शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे २७ ऑगस्टला तीव्र निदर्शने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे २७ ऑगस्टला तीव्र निदर्शने बीड : महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा)च्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय, जिल्हा परिषद, बीड येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. मुप्टाचे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने आणि बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ऑनलाइन संचमान्यतेतील जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संचमान्यता देण्यात यावी, तसेच इयत्ता अकरावी-बारावी विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिक बॅचची विद्यार्थीसंख्या ३० ऐवजी पूर्वीप्रमाणे २० विद्यार्थ्यांची करावी, अशी प्रमुख मागणी मुप्टाने केली आहे. यासोबतच शिक्षकांची वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीतील फरकाची प्रलंबित देयके तात्काळ अदा करावीत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची बंद करण्यात आलेली जीपीएफ खाती पूर्ववत करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता रोखीने अदा करावा, सर्व शिक्षकांची जीपीएफ खाती ऑनलाइन करून ऑनलाइन स्लिप वितरित कराव्यात, अनुदानाचा प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावा आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे. शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या तीव्र निदर्शनास बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुप्टाचे जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे, ज्युनियर विभाग जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा. संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, प्राथमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत यांच्यासह मुप्टाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. “शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हावे आणि २७ ऑगस्टच्या निदर्शनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन मुप्टाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

- बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण! बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण! बीड शहरातील मोंढा भागातील सुप्रसिद्ध आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या दर्गाह हजरत मन्सूर शाहवली सहरवर्दी (रहे.अ.) यांचा वार्षिक संदल व उरूस शरीफ सोहळा २७ ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात संपन्न होत असतो. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्थानिक नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या सह दर्ग्यात बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, अशफाक इनामदार, प्रमोद शिंदे, भैय्यासाहेब मोरे, रणजीत बनसोडे, मनोज गोडसे यांच्यासह इतर नगरसेवकांकडून पवित्र चादर चढवून देश आणि राज्यात शांतता, सलोखा व समृद्धी नांदण्यासाठी विशेष दुवा करण्यात आली. गुरुवारी दुपारी दर्गाह शरीफ येथे सुगंधी संदल आणि अत्तराचा शिडकाव करत, बाबांच्या मजारवर अकीदतीने पवित्र चादर अर्पण करण्यात आली.2
- Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे! Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!1
- ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह. 'ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन पाहायला मिळाले. एका बाजूला मुस्लिम बांधवांनी भव्य आणि शांततापूर्ण जुलूस काढला, तर दुसऱ्या बाजूला 'अल-कुरेशी बॉईज'च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवण्यात आला आहे. पाहूया या विशेष कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ढोरकीन शहरात आज भव्य जुलूस काढण्यात आला. तसेच 'अल-कुरेशी बॉईज, ढोरकीन' यांच्या पुढाकाराने राजाबाग सवार दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. "चला रक्तदान मोहीम राबवूया... रक्तदान करून जीव वाचवूया" हा संदेश देत तरुणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. संकलित झालेले रक्त 'दत्ताजी भाले रक्तकेंद्र' यांच्या माध्यमातून गरजूंसाठी उपलब्ध केले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मौलाना काशिफ रजा, मौलाना अबू, सुफियान कुरेशी, निसार कुरेशी, जावेद कुरेशी, अय्यूब कुरेशी, जब्बार कुरेशी, जुबेर कुरेशी, मोईन कुरेशी, इरफान कुरेशी, मुक्रम कुरेशी, इम्रान कुरेशी, मुजीब कुरेशी, इस्माईल कुरेशी, अजिम कुरेशी, युनुस कुरेशी, फकिर कुरेशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांची मोठी उपस्थिती होती.1
- चंदनझिरा पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा; अत्याधुनिक इमारतीचा शुभारंभ!.. साडेपाच कोटींच्या निधीतून भव्य इमारत उभारणार; MIDC परिसरात २ हजार चौ.मी. जागा उपलब्ध.. वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मिळणार अत्याधुनिक सुविधा.. चंदनझिरा पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा; अत्याधुनिक इमारतीचा शुभारंभ!.. साडेपाच कोटींच्या निधीतून भव्य इमारत उभारणार; MIDC परिसरात २ हजार चौ.मी. जागा उपलब्ध.. वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मिळणार अत्याधुनिक सुविधा.. आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या इमारतीच्या प्रतीक्षेत असलेल्या चंदनझिरा पोलीस ठाण्याला अखेर हक्काची जागा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या माध्यमातून तब्बल साडेपाच कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या नवीन अत्याधुनिक पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी MIDC परिसरात उत्साहात पार पडले. त्यामुळे चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या आधुनिक इमारतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. MIDC परिसरातील नियोजित जागेवर आयोजित भूमिपूजन कार्यक्रम आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, उद्योजक घनश्याम शेठ गोयल, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी आणि उद्योजक अरुण अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी केले. यावेळी बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, जालना शहरातील पोलीस ठाण्यांना स्वतःच्या आणि सुसज्ज इमारती मिळाव्यात, यासाठी गृह खात्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.1
- DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, गुन्हेगारी, विकासकामे, स्थानिक समस्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. 📍 धाराशिव | उस्मानाबाद व परिसर 🗓️ दिनांक : २७ ऑगस्ट २०२६ अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी झुंजार SC 37 NEWS OSMANABAD चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा. 📞 संपर्क : 08805974164 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share ↗️ करा आणि तुमचे मत Comment मध्ये नक्की कळवा.1
- जालन्यात पुन्हा थरार एक ४० वर्षिया तरुणाची धारदार शस्त्र ने अज्ञात हल्लेखोरांनी खपा खप धारदार शस्त्र ने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली कानून आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह1
- शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे तीव्र निदर्शने माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन; प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी - शरद मगर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे तीव्र निदर्शने माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन; प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी - शरद मगर बीड : महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा) बीड जिल्हा शाखेच्या वतीने प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड येथे तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण विभागाकडे सादर करून प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद मगर व पदाधिकारी शिक्षक प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुप्टाच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सध्या असलेली ३० विद्यार्थ्यांची बॅच रद्द करून पूर्वीप्रमाणे २० विद्यार्थ्यांची बॅच कायम ठेवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयके तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय देयके, वरिष्ठ वेतनश्रेणी फरक, निवडश्रेणी फरक तसेच सातवा वेतन आयोग फरक यांचा समावेश आहे. शिक्षण विभागातील वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या प्रलंबित संचिका तात्काळ मंजूर कराव्यात, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ आयडीच्या शिफारस प्रस्तावांचा तातडीने निपटारा करावा, जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे त्वरीत समायोजन करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. सन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांची बंद करण्यात आलेली जीपीएफ खाती पूर्ववत करून नियमित कपात सुरू करावी. सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पाचवा हप्ता रोखीने द्यावा. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पर्यंतची जीपीएफ खाते स्लिप वितरित करून जीपीएफ खाती ऑनलाइन करण्यात यावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय प्रचलित अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यात यावा आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. यावेळी मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष शरद मगर आणि जिल्हासचिव शशिकांत जावळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. अन्यथा लवकरच छत्रपती संभाजीनगर कारल्या बाहेर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.2
- जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव1