logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भिवंडीत आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणाने आदिवासी चिमुकल्याचा बळी ठाणे:एकीकडे देश 'डिझिटल इंडिया'च्या आणि महासत्तेच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीत एका आदिवासी मातेची प्रसूती रुग्णवाहिकेअभावी घरातच होते आणि उपचारांविना तिचा चिमुकला डोळ्यांदेखत जगाचा निरोप घेतो. भिवंडी तालुक्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील मैंदे बीजपाडा गावातील ही हृदयद्रावक घटना केवळ बालमृत्यू नसून, असंवेदनशील प्रशासनाने केलेला 'बळी' आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, भूमीपुत्र एल्गार संघटनेने याविरोधात एल्गार पुकारला आहे. भिवंडी तालुक्यातील मैंदे बीजपाडा येथील सविता विनोद रावते (वय ३२) या आदिवासी महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्याने तिच्या कुटुंबाने वारंवार संपर्क करूनही आरोग्य विभागाने गाडीची व्यवस्था केली नाही. खराब रस्ता आणि वाहनाची अनुपलब्धता यामुळे या मातेला प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचता आले नाही. अखेर त्या मातेने घरातच बाळाला जन्म दिला. रात्रभर ती माता आणि बाळ मदतीची वाट पाहत राहिले, मात्र प्रशासन फिरकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या निरागस बाळाने जगाचा निरोप घेतला. संतापजनक बाब म्हणजे, यापूर्वीही सविता यांचे एक बाळ अशाच प्रशासकीय दुर्लक्षामुळे दगावले होते. सविता रावते या वीटभट्टी मजूर आहेत. मागील नऊ महिन्यांच्या काळात त्यांची एकदाही सोनोग्राफी झाली नाही. कारण काय? तर सविता यांच्याकडे स्वतःचे आधार कार्ड असूनही, त्यांच्या पतीचे आधार कार्ड नसल्याचे तांत्रिक कारण देत आरोग्य विभागाने त्यांना तपासणीपासून वंचित ठेवले. "डिझिटल पुराव्यांच्या नावाखाली एका जिवाचा अधिकार नाकारणारी ही कोणती व्यवस्था?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण आजही चिंताजनक आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी शेकडो बालके कुपोषण आणि आरोग्य सोयींच्या अभावामुळे दगावतात. 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अशा घोषणा देणारे सरकार प्रत्यक्ष जमिनीवर मात्र अपयशी ठरत असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. दाभाड आरोग्य केंद्रात गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही, ही वस्तुस्थिती प्रशासनाच्या अनास्थेवर शिक्कामोर्तब करते. घटनेची माहिती मिळताच भूमीपुत्र एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार, कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये, दुष्यंत घायवट ,कृष्णा रावते, सविता पाटील व पदाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रावर धडक दिली. प्रमोद पवार यावेळी संतप्त होऊन म्हणाले, *"हा केवळ बालमृत्यू नाही, तर व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. आधार कार्ड नाही म्हणून उपचार नाकारणे ही विकृत मानसिकता आहे. इथल्या प्रशासनासाठी गरीब आदिवासी हे माणसं नसून जनावरं आहेत का? या महिलेच्या प्रसूती बाबत निष्काळजीपणा दाखवणाऱ्या सर्व संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही."असेही त्यांनी म्हणणे आहे. सध्या पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून बालकाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील बेजबाबदार सीएचओ (CHO) आणि संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. एका गरीब आदिवासी मातेच्या उरातून निघालेला आक्रोश मंत्रालयापर्यंत पोहोचणार का आणि दोषींना शिक्षा होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

