नांदेडमध्ये मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २७ मुलींना मोफत लस. नांदेड प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुमती व्याहाळकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रमेश माने यांच्या हस्ते, तर डॉ. रमेश नारलावार यांच्या अध्यक्षतेखाली आणि शीतल खांडील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. मुलींमध्ये होणारा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी राबविण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत २७ मुलींना सुमारे ४,५०० रुपये किंमतीची एचपीव्ही लस पूर्णपणे मोफत देण्यात आली. भाजप नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्रेकरू संघ तसेच मनपा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशक्तीनगर, नांदेड येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमास खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे तसेच लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले. संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी शिबिरामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना समाजात कर्करोग प्रतिबंधाबाबत जनजागृती होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिठे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. रितेशसिंह बिसेन यांनी मार्गदर्शन करताना एचपीव्ही लसीबाबत समाजमाध्यमांवर पसरविण्यात येणाऱ्या गैरसमजुती दूर करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी बालाजी निलपत्रेवार, अनिल सूर्यवंशी, पुष्पराज राठोड, अशोक साखरे, कालिंदी कहाळेकर, रेखा नगारे, किशनराव पाळवेकर, दमाम, फुलाबाई भोसले, कुसुमताई नागनूरवार आणि किशोर लोंढे यांचा शिरोपाव व मोत्याची माळ देऊन सत्कार करण्यात आला. माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांच्या हस्ते लस घेतलेल्या मुलींना गुलाबपुष्प देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेशसिंह ठाकूर यांनी केले, तर आभार नरसिंह कहाळेकर यांनी मानले. मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शेख फिरोज, रवि धुतमल, शेख सुमैय्या, अनुराधा शिवशेट्टे, अंबिका थोटे, देऊबाई लव्हाळे, अनिता हनमंते, पुष्पा खाडे, जिजाबाई गायकवाड आणि लता सूर्यवंशी यांनी कर्तव्य बजावत शिबिर यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच दीपकसिंह ठाकूर, संतोष भारती, गजानन कापसे, नारायण पाळवेकर, दिगंबर येडशीकर, राहुल बनसोडे आणि महादू लुटे यांनी विशेष परिश्रम घेतले. नांदेड शहरात कर्करोग प्रतिबंधासाठी अशा प्रकारचे पहिलेच शिबिर आयोजित केल्याबद्दल ॲड. दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

- नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.1
- Post by Today One Live1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Mohsin ahmed khan1
- खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ1
- Post by Mushtaq Shaikh1
- Post by Today One Live1