Shuru
Apke Nagar Ki App…
सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
Santosh Mane
सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.1
- हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26/08/26 कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले. या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.4
- *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.2
- ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.4
- कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .1
- मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे1
- देश की शिक्षा पर खुलकर चर्चा | बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू Rok Tok Hindustan news imran shaikh देश की शिक्षा व्यवस्था, मौजूदा चुनौतियों और बच्चों के भविष्य जैसे अहम मुद्दों पर बाबा खान से खास बातचीत। देखिए Rok Tok Hindustan News पर बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू और जानिए शिक्षा को लेकर उनकी बेबाक राय। सच • साहस • सवाल | Rok Tok Hindustan News #RokTokHindustanNews #बाबाखान #शिक्षा #Education #EducationSystem #ExclusiveInterview #देशकीशिक्षा #MumbaiNews #MumbraNews #News #BreakingNews1
- *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास* वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.2