मराठवाडा स्तरीय वाद विवाद स्पर्धा उदगीर येथे संपन्न विभागीय वादविवाद स्पर्धेत गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालयाचा संघ विजेता उदगीर-(एल पी उगिले ) येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी वाद विवाद स्पर्धा विभागीय पातळीवर घेतली जाते. या स्पर्धेमध्ये गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विद्यालयातील यशस्वी विद्यार्थिनींच्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे हे 46 वे वर्ष आहे. एकूण 45 संघातील 90 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत दर्जेदार पद्धतीच्या या स्पर्धा संपन्न झाल्या. यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्रजी अलुरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे, नरेंद्र मेडेवार, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार मस्के , भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी मधुकरराव वटृमवार, शंकरराव लासुणे,शिवाजी बिराजदार, मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर, अंकुश मिरगुडे हे उपस्थित होते. परीक्षक म्हणून कार्य केलेल्या नयन राजमाने व बालाजी भंडारे यांनी मनोगतातून वक्तृत्व कसे असावे? नवीन नवीन गोष्टी आत्मसात करून जबाबदारी पार पाडत जाणे, अनुभव घेणे अशा गोष्टी अशा स्पर्धेतून प्राप्त होत असतात. अपयश पचवण्याची तयारी असावी. स्पर्धा जरूर असावी, पण त्यात संवेदना असावी. असे विचार मांडले. प्रमुख पाहुणे गजानन भातलवंडे यांनी अशा स्पर्धेतून नवीन अनुभव मिळतात, संगत चांगली करा चांगल्या लोकांच्या सहवासात रहा, नेहमी प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल असे सांगितले. नरेंद्र मेडेवार यांनी वक्तृत्व ही कला आहे. मोठी माणसे वक्तृत्वामुळे अधिक मोठी होतात, असे विचार मांडले . प्राचार्य राजकुमार मस्के यांनी वादाला विवादाची आणि विवादाला वादाची जोड मिळाली की आयुष्य सुंदर होते. यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होते. अपयशही पचवता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील असावं असं वक्तव्य केलं. अध्यक्षीय समारोपात डॉ. सुरेंद्र आलूरकर यांनी जिंकण्याच्या ईर्षेनेच स्पर्धेत सहभागी व्हावे, आपले मत, आपले विचार आपल्याला ठामपणे मांडता आले पाहिजेत. तुमचं भवितव्य तुम्हीच ठरवणार आहात, म्हणून चांगली संगत,प्रामाणिकपणा सतत कष्ट करण्याची तयारी ठेवा असे विचार मांडले. या मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस ढाल आणि १०हजार रुपये पारितोषिकाचे मानकरी लातूर येथील गोदावरी देवी लाहोटी विद्यालय ठरला आहे. तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 7000 रुपये पारितोषकाचे मानकरी लातूर येथील ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला आहे.तृतीय पारितोषक शाहू विद्यालय शेळगाव यांना प्राप्त झाले आहे. चतुर्थ संघ लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीर, सर्वपंचम संघ संभाजीराव बडगीर माध्यमिक विद्यालय ममदापूर हे मानकरी ठरले आहेत. ग्रामीण मुलीत प्रथम गायत्री अदनाक, द्वितीय आरती मोकळे, तृतीय सायली पाडोळे , चौथी अक्षरा इप्पर, पाचवी प्रज्ञा घोडके, ग्रामीण मुलात प्रथम अभिलाष निरगुडे, द्वितीय शुभम देवनाळे, तृतीय शिवशंकर कदम, चौथा निशांत तांबे पाचवा संकेत कदम , शहरी मुलीत प्रथम वैदेही पाटील, द्वितीय रजनी कलमुरे, तृतीय प्रियंका मुंढे ,चौथी श्रेयणी चिद्रेवार व स्नेहल हंचाटे, पाचवी श्रुति माचपल्ले, शहरी मुलात प्रथम खुजाओद्दीन नाजमोद्दीन, द्वितीय संकेत शेरीकर, तृतीय पुष्कर जाधव व श्रीतेज कुलकर्णी, चौथा हर्षल चव्हाण, पाचवा विश्वजीत जाधव या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया गोविंदवाड व करुणा गायकवाड यांनी केले. अहवाल वाचन वादविवाद प्रमुख अनिता मुळखेडे यांनी केले. स्वागत व परिचय लक्ष्मी चव्हाण यांनी केले, निकाल वाचन अनिता येलमटे व अंबिका पारसेवार, वैयक्तिक गीत प्रीती शेंडे, आभार संजयराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कल्याणमंत्र रूपाली थोरात यांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक कृष्णा मारावार, किरण नेमट, माधव मठवाले, वादविवाद सहप्रमुख राहुल नेटके, निलेश मांडवकर व्यवस्थेतील सर्वच शिक्षकांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.

- राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.1
- दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..1
- Post by EKMAT DIGITAL1
- लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती7
- 🔥 सिरपल्ली येथे शेतकऱ्याच्या घराला आग; सहा शेळीपिल्लांचा मृत्यू हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे दुपारी सुमारे १.३० वाजता शेतकरी किसन आबाजी जाधव यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या भीषण घटनेत सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू झाला असून घरातील साहित्य व टिनपत्रा जळून खाक झाले. आधीच खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीने त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 🙏 #सिरपल्ली #हिमायतनगर #शेतकरीसंकट #आगघटना #ग्रामीणवार्ता #शासनमदत #FarmerDistress #मदतीचीगरज #NNLDigitalMedia1
- खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.1