कस्तुरबा गांधी विद्यालय व न्यू हायस्कूलच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे भोकरदन : मुलींमध्ये आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांच्या पुढाकारातून न्यू हायस्कूल व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी मोफत कराटे व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. कराटे प्रशिक्षक दीपक मगरे यांनी विद्यार्थिनींना कराटेच्या मूलभूत तंत्रांसह संकटाच्या प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करावा, प्रसंगावधान कसे राखावे आणि आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वसंरक्षण तंत्रांचा सराव केला. या उपक्रमाचे न्यू हायस्कूलचे प्राचार्य बी. बी. नन्नावरे व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या प्राचार्या ताराताई जाधव यांनी कौतुक केले. “प्रत्येक मुलीला स्वसंरक्षणाचे कौशल्य अवगत व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” असे प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांनी सांगितले.
कस्तुरबा गांधी विद्यालय व न्यू हायस्कूलच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे भोकरदन : मुलींमध्ये आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांच्या पुढाकारातून न्यू हायस्कूल व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी मोफत कराटे व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. कराटे प्रशिक्षक दीपक मगरे यांनी विद्यार्थिनींना कराटेच्या मूलभूत तंत्रांसह संकटाच्या प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करावा, प्रसंगावधान कसे राखावे आणि आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वसंरक्षण तंत्रांचा सराव केला. या उपक्रमाचे न्यू हायस्कूलचे प्राचार्य बी. बी. नन्नावरे व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या प्राचार्या ताराताई जाधव यांनी कौतुक केले. “प्रत्येक मुलीला स्वसंरक्षणाचे कौशल्य अवगत व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” असे प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांनी सांगितले.
- कस्तुरबा गांधी विद्यालय व न्यू हायस्कूलच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे भोकरदन : मुलींमध्ये आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांच्या पुढाकारातून न्यू हायस्कूल व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी मोफत कराटे व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. कराटे प्रशिक्षक दीपक मगरे यांनी विद्यार्थिनींना कराटेच्या मूलभूत तंत्रांसह संकटाच्या प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करावा, प्रसंगावधान कसे राखावे आणि आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वसंरक्षण तंत्रांचा सराव केला. या उपक्रमाचे न्यू हायस्कूलचे प्राचार्य बी. बी. नन्नावरे व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या प्राचार्या ताराताई जाधव यांनी कौतुक केले. “प्रत्येक मुलीला स्वसंरक्षणाचे कौशल्य अवगत व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” असे प्रा. सौ. अनिताताई अंकुश जाधव यांनी सांगितले.1
- पाटोदा येथे भगवे वादळ! मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताला जनसागराचा महासागर, मुंबईकडे रवाना होण्याआधी ऐतिहासिक शक्तिप्रदर्शन क्रेनच्या सहाय्याने ५० फुटी भव्य हार घालून संघर्ष योद्ध्याचे स्वागत एक मराठा-लाख मराठा च्या घोषणांनी पाटोदा दुमदुमले मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर लढाई लढण्यासाठी निघालेले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पाटोदा शहरात जंगी मिरवणूक आणि सत्कार करण्यात आला. मराठा आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या या योद्ध्याला पाहण्यासाठी आणि त्यांच्या एका हाकेवर हजारो मराठा बांधव पाटोदा शहरात लोटले होते. जिथे नजर जाईल तिथे फक्त डोकेच डोके दिसत होते. या व्हिडीओमध्ये दिसत असलेले हे दृश्य कोणत्याही चित्रपटातील नसून, पाटोदा शहराच्या मुख्य बाजारपेठेतील आहे. रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाही, इतका प्रचंड जनसमुदाय एकाच ठिकाणी जमा झाला होता. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी पाटोदा शहरात हा विराट जनसागर उसळला होता. क्रेनवरील भव्य हार ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू दुपारच्या सुमारास पाटोदा शहराच्या मध्यवर्ती भागात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. हजारो युवकांनी डोक्यावर भगव्या टोप्या, कपाळावर भगवा टिळा आणि हातात भगवे झेंडे घेऊन जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांवर, इमारतींच्या छतावर, टेरेसवर आणि क्रेनवर उभे राहून लोक हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते. या गर्दीच्या मध्यभागी फुलांनी सजवलेली काळी-पांढरी फॉर्च्युनर गाडी हळूहळू पुढे सरकत होती. गाडीच्या बॉनेटवर झेंडूच्या फुलांचा खच पडला होता. गाडीवर उभे राहून मनोज जरांगे पाटील हात जोडून आणि हात उंचावून जनतेचे अभिवादन करत होते. पोलिसांना आणि स्वयंसेवकांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या स्वागत सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते क्रेनच्या सहाय्याने घातलेला ५० फूट लांबीचा भव्य हार! एका मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हा अवाढव्य फुलांचा हार जरांगे पाटलांच्या दिशेने खाली आणण्यात आला. हा हार गळ्यात पडताच उपस्थित हजारो मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. प्रत्येक ठिकाणी जनसागराचा महासागर मनोज जरांगे पाटील हे केवळ एक व्यक्ती नसून, तो एक विचार आहे. मराठा आरक्षणासाठी ते जिथे जिथे जात आहेत, तिथे तिथे जनसागराचा महासागर होत आहे. अंतरवाली सराटी पासून मुंबई पर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक प्रवासात असेच लाखो मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर येत आहेत. पाटोदा येथे झालेला हा सत्कार म्हणजे केवळ स्वागत नव्हते, तर मराठा समाजाने दाखवलेले ऐक्य आणि ताकदीचे शक्ती प्रदर्शन होते. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, या जरांगे पाटलांच्या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठी हा जनसमुदाय लोटला होता. या विराट जनसागराने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाटोदा येथून हा जंगी सत्कार स्वीकारून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो गाड्यांच्या ताफ्यासह आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.1
- भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.* *उपोषणकर्ते रामा जाधव यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच “ग्रामपंचायतीचा लिलाव करून माझे मानधन द्या” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.*1
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टाकलेला कचरा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला स्वच्छ तालुक्यातील भवन ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील कचरा स्वच्छ करण्यात आला सदरील कचरा भवन ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छ करण्यात आला1
- इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS बोरगाव सारवणी शाळा कार्यक्रमात मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचे धडाकेबाज भाषण | AQS NEWS1
- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.1
- रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.1
- जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. आज दिनांक 16 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने ओढ दिल्याने जालना जिल्ह्यातील पिकांच्या परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसातील अनिश्चितता आणि वारंवार पडलेल्या खंडामुळे खरीप पिकांची वाढ, उत्पादन क्षमता आणि एकूणच शेतीची स्थिती चिंताजनक बनली आहे. १४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात जूनपासून सरासरीच्या केवळ ८१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सप्टेंबर महिन्यात तर १४ तारखेपर्यंत सरासरीच्या केवळ ३३.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची वस्तुनिष्ठ परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाने संयुक्त पीक पाहणी केली असून, सर्व तालुक्यांचा संकलित प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेण्यात आली.1