logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

‘मेरा रेशम, मेरा अभिमान-2’ अभियानांतर्गत शेतकरी जागृकता कार्यक्रम संपन्न हिंगोली, दि. 25 ऑगस्ट : केंद्रीय रेशीम मंडळ व जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरा रेशम, मेरा अभिमान-2’ अभियानांतर्गत मौजे लिंबी, ता. हिंगोली येथे शेतकरी जागृकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा रेशीम विकास अधिकारी विवेकानंद पेठकर, केंद्रीय रेशीम मंडळाचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम, प्रगतशील रेशीम शेतकरी गजानन ढाकरे यांच्यासह परिसरातील पुरुष व महिला रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी विवेकानंद पेठकर यांनी तुती लागवड, रेशीम किटकांचे संगोपन तसेच जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध अनुदान योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. रेशीम शेती करताना आवश्यक असणाऱ्या बाबी, शासकीय योजनांचा लाभ आणि उत्पादनवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय रेशीम मंडळाचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम यांनी केंद्रीय रेशीम मंडळामार्फत विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली. रेशीम शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारे उत्पन्न मिळविण्याच्या संधी, बाजारपेठेची उपलब्धता तसेच भविष्यातील रेशीम शेतीच्या विविध संधींबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रगतशील रेशीम शेतकरी गजानन ढाकरे यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न वाढविता येते, असा विश्वास व्यक्त करत आपल्या अनुभवातून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रेशीम कार्यालयातील श्री. रंभापूरे, श्री. ठमके व श्री. मगर यांनी परिश्रम घेतले.

10 hrs ago
user_Ganesh Sutar
Ganesh Sutar
सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
10 hrs ago

‘मेरा रेशम, मेरा अभिमान-2’ अभियानांतर्गत शेतकरी जागृकता कार्यक्रम संपन्न हिंगोली, दि. 25 ऑगस्ट : केंद्रीय रेशीम मंडळ व जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरा रेशम, मेरा अभिमान-2’ अभियानांतर्गत मौजे लिंबी, ता. हिंगोली येथे शेतकरी जागृकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा रेशीम विकास अधिकारी विवेकानंद पेठकर, केंद्रीय रेशीम मंडळाचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम, प्रगतशील रेशीम शेतकरी गजानन ढाकरे यांच्यासह परिसरातील पुरुष व महिला रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी विवेकानंद पेठकर यांनी तुती लागवड, रेशीम किटकांचे संगोपन तसेच जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध अनुदान योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. रेशीम शेती करताना आवश्यक असणाऱ्या बाबी, शासकीय योजनांचा लाभ आणि उत्पादनवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय रेशीम मंडळाचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम यांनी केंद्रीय रेशीम मंडळामार्फत विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली. रेशीम शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारे उत्पन्न मिळविण्याच्या संधी, बाजारपेठेची उपलब्धता तसेच भविष्यातील रेशीम शेतीच्या विविध संधींबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रगतशील रेशीम शेतकरी गजानन ढाकरे यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न वाढविता येते, असा विश्वास व्यक्त करत आपल्या अनुभवातून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रेशीम कार्यालयातील श्री. रंभापूरे, श्री. ठमके व श्री. मगर यांनी परिश्रम घेतले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती
    1
    जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    1
    सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न 
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    14 hrs ago
  • नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .
    1
    नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    1
    🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
 शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू,
📍 वसमत, जि. हिंगोली
शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली—
🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
असा स्पष्ट इशारा!
✊ जमीन आमची — निर्णय आमचा!
🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द!
#शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा
    1
    साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय!

१० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार
    1
    माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख 
हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट
शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार
माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख 
हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट
शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    16 min ago
  • 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes
    1
    🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा
📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे.
📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन:
नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा.
☎️ 02462-235077
☎️ 1077 — टोल फ्री
माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा.
⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.
ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    52 min ago
  • मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    1
    मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे ,
धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.