Shuru
Apke Nagar Ki App…
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!
More news from महाराष्ट्र and nearby areas
- थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.1
- डिंभे धरणातून मोठा विसर्ग; घोडनदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा... जुन्नर पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून आता 09 हजार क्युसेक्स वेगाने घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्यास डिंभे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अजून वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय... ड्रोन सौजन्य - सौरभ भोर #जुन्नर #आंबेगाव #डिंभेधरण #डिंभे #घोडनदी #पाण्याचाविसर्ग #9000क्युसेक्स #धरणविसर्ग #पूरसदृश्यस्थिती #पावसाचाजोर #नदीकाठचेनागरिक #सतर्कतेचाइशारा #पुणेजिल्हा #पुणेन्यूज #महाराष्ट्रपाऊस #MonsoonAlert #DimbheDam #PuneNews #TheNayakNews1
- "शिक्षणाचे बाजारीकरण झाले नाहीये का...? या गोष्टीवर आम्ही चर्चा करायची नाही तर मग कोणी करायची...!"1
- विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.2
- सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांविरोधात सामूहिक लढा उभारण्याचे आवाहन; शिरूर {. डेली न्यूज पोस्ट टीम 24}सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे वाढते संकट थांबवणे हे पोलिसा बरोबर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. सजग आणि सतर्क राहूनच या संकटावर मात करता येईल. सायबर गुन्ह्यांचे संकट आता प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचले असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी केले. शिरूर पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे व अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते, राकेश मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रवींद्र भोसले म्हणाले, "छुप्या पद्धतीने तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक किंवा एपीके (APK) फाईल कधीही डाउनलोड करू नयेत. ओटीपी कोणालाही सांगू नये तसेच बनावट लोन अॅप्सपासून सावध राहावे." पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, अनोळखी व्यक्तींना ओटीपी देऊ नका, खात्री केल्याशिवाय कोणतीही फाईल डाउनलोड करू नका आणि बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी १९३० हा राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक असल्याची माहितीही त्यांनी दिली. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत बोलताना नखाते म्हणाले की, गांजा, अफू, चरस आणि विशेषतः एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थांचे व्यसन तरुणांमध्ये वाढत आहे. थ्रिलच्या नादात अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात असून त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या आहेत. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा, त्यांच्या मित्रपरिवार आणि हालचालींकडे लक्ष द्यावे. युवकांनी जीवनाचे ध्येय निश्चित करून प्राणायाम, ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस शिरूर नगरपालिकेच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, मीना पाडळे, हनुमंत सोनवणे, राजाराम चौरे, सुदर्शन भाकरे, गणेश पवार, विशाल गदादे, संदीप पवार, रोहित दाते, अशोक पाचुंदकर, अर्चना थोरात, वर्षा पवार, सोनल गोरडे, राहुल जगताप, स्नेहल निचित, सर्जेराव बोऱ्हाडे, भानुदास रोकडे, बाबासाहेब शेलार, भास्कर ओव्हाळ, शितल गायकवाड, वैशाली गायकवाड, ऋतुजा वराळ, पल्लवी पुदगाणे, विशाल कारखिले, इंदिरा जाधव, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, रेश्मा शेख, शोभना पाचंगे, रवींद्र सानप, ज्योती गायकवाड, उर्मिला कुसेकर, उत्तम शेलार, अमित उकिरडे, दिव्या कारकूड, शोभा मंदीलकर, संदीप भोगावडे, देवल शहा, रामभाऊ सरोदे, नितीन भंडारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अमोल गारुडी यांनी मानले.4
- कर्जमाफी प्रोसेस वर्षभर सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे1
- खड्डे, कोंडी आणि जीवघेणा प्रवास; चाकण MIDC मधील खड्ड्यांवर कर्मचाऱ्यांचा उद्रेक..! चाकण, पुणे : मर्सिडीज बेंझ, फॉक्सवॅगन, महिंद्रा, बजाज यांसारख्या कंपन्यांमुळे जगभरात ओळख निर्माण झालेल्या चाकण MIDC ची सध्या खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे मोठी दुरवस्था झाली आहे.पाच फेजमध्ये विस्तारलेल्या या औद्योगिक वसाहतीत दीड हजारांहून अधिक कंपन्या असून लाखो कर्मचारी दररोज ये-जा करतात. मात्र रस्त्यांची दुरवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. चाकण MIDC मधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतानाही मूलभूत सुविधांची कमतरता का, असा सवाल कर्मचारी आणि चाकण वाहतूक कोंडीमुक्त कृती समितीने उपस्थित केला आहे... #ChakanMIDC #Chakan #Pune #MIDC #ChakanTraffic #TrafficJam #RoadPotholes #RoadProblem #IndustrialArea #PuneNews #MaharashtraNews #चाकण #चाकणMIDC #वाहतूककोंडी #खड्डे #रस्त्यांचीदुरवस्था #उद्योगनगरी #पुणेन्यूज #दनायक #ThenayakNews1
- "ज्या मुलांनी शिव्या दिल्या... त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला संदेश..!"1
- Pray For Assam 🥺🙏 | इस मुश्किल घड़ी में असम के साथ खड़े हों असम में आई विनाशकारी बाढ़ ने चारों तरफ तबाही मचा रखी है। पानी का बहाव न केवल हज़ारों लोगों के घर बहा ले गया, बल्कि अनगिनत परिवारों की उम्मीदें और सपने भी तोड़ गया। इस बेहद कठिन और भावुक घड़ी में आइए मिलकर असम के लोगों के लिए दुआ करें और जिस भी तरह संभव हो, मदद का हाथ बढ़ाएं। Pray For Assam 🥺🙏 | इस मुश्किल घड़ी में असम के साथ खड़े हों असम में आई विनाशकारी बाढ़ ने चारों तरफ तबाही मचा रखी है। पानी का बहाव न केवल हज़ारों लोगों के घर बहा ले गया, बल्कि अनगिनत परिवारों की उम्मीदें और सपने भी तोड़ गया। इस बेहद कठिन और भावुक घड़ी में आइए मिलकर असम के लोगों के लिए दुआ करें और जिस भी तरह संभव हो, मदद का हाथ बढ़ाएं। Watch video1