खामगाव : टेंभुर्णा बायपासवरील वरखेड गावाजवळ आज, १३ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. बकऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुसऱ्या ट्रकचे चालक आणि क्लीनर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून, ट्रक मधील ७ ते ८ बकऱ्यांचाही अंत झाला आहे. ट्रक क्रमांक RJ-11-GD-3796 हा बकऱ्या घेऊन अकोल्याच्या दिशेने जात होता. पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास वरखेड गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक RJ-32-GB-8373 ने या ट्रकला अतिशय वेगात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक देणाऱ्या ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात धडक देणाऱ्या ट्रकचा चालक आणि क्लीनर दोघेही जागीच ठार झाले यामध्ये मोसम खान अशरू खान (वय ३२ वर्ष, रा. डवका, जि. अलवर, राजस्थान - चालक) इकबाल अली खान (वय २८ वर्ष, रा. नयना, ता. किसनगड, जि. अलवर, राजस्थान - क्लीनर) यांचा समावेश आहे.तसेच, समोरच्या ट्रकमध्ये असलेल्या बकऱ्यांपैकी ७ ते ८ बकऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाला असून इतर काही बकऱ्या जखमी झाल्या आहेत.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचा समोरचा भाग पूर्णपणे दबला गेल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. या अपघातामुळे बायपासवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
खामगाव : टेंभुर्णा बायपासवरील वरखेड गावाजवळ आज, १३ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. बकऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुसऱ्या ट्रकचे चालक आणि क्लीनर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून, ट्रक मधील ७ ते ८ बकऱ्यांचाही
अंत झाला आहे. ट्रक क्रमांक RJ-11-GD-3796 हा बकऱ्या घेऊन अकोल्याच्या दिशेने जात होता. पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास वरखेड गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक RJ-32-GB-8373 ने या ट्रकला अतिशय वेगात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक देणाऱ्या ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात धडक देणाऱ्या ट्रकचा चालक
आणि क्लीनर दोघेही जागीच ठार झाले यामध्ये मोसम खान अशरू खान (वय ३२ वर्ष, रा. डवका, जि. अलवर, राजस्थान - चालक) इकबाल अली खान (वय २८ वर्ष, रा. नयना, ता. किसनगड, जि. अलवर, राजस्थान - क्लीनर) यांचा समावेश आहे.तसेच, समोरच्या ट्रकमध्ये असलेल्या बकऱ्यांपैकी ७ ते ८ बकऱ्यांचा या अपघातात
मृत्यू झाला असून इतर काही बकऱ्या जखमी झाल्या आहेत.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचा समोरचा भाग पूर्णपणे दबला गेल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. या अपघातामुळे बायपासवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
- दादा भाऊ ससानेश्रीगोंदा, अहमदनगर, महाराष्ट्र👏on 14 March
- खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध मंडळांनी सादर केलेली लेझीम पथके आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, मध्यरात्री १२ वाजेपर्यंत चाललेली ही मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली. शोभायात्रेची सुरुवात करण्यापूर्वी सर्व मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय भीम'च्या जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली. या शोभायात्रेत शहर पोलीस स्टेशन आणि शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण ८ प्रमुख मंडळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सम्राट अशोक क्रीडा मंडळ (बाळापूर फैल), मिमशक्ती क्रीडा मंडळ (बाळापूर फैल), पंचशील क्रीडा मंडळ (बकरी बाजार, बाळापूर फैल), सम्राट क्रीडा मंडळ (हरी फैल), समता क्रीडा मंडळ (शंकर नगर), तथागत बहुउद्देशीय नवयुवक मंडळ (हिरा नगर) व अशोक क्रीडा मंडळ (दालफैल), सिद्धार्थ क्रीडा मंडळ (नवा फैल) सहभागी झाले होते.मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांनी लेझीमचा चित्तथरारक खेळ सादर केला. तसेच, अनेक मंडळांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे जिवंत देखावे सादर केले होते. रस्ते भीमभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आणि सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत चाललेली ही मिरवणूक कोणत्याही गालबोटाविना शांततेत पार पडली. प्रशासनाने आणि शहरवासीयांनी या शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक केले आहे.1
- जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदन.. मातंग समाजाच्या वतीने निवेदन1
- संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण शेगाव (प्रतिनिधी): संत नगरी शेगावमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाने तब्बल ४० ते ४१ अंश सेल्सियस गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडलेले दिसत असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारच्या वेळेत सूर्याची कडक किरणे अंगावर झोंबत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. बाजार मार्केट,चौक-चौकात, तसेच शेगांव -खामगांव रोड नेहमीची वर्दळ कमी झाली असून,हॉटेल,कापडं मार्केट,चौपाटी स्टॊल,व्यावसायिक यांना उकाड्याचा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संत नगरीत उन्हाचा कहर सुरूच; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता!1
- मका विक्रीसाठी आणला, पण बाजाराबाहेरच थांबला शेतकऱ्यांचा संताप उसळला1
- महावितरणचा 'शॉक'! बुलढाण्यात विद्युत तारेच्या घर्षणामुळे साडेचार एकर मका जळून खाक1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- Post by Abdul Naeem1
- खामगाव : शहराच्या मुख्य भागातील बर्डे कॉम्प्लेक्ससमोरील नाली चोकअप झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या भागातील नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. परिणामी, सांडपाण्याचा निचरा होण्याऐवजी ते पाणी मुख्य रस्त्यावर साचत आहे. रस्त्यावर साचलेल्या या घाण पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.विशेषतः पादचाऱ्यांना या घाण पाण्यातून पाय तुडवत मार्ग काढावा लागत असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.येथील व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी तक्रार केली आहे की, ही समस्या वारंवार उद्भवत असूनही नगरपालिका प्रशासनाकडून याकडे कायमस्वरूपी लक्ष दिले जात नाही.चोकअप झालेली नाली तात्काळ मोकळी करून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी आता जोर धरत आहे.नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन या समस्येतून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.1