मायणी तलावातून चांद नदीत पाणी सोडले; उन्हाच्या झळांमध्ये शेतकऱ्यांना 'दिलासा' मायणी - प्रतिनिधी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशाने व खटावचे माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मायणी धरणातून चांद नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मायणी गटाचे भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा परिषद सदस्य अँड.सुरज पाटील यांच्या हस्ते पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. यावेळी जलसंपदा ,पाटबंधारे विभागाचे शहाजी काटकर,सोमनाथ थोरात, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी संभाजी कोळी, भाजपाचे पदाधिकारी अविनाश पवार, प्रसाद शेडगे,बंटी माने,राहुल तोरसे, दीपक पवार, सुरेश पवार,प्रसाद शेडगे, नामदेव पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शेतीसाठी पाण्याची मोठी गरज भासत होती. या दिवसात हिरव्या चारा पिकाची जोपासना करणे जिकिरीचे बनले होते. या पार्श्वभूमीवर चांद नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे विशेषत मायणी गाव परिसर,फुलेनगर,लक्ष्मी नगर,थोरात वस्ती, शेडगेवाडी, चितळी या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ऐन उन्हाळ्यात नदी प्रवाहित झाल्याने विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होऊन पिकांना जीवदान मिळणार आहे. "शेतकऱ्यांच्या हिताच्या पाणीप्रशासाठी नामदार जयकुमार गोरे, डॉ. दिलीपराव येळगावकर हे नेहमीच तत्पर असतात.त्यांच्या प्रयत्नांनी टेंभू योजनेचे हक्काचे पाणी भागातील शेतकऱ्यांसाठी मिळाले आहे. आज शेतकऱ्यांच्या हक्कातूनच मायणी तलावातून पाणी सुटल्यामुळे चांद नदीकाठच्या शेतीचा प्रश्न सुटला असून, यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे." अँड. सुरज पाटील (सदस्य, जि.प. सातारा) फोटो ओळी - मायणी ब्रिटिशकालीन तलावातून शेतकऱ्यांच्या मागणीवरून चांद नदीत पाणी सोडताना मायणी जि. प.सदस्य अँड.सूरज पाटील,संभाजी कोळी,अविनाश पवार,शहाजी काटकर,बंटी माने व अन्य ग्रामस्थ .(छाया - दत्ता कोळी)

- पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड झाली आहे. पणदरे गटातून निवडून आलेल्या किरण तावरे यांच्यावर संघटन कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या जोरावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार झाल्याची माहिती समोर येत आहे. निवडीनंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण विकास, शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या योजनांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रफुल्लित केंद्रामार्फत कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे प्रेरणादायी उपक्रम पार पडला. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. तसेच प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांचा ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.2
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पिंपरी चिंचवड : - अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews1
- Post by Vruttshakti Digital News1
- कोल्हापूर : रविराज कांबळे अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता कोल्हापुरातही उमटताना दिसत आहेत. शहरातील विविध गॅस एजन्सींच्या बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.संभाव्य गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी एजन्सींकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा जाणवणार नसून पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.1
- Post by Vruttshakti Digital News1