logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ग्रामपंचायत म्हारळ आर्थिक अनियमितता प्रकरण : दोषींवर कारवाईची मागणी; उपकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या निलंबनाचीही मागणी ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत म्हारळ येथे शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील विकासकामे व निधी खर्चात कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, चौकशी अहवालात निष्कर्ष नोंदविल्यानंतरही संबंधितांवर ठोस कारवाई न झाल्याने प्रकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)चे ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी उपकार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई करून दोषींना संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे. चंदने यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत सदस्यांनी ४ मार्च २०२४ रोजी कल्याण पंचायत समितीकडे तक्रार केली होती. त्यानंतर ३ डिसेंबर २०२४ रोजी पुन्हा सविस्तर तक्रार सादर करण्यात आली. जिल्हा परिषद ठाणे यांच्या स्मरणपत्रांनंतर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पराग भोसले यांनी चौकशी करून २८ एप्रिल २०२५ रोजी अहवाल सादर केला. चौकशी अहवालानुसार, ग्रामविकास अधिकारी नितीन चव्हाण आणि तत्कालीन सरपंच निलिमा म्हात्रे यांनी ग्रामनिधीतील ₹२५,१३,२१५ व पाणीपुरवठा खात्यातील ₹१५,८६,१९६ अशा एकूण ₹४०,९९,४११ रुपयांच्या खर्चात महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता, २०११ मधील नियम ११(८), २०(१) व २४(ग)(१५) चे उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील नियम ३ चे उल्लंघन झाल्याचाही ठपका अहवालात ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा अहवाल सुमारे नऊ महिने प्रलंबित राहिल्यानंतर २७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२६ रोजी उपकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी गटविकास अधिकारी, कल्याण यांना ग्रामसेवकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जाते. तत्कालीन सरपंचांचा खुलासा प्रलंबित असल्याने त्यांच्याविरोधातील कारवाईबाबत अभिप्रायही मागविण्यात आला होता. तथापि, त्यानंतरही पुढील कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे निवेदन देऊन उपकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्याविरोधात उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना निलंबित करावे, तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आरपीआय (सेक्युलर)ने केली आहे. रवींद्र चंदने यांनी इशारा देताना म्हटले की, "जनतेच्या कराच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्यांना आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाल्याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) स्वस्थ बसणार नाही." टीप : या वृत्तातील आरोप हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)चे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी केलेले आहेत. संबंधित अधिकारी किंवा इतर संबंधित पक्षांची भूमिका उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

1 hr ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
1 hr ago
9f639e15-8b94-4627-90fb-2bf6ff5d8d3b

ग्रामपंचायत म्हारळ आर्थिक अनियमितता प्रकरण : दोषींवर कारवाईची मागणी; उपकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या निलंबनाचीही मागणी ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत म्हारळ येथे शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील विकासकामे व निधी खर्चात कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, चौकशी अहवालात निष्कर्ष नोंदविल्यानंतरही संबंधितांवर ठोस कारवाई न झाल्याने प्रकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)चे ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी उपकार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई करून दोषींना संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे. चंदने यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत सदस्यांनी ४ मार्च २०२४ रोजी कल्याण पंचायत समितीकडे तक्रार केली होती. त्यानंतर ३ डिसेंबर २०२४ रोजी पुन्हा सविस्तर तक्रार सादर करण्यात आली. जिल्हा परिषद ठाणे यांच्या स्मरणपत्रांनंतर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पराग भोसले यांनी चौकशी करून २८ एप्रिल २०२५ रोजी अहवाल सादर केला. चौकशी अहवालानुसार, ग्रामविकास अधिकारी नितीन चव्हाण आणि तत्कालीन सरपंच निलिमा म्हात्रे यांनी ग्रामनिधीतील ₹२५,१३,२१५ व पाणीपुरवठा खात्यातील ₹१५,८६,१९६ अशा एकूण ₹४०,९९,४११ रुपयांच्या खर्चात महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता, २०११ मधील नियम ११(८), २०(१) व २४(ग)(१५) चे उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील नियम

