डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात अनुभवाधारित शिक्षणाचा नवा आदर्श अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. वंदना दुधमल यांच्या अभिनव पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन नांदेड, दि. 28 एप्रिल :- वैद्यकीय शिक्षणात अनुभवाधारित, कौशल्यकेंद्रित आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनपद्धती रुजविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या दूरदर्शी शैक्षणिक नेतृत्वाखाली शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी “भविष्यातील सक्षम व कौशल्यसंपन्न डॉक्टर घडविण्यासाठी अनुभवाधारित आणि विश्लेषणात्मक शिक्षणपद्धती आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. शरीरक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना दुधमल(कंधारे)यांच्या अभिनव संकल्पना, शैक्षणिक नियोजन व प्रभावी अंमलबजावणीमुळे हा उपक्रम संस्थेच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांपैकी एक ठरला असून, वैद्यकीय शिक्षणात “Learning by Doing” संकल्पनेचे प्रभावी उदाहरण म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे. प्रथम वर्ष एमबीबीएसच्या २० गटांतील १५१ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत मानवी शरीरक्रियेतील गुंतागुंतीच्या संकल्पना वैज्ञानिक, त्रिमितीय आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्सद्वारे सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचारशक्ती आणि सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन या स्पर्धेत घडले. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण व आधुनिक वैद्यकीय शिक्षणासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, विद्यार्थ्यांना पारंपरिक अध्यापनाबरोबरच अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. या दृष्टीकोनातूनच ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आल्याचे मानले जाते. प्रास्ताविकात डॉ. वंदना दुधमल (कंधारे) यांनी शरीरक्रियाशास्त्र विषय विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ, आकर्षक आणि समजण्यासारखा करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धेतील मानकरी विजेते प्रथम क्रमांक : गट क्र. ०५ (सर विल्यम मॅडॉक बेलीस) कृत्रिम मूत्रपिंड आणि डायलिसिस , द्वितीय क्रमांक : गट क्र. १५ (लुईस अँटोइन रनवीर) प्रकाश प्रतिक्षेप, तृतीय क्रमांक गट क्र. ०७ जॉन स्कॉट हलदणे- प्रतिप्रवाह यंत्रणा स्पर्धेचे परीक्षण डॉ. वैशाली इनामदार, डॉ. किशोर राठोड, डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. समीर व डॉ. बोडके यांनी केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे, उपअधिष्ठाता डॉ. शितल राठोड, डॉ. इस्माईल इनामदार,डॉ. हुमेरा, डॉ. भावना,डॉ. कदम, डॉ. देशमुख जे बी, डॉ. डाके, डॉ. माने, सतिश इंगळे ,मेट्रोन मुदिराज तसेच विविध विभागांतील प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता कदम यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शरीरक्रियाशास्त्र विभागातील प्राध्यापक, डॉ मसरत फिरदोस, डॉ. सीमा टाकरस, डॉ. नौशिन, निवासी डॉक्टर डॉ भागवत, डॉ अनुब्रता, डॉ अक्षय, डॉ अनिरुद्ध, डॉ. अली, डॉ. दीपक, डॉ सीमा, डॉ. सावंत,डॉ.यशस, डॉ इनशा लीपिक इंगोले,प्रयोगशाळा तंत्रज्ञ केंद्रे ,फोटोग्राफर रवी हिवाळे, इलेक्ट्रिशन चव्हाण तसेच श्रीमती पाटील व इतर कर्मचारी विजू मावशी, फुलकली मावशी आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Post by Sk Chand1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- कछरा का दिकत1
- Post by Today One Live1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई4
- नांदेड (प्रतिनिधी) : बिदर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात टिप्पर आणि ऑटो यांच्यात जोरदार धडक होऊन अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिप्पर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटोमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमी प्रवासी हे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरातील बेहारीपूर गावातील असल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 👉 अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.1
- माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित श्री. संग्राम हयगले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.1
- Post by Today One Live1