*तुटलेली मने सांधण्यासाठी 'महिला अन्याय विरोधी समिती'त सहभागी व्हा! नव्या सदस्यांसाठी आवाहन!* चोपडा (प्रतिनिधी ) संसारातील छोटे-मोठे वाद, पती-पत्नीमधील विसंवाद आणि कोर्ट-कचेऱ्यांच्या फेऱ्यात अडकलेली कुटुंबे वाचवण्यासाठी 'महिला अन्याय विरोधी समिती'ने राज्यभर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. आजवर शंभराहून अधिक विखुरलेले संसार पुन्हा उभे करणाऱ्या या समितीने आता आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, अमळनेरसह जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हा व राज्यातील सेवाभावी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात शुल्लक कारणावरून घटस्फोटापर्यंत पोहोचणारी प्रकरणे कौटुंबिक समुपदेशनाद्वारे (Counseling) सोडवली जाऊ शकतात. यामुळे दोन्ही परिवारांची होणारी आर्थिक आणि मानसिक ओढाताण थांबते. या सामाजिक कार्यात रस असणाऱ्या महिला, पुरुष आणि तरुण वर्गासाठी समितीची दारे उघडी आहेत. या कार्यात सहभागी झाल्याने शास्त्रीय पद्धतीने समुपदेशन करण्याचे कौशल्य आत्मसात होईल, सामाजिक जाणिवा विस्तारून मित्रपरिवारात वाढ होईल, विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडल्याचे आत्मिक समाधान मिळते, इच्छुक व्यक्ती आपल्या भागात समितीची शाखा देखील सुरू करू शकतात तरी सामाजिक कार्याची आवड असलेल्यां कोणत्याही वयोगटातील सज्ञान महिला-पुरूषांनी अधिक माहितीसाठी समितीचे *अध्यक्ष धनंजय सोनार (अमळनेर)* यांच्याशी *७९७२८ ८१४४०* या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Khanapur1
- Post by SamirQureash Quresh2
- Post by महेंद्र रघुनाथ महाजन बक्षीपुर2
- Post by Ayaz patel Ayaz patel1
- सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....2
- आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने धोत्रा यात्रेनिमित्त बस स्थानक परिसरामध्ये मोठा बंदोबस्त दिला आहे यात्रेनिमित्त महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने गर्दी असते या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शेषराव अवतार यांच्या मार्गदर्शन खाली बंदोबस्त वाढवण्यात आला आहे1
- महाशिवरात्रीनिमित्त वरवंड येथील एकनाथ गडावर भक्तीचा महापूर; लेकी-बाळींच्या उपस्थितीने यात्रोत्सवात रंगत!1
- Khanapur taluka Raver district Jalgaon3