अमळनेर येथे पार पडलेल्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात पाचोराच्या कु.चेतना हिरे यांचा सहभाग अमळनेर येथे पार पडलेल्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात पाचोराच्या कु.चेतना हिरे यांचा सहभाग कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने आयोजित चौथे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलन दि.10/3/2026 रोजी अमळनेर येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत साहित्यिक सादरीकरण केले. या संमेलनात श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने “भीतीच्या सावटातील महिला दिवस” या विषयावर कविता सादर केली. तिच्या कवितेतून महिलांच्या सुरक्षिततेविषयीची भावना आणि समाजातील वास्तव परिस्थिती मांडण्यात आली. या संमेलनात कविता, बोली भाषेतील साहित्य ,कथाकथन, परिसंवाद आदी विविध साहित्यप्रकारांद्वारे विद्यार्थ्यांनी आपली साहित्यिक प्रतिभा सादर केली. संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्य क्षेत्रात आपले विचार मांडण्याची संधी मिळाली.या संमेलनाच्या समारोपाला चेतना हिरे हिने आपले मनोगत व्यक्त केले. चेतना हिरे हिला या सहभागासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ वासुदेव वले सर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. श्रावण तडवी सर, प्रा. अमित गायकवाड सर तसेच प्रा.जयश्रीताई वाघ मॅडम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व साहित्यप्रेमी उपस्थित होते

- Post by Swal Jansamannyaca ...1
- Post by Harshal patil2
- भोकरदन मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त विविध ठिकाणी अभिवादन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,आमदार संतोष दानवे,माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित.1
- घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच1
- छत्रपती संभाजी नगर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून जयंती साजरी केली1
- Md Tayyab Zafar Best Speech ॥ Eid Milan Program ॥ Organized by Vanchit Bahujan Aghadi1
- सिल्लोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम व्याख्यान, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी भीम जयंतीच्या जनतेस शुभेच्छा दिल्या1
- छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.1
- महावितरणचा 'शॉक'! बुलढाण्यात विद्युत तारेच्या घर्षणामुळे साडेचार एकर मका जळून खाक1