logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने अभिवादन उपमहापौर विलास शिंदे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले पुजन नाशिक :-महानगरपालिकेच्या वतीने केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर,विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त जगताप, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, मनीषा पाटेकर,कनिष्ठ अभियंता तेजल मोरे,साहेबराव भोसले,श्रीकांत भोई,रमेश पागे, संजय मोरे, मनोज गायधनी, रवी पवार आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

1 hr ago
user_PRASIDHI PRAMUKH NEWS
PRASIDHI PRAMUKH NEWS
पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
1 hr ago

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने अभिवादन उपमहापौर विलास शिंदे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले पुजन नाशिक :-महानगरपालिकेच्या वतीने केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर,विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त जगताप, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, मनीषा पाटेकर,कनिष्ठ अभियंता तेजल मोरे,साहेबराव भोसले,श्रीकांत भोई,रमेश पागे, संजय मोरे, मनोज गायधनी, रवी पवार आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन! मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार! निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला. हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 📍 निफाड नगरपंचायत 🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन! मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार! निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला. हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 📍 निफाड नगरपंचायत
    1
    🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन!
मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार!
निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला.
हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे.
यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
📍 निफाड नगरपंचायत


🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन!
मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार!
निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला.
हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे.
यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
📍 निफाड नगरपंचायत
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    4
    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली.
या पथसंचलनावेळी  अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली.
या पथसंचलनावेळी  अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.
    1
    पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान

अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न
पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान
अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न
पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *चांदवड येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; चंद्रेश्वर महादेव व सप्तर्षींच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी!* ​ अँकर :पवित्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून चांदवड येथील ऐतिहासिक व नयनरम्य श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज महिला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पावन भूमीत भल्या पहाटेपासूनच महिलांनी सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ​ऋषिपंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत कृतज्ञता, आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा मानला जातो. वर्षभरात नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मानवी जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला या दिवशी कठोर व्रत पाळतात. कंदमुळे, अळूची पाने आणि पिकांचे सात्विक अन्न ग्रहण करून, आघाड्याच्या वनस्पतिने दंतधावण करत नदी किंवा कुंडावर स्नान करून हे व्रत पूर्ण केले जाते. ​चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज सकाळी श्री सप्तर्षींची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर परिसर "हर हर महादेव" आणि ऋषीमुनींच्या जयघोषाने दुमदुमून गेला. ​ शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहून महिलांनी प्रथम सप्तर्षींचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली. ​ भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर ऋषीमुनींबद्दलची श्रद्धा आणि व्रत पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान स्पष्ट दिसत होते. ​ज्ञानाची परंपरा जपणारा आणि ऋषीमुनींच्या त्यागाचे स्मरण करून देणारा हा पावन सण चांदवडकरांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला.
    1
    *चांदवड येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; चंद्रेश्वर महादेव व सप्तर्षींच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी!* 
​
अँकर :पवित्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून चांदवड येथील ऐतिहासिक व नयनरम्य श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज महिला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पावन भूमीत भल्या पहाटेपासूनच महिलांनी सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
​ऋषिपंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत कृतज्ञता, आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा मानला जातो. वर्षभरात नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मानवी जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला या दिवशी कठोर व्रत पाळतात. कंदमुळे, अळूची पाने आणि पिकांचे सात्विक अन्न ग्रहण करून, आघाड्याच्या वनस्पतिने दंतधावण करत नदी किंवा कुंडावर स्नान करून हे व्रत पूर्ण केले जाते.
​चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज सकाळी श्री सप्तर्षींची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर परिसर "हर हर महादेव" आणि ऋषीमुनींच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
​ शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहून महिलांनी प्रथम सप्तर्षींचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली.
​ भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर ऋषीमुनींबद्दलची श्रद्धा आणि व्रत पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान स्पष्ट दिसत होते.
​ज्ञानाची परंपरा जपणारा आणि ऋषीमुनींच्या त्यागाचे स्मरण करून देणारा हा पावन सण चांदवडकरांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • दुचाकी चोरीप्रकरणी संशयीतास अटक; चांदवड येथील पोलिसांच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे दुचाकी चोरीचा तपास तळेगावरोही (ता. चांदवड) येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात चांदवड पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीतास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील रहिवासी फिर्यादी पंकज गोरखनाथ भोकनळ यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस हवालदार राजू गायकवाड, पोलीस अंमलदार योगेश हटकर, शिवनाथ शेळके, प्रदिप आजगे, विक्रम बस्ते व भूषण साळवे यांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत अत्यंत कौशल्याने तपास केला. या प्रकरणी पोलिसांना संशयित केदु शरद केदारे (रा. तळेगावरोही, ता. चांदवड) अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली. संशयीतास बुधवारी (दि. १६) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
    1
    दुचाकी चोरीप्रकरणी संशयीतास अटक; चांदवड येथील पोलिसांच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे दुचाकी चोरीचा तपास
तळेगावरोही (ता. चांदवड) येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात चांदवड पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीतास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील रहिवासी फिर्यादी पंकज गोरखनाथ भोकनळ यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस हवालदार राजू गायकवाड, पोलीस अंमलदार योगेश हटकर, शिवनाथ शेळके, प्रदिप आजगे, विक्रम बस्ते व भूषण साळवे यांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत अत्यंत कौशल्याने तपास केला. या प्रकरणी पोलिसांना संशयित केदु शरद केदारे (रा. तळेगावरोही, ता. चांदवड) अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली. संशयीतास बुधवारी (दि. १६) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
    user_Mahendra kantubhai Gujrathi
    Mahendra kantubhai Gujrathi
    Local News Reporter चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरू झालेला वैशाखरे येथील 'घरत' घराण्याचा गणेशोत्सव; १२० व्या वर्षात पदार्पण! माळशेज घाटाच्या निसर्गरम्य पायथ्याशी वसलेल्या वैशाखरे (ता. मुरबाड) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रतिष्ठित 'घरत' कुटुंबाच्या गणेशोत्सवाने यंदा १२० व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले आहे. हा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचालीकडे झुकणारा गणेशोत्सव घरत कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला. या उत्सवाचे औचित्य साधून नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्यास असलेले सर्व बंधू-भगिनी आणि आप्तेष्ट एकत्र आले होते. सकाळी ठीक १० वाजता वेदोक्त मंत्रोच्चारात आणि पारंपरिक विधींनुसार गणरायाची यथोचित पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती करून मनमोहक सजावट व आकर्षक रोषणाईच्या झगमगाटात विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९०६ सालापासूनचा समृद्ध वारसा घरत कुटुंबाच्या या गणेशोत्सवाचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. इसवी सन १९०६ मध्ये, स्वातंत्र्यलढ्याच्या काळात घरत कुटुंबातील पहिले कायदेपंडित (वकील) आणि तत्कालीन कुटुंबप्रमुख धर्माजी लक्ष्मण घरत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रप्रेमी विचारांतून आणि प्रेरणेतून या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती. धर्माजी लक्ष्मण घरत यांनी सुरू केलेली ही अखंड भक्तीची आणि समाजप्रबोधनाची परंपरा त्यांच्या पुढील पिढ्यांनी अत्यंत निष्ठेने जपली आहे. १९०६ ते २०२६ अशा तब्बल १२० वर्षांचा प्रदीर्घ आणि अविरत कालावधी पूर्ण करणाऱ्या या गणेशोत्सवामुळे केवळ घरत कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण वैशाखरे पंचक्रोशीत भक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरू झालेला वैशाखरे येथील 'घरत' घराण्याचा गणेशोत्सव; १२० व्या वर्षात पदार्पण!

