logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रांजणगाव पोलीस ठाण्यात सायबर सुरक्षा व Dial 112 विषयक जनजागृती कार्यशाळा रांजणगाव गणपती, दि. १ ऑगस्ट : रांजणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी सायबर सुरक्षा व आर्थिक गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच Dial 112 या आपत्कालीन सेवा क्रमांकाच्या प्रभावी वापराबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते १२ या वेळेत झालेल्या या कार्यशाळेत ऑनलाइन आर्थिक फसवणूक, अनोळखी क्रमांकावरून येणारे ओटीपी, संशयास्पद लिंक, मोबाईल हॅकिंग, फेसबुक व इन्स्टाग्रामसह सोशल मीडिया खाते सुरक्षित ठेवण्याचे उपाय याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत Dial 112 चा योग्य व प्रभावी वापर कसा करावा, याचीही माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला पोलीस स्टेशन हद्दीतील शिक्षक, महिला समिती सदस्य, सराफ व्यावसायिक, पत्रकार आणि पोलीस पाटील असे सुमारे ५० ते ६० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना सायबर सुरक्षा शपथ देण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

2 hrs ago
user_Nitin Aba Pawar
Nitin Aba Pawar
Media Consultant शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
a9489174-60f3-4ada-9f35-e190b4cdea36