ba447b85-dcc5-4ee9-923b-dbbbd8a1d55a

३ चे उल्लंघन झाल्याचाही ठपका अहवालात ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा अहवाल सुमारे नऊ महिने प्रलंबित राहिल्यानंतर २७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२६ रोजी उपकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी गटविकास अधिकारी, कल्याण यांना ग्रामसेवकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जाते. तत्कालीन सरपंचांचा खुलासा प्रलंबित असल्याने त्यांच्याविरोधातील कारवाईबाबत अभिप्रायही मागविण्यात आला होता. तथापि, त्यानंतरही पुढील कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे निवेदन देऊन उपकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्याविरोधात उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना निलंबित करावे, तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आरपीआय (सेक्युलर)ने केली आहे. रवींद्र चंदने यांनी इशारा देताना म्हटले की, "जनतेच्या कराच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्यांना आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाल्याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) स्वस्थ बसणार नाही." टीप : या वृत्तातील आरोप हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)चे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी केलेले आहेत. संबंधित अधिकारी किंवा इतर संबंधित पक्षांची भूमिका उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    1
    9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची  जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    user_Nilesh Nana Dhinda
    Nilesh Nana Dhinda
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • राबोडी के सागर अपार्टमेंट के नीचे देर रात तक युवक कर रहे हैं खुलेआम नशा स्थानीय लोग परेशान..!
    1
    राबोडी के सागर अपार्टमेंट के नीचे देर रात तक युवक कर रहे हैं खुलेआम नशा स्थानीय लोग परेशान..!
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    6 min ago
  • 5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी। 5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी।
    1
    5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा।
मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी।
5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा।
मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी।
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    32 min ago
  • पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan विरार वेस्ट के नारंगी गांव में एक भयानक पारिवारिक झगड़ा सामने आया है।जहां आठ महीने के बच्चे की कस्टडी को लेकर ससुर और 28 साल की बहू के बीच हुए विवाद में बहु की मौत हो गई। इस मामले में बोलिंगज पुलिस ने ससुर के खिलाफ गैर-इरादतन हत्या का केस दर्ज कर उसे हिरासत में ले लिया है। पुलिस के मुताबिक, नारंगी गांव के भगताली में रहने वाले गणपत सखाराम पाटिल (60) पर आरोप है कि वह अपनी बहू प्राची कल्पेश पाटिल (28 इनके बीच जमती नही थी अनबन होते रहता था,गुरुवार सुबह प्राची का भाई विशाल पाटिल उसे उसकी मां के घर ले जाने आया था। उस समय प्राची की आठ महीने की बेटी गणपत पाटिल के कंधों पर थी।मां के घर जाते समय प्राची अपनी बेटी को अपने साथ ले जाने की कोशिश कर रही थी। लेकिन, इस बात पर उसके ससुर और बहू के बीच तीखी बहस हो गई। आरोप है कि बहस के दौरान गणपत पाटिल ने प्राची को ज़ोर से धक्का दिया जिससे वो ज़मीन पर गिर गई और सिर में गंभीर चोट लगने से उसकी मौके पर ही मौ-त हो गई। इस घटना के बाद, मृतक महिला के भाई विशाल पाटिल की शिकायत पर बोलिंगज पुलिस स्टेशन में इंडियन पीनल कोड की धारा 105 (गैर इरादतन हत्या) और 351(2) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने तुरंत आरोपी गणपत पाटिल को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है
    1
    पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan
पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan
विरार वेस्ट के नारंगी गांव में एक भयानक पारिवारिक झगड़ा सामने आया है।जहां आठ महीने के बच्चे की कस्टडी को लेकर ससुर और 28 साल की बहू के बीच हुए विवाद में बहु की मौत हो गई। इस मामले में बोलिंगज पुलिस ने ससुर के खिलाफ गैर-इरादतन हत्या का केस दर्ज कर उसे हिरासत में ले लिया है।
पुलिस के मुताबिक, नारंगी गांव के भगताली में रहने वाले गणपत सखाराम पाटिल (60) पर आरोप है कि वह अपनी बहू प्राची कल्पेश पाटिल (28 इनके बीच जमती नही थी अनबन होते रहता था,गुरुवार सुबह प्राची का भाई विशाल पाटिल उसे उसकी मां के घर ले जाने आया था। उस समय प्राची की आठ महीने की बेटी गणपत पाटिल के कंधों पर थी।मां के घर जाते समय प्राची अपनी बेटी को अपने साथ ले जाने की कोशिश कर रही थी। लेकिन, इस बात पर उसके ससुर और बहू के बीच तीखी बहस हो गई। आरोप है कि बहस के दौरान गणपत पाटिल ने प्राची को ज़ोर से धक्का दिया जिससे वो ज़मीन पर गिर गई और सिर में गंभीर चोट लगने से उसकी मौके पर ही मौ-त हो गई।
इस घटना के बाद, मृतक महिला के भाई विशाल पाटिल की शिकायत पर बोलिंगज पुलिस स्टेशन में इंडियन पीनल कोड की धारा 105 (गैर इरादतन हत्या) और 351(2) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने तुरंत आरोपी गणपत पाटिल को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Available for Sale Locality : Mumbra Area (dimensions) : 1035 Property Type : Flat / Apartment Property Condition : New Bedrooms (BHK) : 2 BHK Furnishing : Fully Furnished sanam
    1
    Available for Sale
Locality : Mumbra
Area (dimensions) : 1035
Property Type : Flat / Apartment
Property Condition : New
Bedrooms (BHK) : 2 BHK
Furnishing : Fully Furnished
sanam
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन जिल्हा परिषद शाळे मध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले. संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.
    1
    श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन 
जिल्हा परिषद शाळे मध्ये
 मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही  

जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर  शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले.
संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.