माळशेज घाटाच्या निसर्गरम्य पायथ्याशी वसलेल्या वैशाखरे (ता. मुरबाड) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रतिष्ठित 'घरत' कुटुंबाच्या गणेशोत्सवाने यंदा १२० व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले आहे. हा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचालीकडे झुकणारा गणेशोत्सव घरत कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला.
या उत्सवाचे औचित्य साधून नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्यास असलेले सर्व बंधू-भगिनी आणि आप्तेष्ट एकत्र आले होते. सकाळी ठीक १० वाजता वेदोक्त मंत्रोच्चारात आणि पारंपरिक विधींनुसार गणरायाची यथोचित पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती करून मनमोहक सजावट व आकर्षक रोषणाईच्या झगमगाटात विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.
१९०६ सालापासूनचा समृद्ध वारसा
घरत कुटुंबाच्या या गणेशोत्सवाचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. इसवी सन १९०६ मध्ये, स्वातंत्र्यलढ्याच्या काळात घरत कुटुंबातील पहिले कायदेपंडित (वकील) आणि तत्कालीन कुटुंबप्रमुख धर्माजी लक्ष्मण घरत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रप्रेमी विचारांतून आणि प्रेरणेतून या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती.
धर्माजी लक्ष्मण घरत यांनी सुरू केलेली ही अखंड भक्तीची आणि समाजप्रबोधनाची परंपरा त्यांच्या पुढील पिढ्यांनी अत्यंत निष्ठेने जपली आहे. १९०६ ते २०२६ अशा तब्बल १२० वर्षांचा प्रदीर्घ आणि अविरत कालावधी पूर्ण करणाऱ्या या गणेशोत्सवामुळे केवळ घरत कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण वैशाखरे पंचक्रोशीत भक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी महापौरांचे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; स्काडा महिनाअखेर, बारा बंगला केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश नाशिक | प्रतिनिधी शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. १६) जोरदार वादंग झाला. सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कृत्रिम पाणीटंचाईचा ठपका पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्यावर ठेवत त्यांच्या बदलीसह कारवाईची मागणी करण्यात आली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपलाही सभागृहात घरचा आहेर मिळाला. भूषण राणे यांनी पवननगरचा पाणीपुरवठा कोणाच्या तरी दबावाखाली वळविला जात असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर बडगुजर यांनी पाणी वितरण व्यवस्था आणि पंपिंग यंत्रणेतील दोषांमुळेच पाणीप्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला. यावेळी मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमोल पाटील यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन टँकला भगदाड पडल्याचा मुद्दा उपस्थित केला. पाणीपुरवठा व्यवस्थेतील 'स्काडा' मीटर प्रणालीसह आनुषंगिक कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू आहेत. त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना महासभेत पाचारण केले. 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे, तर बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आयुक्तांनी मोरे यांना सुनावले. पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी मान्य करत आयुक्तांनी व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश दिले. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, चर्चेनंतर महापौरांनीही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, तसेच व्हॉल्व्हमनच्या विभागनिहाय तातडीने बदल्या कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ठोस नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही महापौरांनी प्रशासनाला बजावले. चौकट : आदेशांची वेळमर्यादा व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी कार्यकारी व कनिष्ठ अभियंत्यांवर महासभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त आणि महापौरांनी अधिकाऱ्यांना वेळमर्यादा देत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन नाशिककरांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी
महापौरांचे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; स्काडा महिनाअखेर, बारा बंगला केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
नाशिक | प्रतिनिधी
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. १६) जोरदार वादंग झाला. सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कृत्रिम पाणीटंचाईचा ठपका पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्यावर ठेवत त्यांच्या बदलीसह कारवाईची मागणी करण्यात आली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपलाही सभागृहात घरचा आहेर मिळाला.
भूषण राणे यांनी पवननगरचा पाणीपुरवठा कोणाच्या तरी दबावाखाली वळविला जात असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर बडगुजर यांनी पाणी वितरण व्यवस्था आणि पंपिंग यंत्रणेतील दोषांमुळेच पाणीप्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला. यावेळी मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमोल पाटील यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन टँकला भगदाड पडल्याचा मुद्दा उपस्थित केला.
पाणीपुरवठा व्यवस्थेतील 'स्काडा' मीटर प्रणालीसह आनुषंगिक कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू आहेत. त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना महासभेत पाचारण केले. 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे, तर बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आयुक्तांनी मोरे यांना सुनावले.
पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी मान्य करत आयुक्तांनी व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश दिले. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान, चर्चेनंतर महापौरांनीही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, तसेच व्हॉल्व्हमनच्या विभागनिहाय तातडीने बदल्या कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ठोस नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही महापौरांनी प्रशासनाला बजावले.
चौकट : आदेशांची वेळमर्यादा
व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन
'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित
बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण
सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक
पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी कार्यकारी व कनिष्ठ अभियंत्यांवर
महासभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त आणि महापौरांनी अधिकाऱ्यांना वेळमर्यादा देत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन नाशिककरांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
    1
    नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले

भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी
नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले
भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी
प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल 
बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात गणपती बाप्पांचे झांज व ढोलताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पांच्या आगमनासाठी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाप्पांच्या दर्शन घेतले. सर्वांनी बाप्पांकडे आपल्या व आपल्या देशासाठी शांतता, सुख व समृद्धी ची प्रार्थना केली.सर्वांना मोदक व खिरापत वाटप करण्यात आली. सदर बाप्पांच्या आगमनासाठी संदीप वाकचौरे, बाळासाहेब सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, मयूर भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    4
    एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन..
एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन..
अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात गणपती बाप्पांचे झांज व ढोलताशाच्या गजरात आगमन झाले.  बाप्पांच्या आगमनासाठी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाप्पांच्या दर्शन घेतले. सर्वांनी बाप्पांकडे आपल्या व आपल्या देशासाठी शांतता, सुख व समृद्धी ची प्रार्थना केली.सर्वांना मोदक व खिरापत वाटप करण्यात आली.
सदर बाप्पांच्या आगमनासाठी संदीप वाकचौरे, बाळासाहेब सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, मयूर भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.