यन संतोष श्रीनाथ वय या लहान मूल्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी ने लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली.
खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीचा चिमुकली काढला लकी ड्रॉ खामगाव: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत प्रथम मानाचा लाकडी गणपती , तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, व राणा गणेश मंडळ असतात
तर त्यानंतर लकी ड्रॉ प्रमाणे इतर मंडळे सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लकी ड्रॉ नुसार विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असून अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणुक निघणार आहे.यामध्ये शिवाजी नगर पोलिस स्टेशन तर
शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अशा एकूण 28 गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे. या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलिस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पो.स्टे.चे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर ,शिवाजी नगर
पो.स्टे.चे ठाणेदार मंदार पुरी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रिश अनुपकुमार छतवाणी वय 3 व आर्यन संतोष श्रीनाथ वय या लहान मूल्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी ने लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली.
- कस्तुरबा गांधी विद्यालय व न्यू हायस्कूलच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे भोकरदन : मुलींमध्ये आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांच्या पुढाकारातून न्यू हायस्कूल व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी मोफत कराटे व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. कराटे प्रशिक्षक दीपक मगरे यांनी विद्यार्थिनींना कराटेच्या मूलभूत तंत्रांसह संकटाच्या प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करावा, प्रसंगावधान कसे राखावे आणि आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वसंरक्षण तंत्रांचा सराव केला. या उपक्रमाचे न्यू हायस्कूलचे प्राचार्य बी. बी. नन्नावरे व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या प्राचार्या ताराताई जाधव यांनी कौतुक केले. “प्रत्येक मुलीला स्वसंरक्षणाचे कौशल्य अवगत व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” असे प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांनी सांगितले.1
- पाटोदा येथे भगवे वादळ! मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताला जनसागराचा महासागर, मुंबईकडे रवाना होण्याआधी ऐतिहासिक शक्तिप्रदर्शन क्रेनच्या सहाय्याने ५० फुटी भव्य हार घालून संघर्ष योद्ध्याचे स्वागत एक मराठा-लाख मराठा च्या घोषणांनी पाटोदा दुमदुमले मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर लढाई लढण्यासाठी निघालेले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पाटोदा शहरात जंगी मिरवणूक आणि सत्कार करण्यात आला. मराठा आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या या योद्ध्याला पाहण्यासाठी आणि त्यांच्या एका हाकेवर हजारो मराठा बांधव पाटोदा शहरात लोटले होते. जिथे नजर जाईल तिथे फक्त डोकेच डोके दिसत होते. या व्हिडीओमध्ये दिसत असलेले हे दृश्य कोणत्याही चित्रपटातील नसून, पाटोदा शहराच्या मुख्य बाजारपेठेतील आहे. रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाही, इतका प्रचंड जनसमुदाय एकाच ठिकाणी जमा झाला होता. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी पाटोदा शहरात हा विराट जनसागर उसळला होता. क्रेनवरील भव्य हार ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू दुपारच्या सुमारास पाटोदा शहराच्या मध्यवर्ती भागात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. हजारो युवकांनी डोक्यावर भगव्या टोप्या, कपाळावर भगवा टिळा आणि हातात भगवे झेंडे घेऊन जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांवर, इमारतींच्या छतावर, टेरेसवर आणि क्रेनवर उभे राहून लोक हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते. या गर्दीच्या मध्यभागी फुलांनी सजवलेली काळी-पांढरी फॉर्च्युनर गाडी हळूहळू पुढे सरकत होती. गाडीच्या बॉनेटवर झेंडूच्या फुलांचा खच पडला होता. गाडीवर उभे राहून मनोज जरांगे पाटील हात जोडून आणि हात उंचावून जनतेचे अभिवादन करत होते. पोलिसांना आणि स्वयंसेवकांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या स्वागत सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते क्रेनच्या सहाय्याने घातलेला ५० फूट लांबीचा भव्य हार! एका मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हा अवाढव्य फुलांचा हार जरांगे पाटलांच्या दिशेने खाली आणण्यात आला. हा हार गळ्यात पडताच उपस्थित हजारो मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. प्रत्येक ठिकाणी जनसागराचा महासागर मनोज जरांगे पाटील हे केवळ एक व्यक्ती नसून, तो एक विचार आहे. मराठा आरक्षणासाठी ते जिथे जिथे जात आहेत, तिथे तिथे जनसागराचा महासागर होत आहे. अंतरवाली सराटी पासून मुंबई पर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक प्रवासात असेच लाखो मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर येत आहेत. पाटोदा येथे झालेला हा सत्कार म्हणजे केवळ स्वागत नव्हते, तर मराठा समाजाने दाखवलेले ऐक्य आणि ताकदीचे शक्ती प्रदर्शन होते. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, या जरांगे पाटलांच्या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठी हा जनसमुदाय लोटला होता. या विराट जनसागराने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाटोदा येथून हा जंगी सत्कार स्वीकारून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो गाड्यांच्या ताफ्यासह आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.1
- ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣 ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣1
- इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.1
- पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.1
- मज़दूर का हक़ वक्त पर दो, मेहनत की कमाई रोकना इंसाफ नहीं!1
- पावसाने फिरवली पाठ;सेनगावच्या शेतकऱ्याचे सुकळी खुर्द शिवारातील ४ एकर सोयाबीन जळून खाक,महसुल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार? सेनगाव/विश्वनाथ देशमुख निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यादेखत करपून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.सेनगाव येथील एका शेतकऱ्याचे उभे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले आहे.पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे सेनगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांच्या सुकळी खुर्द शिवारातील तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून नष्ट झाले आहे.शेती सुकळी शिवारात असली तरी देशमुख हे सेनगाव शहरात राहून तिथूनच शेतीचा संपूर्ण कारभार पाहत होते.या कोरड्या दुष्काळामुळे देशमुख यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.मात्र,या गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 'महसूल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?'असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी लक्ष्मण देशमुख यांनी मोठ्या आशेने सुकळी खुर्द शिवारातील आपल्या गट क्रमांक १०९ मधील चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.बियाणे,खते,कोळपणी आणि खुरपणीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पिकाला पोटच्या पोरासारखे सांभाळले.पीक जोमात असतानाच अचानक पावसाने दीर्घकाळ दडी मारली.कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अखेर हे उभे पीक करपून गेले.या दुर्दैवी घटनेमुळे सेनगाव आणि सुकळी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.आधीच संकटात असलेल्या बळीराजाला आता शासनाच्या आधाराची अत्यंत गरज आहे.पिकाचे नुकसान होऊन दिवस उलटत चालले तरी महसूल विभाग किंवा कृषीऐ विभागाचा एकही अधिकारी सुकळी शिवाराकडे फिरकलेला नाही.त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने या गंभीर नुकसानीची दखल घेऊन तातडीने संयुक्त पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष सरकारी मदत व पीक विमा मंजूर करावा,अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. "कर्ज काढून पोटाच्या पोरासारखं सोयाबीन सांभाळलं,पण पावसाने दगा दिला अन डोळ्यादेखत सोन्यासारखं रान जळून कोळसा झालं! चार एकरात आता फक्त काळ्या काड्या उरल्यात.हे उध्वस्त रान पाहताना काळजाचा तुकडा तुटल्यागत वेदना होत आहेत.कर्ज कसं फेडू आणि लेकरांना काय खायला घालू? पीक जळून राख झाली तरी अधिकारी अजून बांधावर आले नाहीत.सरकारने तातडीने मदत दिली नाही,तर आमच्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही!" — लक्ष्मण रामराव देशमुख (पीडित शेतकरी,सेनगाव)1
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टाकलेला कचरा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला स्वच्छ तालुक्यातील भवन ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील कचरा स्वच्छ करण्यात आला सदरील कचरा भवन ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छ करण्यात आला1
- पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केली सेनगाव परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या मागण्याची अखेर शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी नेते मारोती गिते यांच्या सेनगाव परिसरात असलेल्या शेतातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली. यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना 100% पीक विमा व सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते मारोती गीते यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री नरहरी झिरवळ हे आजेगाव कडून सेनगावच्या दिशेने जात असताना मारोती गीते यांनी सेनगाव परिसरातील आपल्या शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी नेते मारोती गीते यांच्या कार्याचे कौतुक देखील पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन सह पिके धोक्यात सापडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसाअभावी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारोती गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.1