1 day ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ठाणे :मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावापासून, चार किलोमीटर अंतरावरावरील दोन हजार लोकवस्ती असलेल्या, झाडघर व मुहुवाडी येथे पाणी टंचाईच्या झळा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात, जाणवू लागल्याने आदिवासी बांधवांना नेहमी प्रमाणे पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. संबंधित आदिवासी बांधवांना रोजगारासाठी आळेफाटा, बनकर फाटा,इत्यादी ठिकाणी जावे लागते. पहाटे चार वाजता त्यांना टेंपो मधुन प्रवास करीत ,माळशेज घाट मार्गे जावे लागते, तर घरी येण्यासाठी रात्री आठ वाजतात, आशा परिस्थितीत, पाणी टंचाई निर्माण झाल्यावर ,दैनंदिन कामात अडथळा येतो. खेदजनक बाब म्हणजे झाडघर, मुहुवाडी ग्रामस्थांनी, आठ दिवसांपूर्वी टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु अजुन पर्यंत तरी शासनाने दखल घेतली नसल्याने ,आदिवासी बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
    1
    ठाणे :मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावापासून, चार किलोमीटर अंतरावरावरील दोन हजार लोकवस्ती असलेल्या, झाडघर व मुहुवाडी येथे पाणी टंचाईच्या झळा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात, जाणवू लागल्याने आदिवासी बांधवांना नेहमी प्रमाणे पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. संबंधित आदिवासी बांधवांना रोजगारासाठी आळेफाटा, बनकर फाटा,इत्यादी ठिकाणी जावे लागते. पहाटे चार वाजता त्यांना टेंपो मधुन प्रवास करीत ,माळशेज घाट मार्गे जावे लागते, तर घरी येण्यासाठी रात्री आठ वाजतात, आशा परिस्थितीत, पाणी टंचाई निर्माण झाल्यावर ,दैनंदिन कामात अडथळा येतो. खेदजनक बाब म्हणजे झाडघर, मुहुवाडी ग्रामस्थांनी, आठ दिवसांपूर्वी टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु अजुन पर्यंत तरी शासनाने दखल घेतली नसल्याने ,आदिवासी बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जनहित न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक हरी आल्हाट 9960504729
    1
    जनहित न्यूज महाराष्ट्र
मुख्य संपादक हरी आल्हाट 
9960504729
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Amit kumar singh
    2
    Post by Amit kumar singh
    user_Amit kumar singh
    Amit kumar singh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • घर के बाहर ही बदहाली—प्रभाग का विकास कैसे होगा? कल्पना सूर्यवंशी ने मनीषा भगत पर साधा निशाना | Breaking Bytes
    1
    घर के बाहर ही बदहाली—प्रभाग का विकास कैसे होगा? कल्पना सूर्यवंशी ने मनीषा भगत पर साधा निशाना | Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नाबालिक लड़कीं को सोशल मीडिया में बदनाम करने वाली महिला गिरफ्तार || Islamuddin Khan
    1
    नाबालिक लड़कीं को सोशल मीडिया में बदनाम करने वाली महिला गिरफ्तार || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नताशा आव्हाड के चूहा पूल में हो रहे अवैध भरनी को कल्पना सूर्यवंशी ने बताया पॉलिटिकली स्टंट। #viral
    1
    नताशा आव्हाड के चूहा पूल में हो रहे अवैध भरनी को कल्पना सूर्यवंशी ने बताया पॉलिटिकली स्टंट। #viral
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • नताशा जितेन्द्र आव्हाड के एक्शन से हिला डम्पर माफिया, गेट तोड़कर खोला रास्ता, नफीस की खबर का असर
    1
    नताशा जितेन्द्र आव्हाड के एक्शन से हिला डम्पर माफिया, गेट तोड़कर खोला रास्ता, नफीस की खबर का असर
    user_Nafis Pathan Buland Awaaz
    Nafis Pathan Buland Awaaz
    Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मनसे एक्शन में,ऑटो ड्राइवर को मराठी जरूरी,रिक्शे पर स्टीकर || Islamuddin Khan
    1
    मनसे एक्शन में,ऑटो ड्राइवर को मराठी जरूरी,रिक्शे पर स्टीकर || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.