दुचाकी चोरीप्रकरणी संशयीतास अटक; चांदवड येथील पोलिसांच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे दुचाकी चोरीचा तपास तळेगावरोही (ता. चांदवड) येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात चांदवड पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीतास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील रहिवासी फिर्यादी पंकज गोरखनाथ भोकनळ यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस हवालदार राजू गायकवाड, पोलीस अंमलदार योगेश हटकर, शिवनाथ शेळके, प्रदिप आजगे, विक्रम बस्ते व भूषण साळवे यांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत अत्यंत कौशल्याने तपास केला. या प्रकरणी पोलिसांना संशयित केदु शरद केदारे (रा. तळेगावरोही, ता. चांदवड) अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली. संशयीतास बुधवारी (दि. १६) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दुचाकी चोरीप्रकरणी संशयीतास अटक; चांदवड येथील पोलिसांच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे दुचाकी चोरीचा तपास तळेगावरोही (ता. चांदवड) येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात चांदवड पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीतास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील रहिवासी फिर्यादी पंकज गोरखनाथ भोकनळ यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस हवालदार राजू गायकवाड, पोलीस अंमलदार योगेश हटकर, शिवनाथ शेळके, प्रदिप आजगे, विक्रम बस्ते व भूषण साळवे यांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत अत्यंत कौशल्याने तपास केला. या प्रकरणी पोलिसांना संशयित केदु शरद केदारे (रा. तळेगावरोही, ता. चांदवड) अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली. संशयीतास बुधवारी (दि. १६) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
- *चांदवड येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; चंद्रेश्वर महादेव व सप्तर्षींच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी!* अँकर :पवित्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून चांदवड येथील ऐतिहासिक व नयनरम्य श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज महिला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पावन भूमीत भल्या पहाटेपासूनच महिलांनी सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ऋषिपंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत कृतज्ञता, आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा मानला जातो. वर्षभरात नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मानवी जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला या दिवशी कठोर व्रत पाळतात. कंदमुळे, अळूची पाने आणि पिकांचे सात्विक अन्न ग्रहण करून, आघाड्याच्या वनस्पतिने दंतधावण करत नदी किंवा कुंडावर स्नान करून हे व्रत पूर्ण केले जाते. चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज सकाळी श्री सप्तर्षींची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर परिसर "हर हर महादेव" आणि ऋषीमुनींच्या जयघोषाने दुमदुमून गेला. शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहून महिलांनी प्रथम सप्तर्षींचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली. भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर ऋषीमुनींबद्दलची श्रद्धा आणि व्रत पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान स्पष्ट दिसत होते. ज्ञानाची परंपरा जपणारा आणि ऋषीमुनींच्या त्यागाचे स्मरण करून देणारा हा पावन सण चांदवडकरांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला.1
- दुचाकी चोरीप्रकरणी संशयीतास अटक; चांदवड येथील पोलिसांच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे दुचाकी चोरीचा तपास तळेगावरोही (ता. चांदवड) येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात चांदवड पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीतास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील रहिवासी फिर्यादी पंकज गोरखनाथ भोकनळ यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस हवालदार राजू गायकवाड, पोलीस अंमलदार योगेश हटकर, शिवनाथ शेळके, प्रदिप आजगे, विक्रम बस्ते व भूषण साळवे यांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत अत्यंत कौशल्याने तपास केला. या प्रकरणी पोलिसांना संशयित केदु शरद केदारे (रा. तळेगावरोही, ता. चांदवड) अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली. संशयीतास बुधवारी (दि. १६) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.1
- एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात गणपती बाप्पांचे झांज व ढोलताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पांच्या आगमनासाठी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाप्पांच्या दर्शन घेतले. सर्वांनी बाप्पांकडे आपल्या व आपल्या देशासाठी शांतता, सुख व समृद्धी ची प्रार्थना केली.सर्वांना मोदक व खिरापत वाटप करण्यात आली. सदर बाप्पांच्या आगमनासाठी संदीप वाकचौरे, बाळासाहेब सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, मयूर भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.4
- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- पंचायत में भ्रष्टाचार की सभी आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके पंचायत में भ्रष्टाचार की सभी आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके1
- चोरीची ॲक्टिव्हा विक्रीसाठी आणणारा १८ वर्षीय ताब्यात..... गुन्हे शाखा युनिट २ची कारवाई; मुंबईनाका पोलिस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस नाशिक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट २च्या पथकाने चोरीची ॲक्टिव्हा विक्री करण्यासाठी आलेल्या १८ वर्षीय संशयिताला सिडको परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली असून, मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. वेदांत संजय चावरिया (वय १८, रा. गीतामळा, शताब्दी हॉस्पिटलमागे, हॅरिबेअर सोसायटीजवळ, मुंबईनाका, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी (१५ सप्टेंबर) गुन्हे शाखा युनिट २चे अधिकारी व कर्मचारी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त माहिती मिळाली. एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी सिडको येथील संभाजी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर पोलिस पथकाने संभाजी स्टेडियम परिसरात सापळा रचला. संशयित इसम तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ॲक्टिव्हा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली. त्याच्या कबुलीवरून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला. संशयितास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रविण वानखेडे, मनोज शिंदे, संतोष सुपेकर आणि चापोहवा अतुल पाटील यांच्या पथकाने केली.2
- शबरी योजनेतील ९९० गायींचे वास्तव काय? ७० हजारांची गाय की कागदोपत्री समृद्धी? एकच गाय चार वेळा खरेदी दाखवल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप; व्यापारी–अधिकाऱ्यांच्या संगनमताची चौकशी करण्याची मागणी1
- येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1