रांजणगाव पोलीस ठाण्यात सायबर सुरक्षा व Dial 112 विषयक जनजागृती कार्यशाळा रांजणगाव गणपती, दि. १ ऑगस्ट : रांजणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी सायबर सुरक्षा व आर्थिक गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच Dial 112 या आपत्कालीन सेवा क्रमांकाच्या प्रभावी वापराबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते १२ या वेळेत झालेल्या या कार्यशाळेत ऑनलाइन आर्थिक फसवणूक, अनोळखी क्रमांकावरून येणारे ओटीपी, संशयास्पद लिंक, मोबाईल हॅकिंग, फेसबुक व इन्स्टाग्रामसह सोशल मीडिया खाते सुरक्षित ठेवण्याचे उपाय याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत Dial 112 चा योग्य व प्रभावी वापर कसा करावा, याचीही माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला पोलीस स्टेशन हद्दीतील शिक्षक, महिला समिती सदस्य, सराफ व्यावसायिक, पत्रकार आणि पोलीस पाटील असे सुमारे ५० ते ६० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना सायबर सुरक्षा शपथ देण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांविरोधात सामूहिक लढा उभारण्याचे आवाहन; शिरूर {. डेली न्यूज पोस्ट टीम 24}सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे वाढते संकट थांबवणे हे पोलिसा बरोबर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. सजग आणि सतर्क राहूनच या संकटावर मात करता येईल. सायबर गुन्ह्यांचे संकट आता प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचले असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी केले. शिरूर पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे व अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते, राकेश मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रवींद्र भोसले म्हणाले, "छुप्या पद्धतीने तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक किंवा एपीके (APK) फाईल कधीही डाउनलोड करू नयेत. ओटीपी कोणालाही सांगू नये तसेच बनावट लोन अॅप्सपासून सावध राहावे." पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, अनोळखी व्यक्तींना ओटीपी देऊ नका, खात्री केल्याशिवाय कोणतीही फाईल डाउनलोड करू नका आणि बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी १९३० हा राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक असल्याची माहितीही त्यांनी दिली. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत बोलताना नखाते म्हणाले की, गांजा, अफू, चरस आणि विशेषतः एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थांचे व्यसन तरुणांमध्ये वाढत आहे. थ्रिलच्या नादात अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात असून त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या आहेत. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा, त्यांच्या मित्रपरिवार आणि हालचालींकडे लक्ष द्यावे. युवकांनी जीवनाचे ध्येय निश्चित करून प्राणायाम, ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस शिरूर नगरपालिकेच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, मीना पाडळे, हनुमंत सोनवणे, राजाराम चौरे, सुदर्शन भाकरे, गणेश पवार, विशाल गदादे, संदीप पवार, रोहित दाते, अशोक पाचुंदकर, अर्चना थोरात, वर्षा पवार, सोनल गोरडे, राहुल जगताप, स्नेहल निचित, सर्जेराव बोऱ्हाडे, भानुदास रोकडे, बाबासाहेब शेलार, भास्कर ओव्हाळ, शितल गायकवाड, वैशाली गायकवाड, ऋतुजा वराळ, पल्लवी पुदगाणे, विशाल कारखिले, इंदिरा जाधव, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, रेश्मा शेख, शोभना पाचंगे, रवींद्र सानप, ज्योती गायकवाड, उर्मिला कुसेकर, उत्तम शेलार, अमित उकिरडे, दिव्या कारकूड, शोभा मंदीलकर, संदीप भोगावडे, देवल शहा, रामभाऊ सरोदे, नितीन भंडारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अमोल गारुडी यांनी मानले.
    4
    सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांविरोधात सामूहिक लढा उभारण्याचे आवाहन; 
शिरूर {. डेली न्यूज पोस्ट टीम 24}सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे वाढते संकट थांबवणे हे  पोलिसा बरोबर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. सजग आणि सतर्क राहूनच या संकटावर मात करता येईल. सायबर गुन्ह्यांचे संकट आता प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचले असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी केले.
शिरूर पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे व अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते, राकेश मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रवींद्र भोसले म्हणाले, "छुप्या पद्धतीने तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक किंवा एपीके (APK) फाईल कधीही डाउनलोड करू नयेत. ओटीपी कोणालाही सांगू नये तसेच बनावट लोन अॅप्सपासून सावध राहावे."
पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, अनोळखी व्यक्तींना ओटीपी देऊ नका, खात्री केल्याशिवाय कोणतीही फाईल डाउनलोड करू नका आणि बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी १९३० हा राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत बोलताना नखाते म्हणाले की, गांजा, अफू, चरस आणि विशेषतः एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थांचे व्यसन तरुणांमध्ये वाढत आहे. थ्रिलच्या नादात अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात असून त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या आहेत. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा, त्यांच्या मित्रपरिवार आणि हालचालींकडे लक्ष द्यावे. युवकांनी जीवनाचे ध्येय निश्चित करून प्राणायाम, ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस शिरूर नगरपालिकेच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, मीना पाडळे, हनुमंत सोनवणे, राजाराम चौरे, सुदर्शन भाकरे, गणेश पवार, विशाल गदादे, संदीप पवार, रोहित दाते, अशोक पाचुंदकर, अर्चना थोरात, वर्षा पवार, सोनल गोरडे, राहुल जगताप, स्नेहल निचित, सर्जेराव बोऱ्हाडे, भानुदास रोकडे, बाबासाहेब शेलार, भास्कर ओव्हाळ, शितल गायकवाड, वैशाली गायकवाड, ऋतुजा वराळ, पल्लवी पुदगाणे, विशाल कारखिले, इंदिरा जाधव, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, रेश्मा शेख, शोभना पाचंगे, रवींद्र सानप, ज्योती गायकवाड, उर्मिला कुसेकर, उत्तम शेलार, अमित उकिरडे, दिव्या कारकूड, शोभा मंदीलकर, संदीप भोगावडे, देवल शहा, रामभाऊ सरोदे, नितीन भंडारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार अमोल गारुडी यांनी मानले.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दबाव, गुंड आणि ठरावाचा आरोप ; रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल ; भाजपमध्ये गेल्यानंतर अशी संस्कृती सुरू झाली अहिल्यानगर साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव, दहशत आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी करत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आमचा जुना परिचय असून त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे. मात्र, अलीकडील सोसायटी ठराव प्रकरणात ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरल्याच्या चर्चा समोर येत आहेत, त्या लोकशाहीला घातक आहेत. निर्णय हा लोकशाही मार्गाने व्हायला हवा; दडपशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. *आ.रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी* आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप केला. हा निर्णय शिवेंद्रराजेंचा वैयक्तिक होता की त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला होता, याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे आणि दबाव टाकून निर्णय मंजूर करून घेणे वेगळे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनतेची मान्यता नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.
    1
    दबाव, गुंड आणि ठरावाचा आरोप ; रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल ; भाजपमध्ये गेल्यानंतर अशी संस्कृती सुरू झाली 
अहिल्यानगर 
साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव, दहशत आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी करत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आमचा जुना परिचय असून त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे. मात्र, अलीकडील  सोसायटी ठराव प्रकरणात ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरल्याच्या चर्चा समोर येत आहेत, त्या लोकशाहीला घातक आहेत. निर्णय हा लोकशाही मार्गाने व्हायला हवा; दडपशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले.
*आ.रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही केली  मागणी*
आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप केला. हा निर्णय शिवेंद्रराजेंचा वैयक्तिक होता की त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला होता, याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे आणि दबाव टाकून निर्णय मंजूर करून घेणे वेगळे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनतेची मान्यता नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Journalist नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • "पुढे काय होईल याची शक्यता आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतात स्मार्टफोन...!"
    1
    "पुढे काय होईल याची शक्यता आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतात स्मार्टफोन...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    10 min ago
  • मोहम्मदवाडीत मध्यरात्रीचा हैदोस! राहेजा व्हिस्टा प्रीमियरसमोर स्टंटबाजी, नागरिकांची पोलिसांकडे कारवाईची मागणी
    1
    मोहम्मदवाडीत मध्यरात्रीचा हैदोस! राहेजा व्हिस्टा प्रीमियरसमोर स्टंटबाजी, नागरिकांची पोलिसांकडे कारवाईची मागणी
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 min ago
  • Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले
    1
    Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले 


Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    1 hr ago
  • साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. #annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,
    1
    साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.
#annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • CJP आंदोलनात पोलीस व्हॅन अडवणाऱ्या रियाचा राज ठाकरेंकडून जाहीर सत्कार; पुन्हा चर्चेत 'रिया'!
    1
    CJP आंदोलनात पोलीस व्हॅन अडवणाऱ्या रियाचा राज ठाकरेंकडून जाहीर सत्कार; पुन्हा चर्चेत 'रिया'!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!
    1
    अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.