logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

इन्स्टाग्रामच्या आक्षेपार्ह कमेंटने धार्मिक भावना दुखावल्याने तणाव; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रात्री गावाला छावणीचे स्वरूप... इन्स्टाग्रामच्या आक्षेपार्ह कमेंटने धार्मिक भावना दुखावल्याने तणाव; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रात्री गावाला छावणीचे स्वरूप... जळगाव जामोद (प्रतिनिधी) : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे जामोद गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण जामोद गावाला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामोद येथील हरीष देविदास घाटोळे (वय २५) यांच्या फिर्यादीवरून कायमी अप क्र. 541/2026, कलम 299, 3(5) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीच्या आरोपानुसार,‘ahsanshaikh8126’ व ‘mr_sameer_22’ या इन्स्टाग्राम आयडीवरून एका पोस्टवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या. संबंधित मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने आपल्यासह सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे, जळगाव जामोद ठाणेदार सचिन बागुल, तामगाव ठाणेदार श्रीकांत निचळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड, पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे, पीएसआय गणेश कायंदे यांच्यासह जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, संपूर्ण प्रकरण शांत करण्यात पोलिसांना यश आले.रात्री उशिरापर्यंत जामोद परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान, सोशल मीडियावर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असा मजकूर, पोस्ट अथवा कमेंट व्हायरल करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड करीत आहेत.

2 hrs ago
user_अनिल भगत पत्रकार
अनिल भगत पत्रकार
जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
2 hrs ago

इन्स्टाग्रामच्या आक्षेपार्ह कमेंटने धार्मिक भावना दुखावल्याने तणाव; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रात्री गावाला छावणीचे स्वरूप... इन्स्टाग्रामच्या आक्षेपार्ह कमेंटने धार्मिक भावना दुखावल्याने तणाव; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रात्री गावाला छावणीचे स्वरूप... जळगाव जामोद (प्रतिनिधी) : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे जामोद गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण जामोद गावाला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामोद येथील हरीष देविदास घाटोळे (वय २५) यांच्या फिर्यादीवरून कायमी अप क्र. 541/2026, कलम 299, 3(5) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीच्या आरोपानुसार,‘ahsanshaikh8126’ व ‘mr_sameer_22’ या इन्स्टाग्राम आयडीवरून एका पोस्टवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या. संबंधित मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने आपल्यासह सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे, जळगाव जामोद ठाणेदार सचिन बागुल, तामगाव ठाणेदार श्रीकांत निचळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड, पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे, पीएसआय गणेश कायंदे यांच्यासह जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, संपूर्ण प्रकरण शांत करण्यात पोलिसांना यश आले.रात्री उशिरापर्यंत जामोद परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान, सोशल मीडियावर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असा मजकूर, पोस्ट अथवा कमेंट व्हायरल करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड करीत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मूर्तिजापूर-सोनोरीजवळ सफारीचा भीषण अपघात! वाहन पलटी, ५ जण जखमी; एअरबॅगमुळे जीव वाचला मूर्तिजापूर–सोनोरीजवळ सफारीचा भीषण अपघात! राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूहून मूर्तिजापूरकडे येणाऱ्या सफारी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन सुरक्षा भिंतीवर आदळून पलटी झाले. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनातील चारही एअरबॅग उघडल्याने मोठी जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत. 📍 घटनास्थळ: सोनोरी, मूर्तिजापूर 🚗 वाहन: MH 30 BW 9994 👥 जखमी: ५ 🏥 उपचार: अकोला अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी India News R7 ला Subscribe करा.
    1
    मूर्तिजापूर-सोनोरीजवळ सफारीचा भीषण अपघात! वाहन पलटी, ५ जण जखमी; एअरबॅगमुळे जीव वाचला
मूर्तिजापूर–सोनोरीजवळ सफारीचा भीषण अपघात! राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूहून मूर्तिजापूरकडे येणाऱ्या सफारी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन सुरक्षा भिंतीवर आदळून पलटी झाले.
या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनातील चारही एअरबॅग उघडल्याने मोठी जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.
📍 घटनास्थळ: सोनोरी, मूर्तिजापूर
🚗 वाहन: MH 30 BW 9994
👥 जखमी: ५
🏥 उपचार: अकोला
अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी India News R7 ला Subscribe करा.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    2
    सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे। चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
    1
    चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    2 hrs ago
  • हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26/08/26 कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले. या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    4
    हजरत मोहम्मद पैगंबर
 यांच्या जयंतीनिमित्त 
 आज दिनांक
26/08/26

कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली
कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले.

या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता.

पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    user_अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    Carpenter कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत. धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ
    1
    अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई
भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत.
धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ
    user_Anis Shaikh
    Anis Shaikh
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS ​#AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod
    1
    पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS
"पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS
​#AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    1 hr ago
  • सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    1
    सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर
ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    user_Santosh Mane
    Santosh Mane
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर - आमदार सुलभा खोडके.. ‎
    1
    मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर - आमदार सुलभा खोडके..
‎
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS kya sahaba ne milad manaya tha kya sahaba ne Eid milad manaya tha #eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal
    1
    kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod 
क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS 
kya sahaba ne milad manaya tha 
kya sahaba ne Eid milad manaya tha 
#eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.