logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर-धाराशिव-बीड विधानपरिषद निवडणूक २०२६ मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. बसवराजजी पाटील यांनी तब्बल ७२१ विक्रमी मतांनी दणदणीत विजय संपादन करत इतिहास रचला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयाबद्दल भाजप नगरसेवक ॲड. गोविंद नवनाथ शिराळे पाटील (नगर परिषद, बीड) यांनी बसवराजजी पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. ॲड. गोविंद शिराळे पाटील यांनी यावेळी सांगितले की, बसवराजजी पाटील यांचा हा विजय जनतेचा आणि महायुतीच्या विकासाभिमुख विचारांचा विजय आहे. त्यांनी मिळविलेला विक्रमी मताधिक्याचा विजय हा त्यांच्या जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि मतदारांच्या विश्वासाची पावती आहे, तसेच ते आगामी काळात विधानपरिषदेतून जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडतील, असा विश्वास आहे. बसवराजजी पाटील यांच्या विजयामुळे लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून त्यांच्या विजयाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

1 hr ago
user_बालाजी जगतकर
बालाजी जगतकर
Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
1 hr ago
6ba999ae-3f41-438d-801f-001f4f29b37d

लातूर-धाराशिव-बीड विधानपरिषद निवडणूक २०२६ मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. बसवराजजी पाटील यांनी तब्बल ७२१ विक्रमी मतांनी दणदणीत विजय संपादन करत इतिहास रचला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयाबद्दल भाजप नगरसेवक ॲड. गोविंद नवनाथ शिराळे पाटील (नगर परिषद, बीड) यांनी बसवराजजी पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. ॲड. गोविंद शिराळे पाटील यांनी यावेळी सांगितले की, बसवराजजी पाटील यांचा हा विजय जनतेचा आणि महायुतीच्या विकासाभिमुख विचारांचा विजय आहे. त्यांनी मिळविलेला विक्रमी मताधिक्याचा विजय हा त्यांच्या जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि मतदारांच्या विश्वासाची पावती आहे, तसेच ते आगामी काळात विधानपरिषदेतून जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडतील, असा विश्वास आहे. बसवराजजी पाटील यांच्या विजयामुळे लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून त्यांच्या विजयाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंठा शहर आणि परिसरात बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात मंठा पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत दोन व्यक्तींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. रविवारी (दि. 21 जून) पोलीस ठाणे मंठा येथील अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अहमदपुरा आणि बाबानगर परिसरात छापेमारी करण्यात आली. यावेळी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात बेकायदेशीर तलवारी आढळून आल्या. या कारवाईमध्ये जावेद जुमा शेख (वय 27, रा. अहमदपुरा, ता. मंठा) याच्याकडून एक धारदार तलवार जप्त करण्यात आली, ज्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 341/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल झाला. याचप्रकारे, विनायक नारायणराव इंगोले (वय 43, रा. बाबानगर, ह.मु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, मंठा) याच्याकडूनही एक धारदार तलवार जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 342/2026 नुसार संबंधित कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला. या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली असून, मंठा पोलीस ठाण्यामार्फत प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जालना, अपर पोलीस अधीक्षक जालना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
    1
    मंठा शहर आणि परिसरात बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात मंठा पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत दोन व्यक्तींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

रविवारी (दि. 21 जून) पोलीस ठाणे मंठा येथील अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अहमदपुरा आणि बाबानगर परिसरात छापेमारी करण्यात आली. यावेळी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात बेकायदेशीर तलवारी आढळून आल्या. या कारवाईमध्ये जावेद जुमा शेख (वय 27, रा. अहमदपुरा, ता. मंठा) याच्याकडून एक धारदार तलवार जप्त करण्यात आली, ज्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 341/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल झाला. याचप्रकारे, विनायक नारायणराव इंगोले (वय 43, रा. बाबानगर, ह.मु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, मंठा) याच्याकडूनही एक धारदार तलवार जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 342/2026 नुसार संबंधित कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली असून, मंठा पोलीस ठाण्यामार्फत प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जालना, अपर पोलीस अधीक्षक जालना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मतमोजणीत सुहास शिरसाट यांना तब्बल ४५४ मते मिळाली, तर ठाकरे सेनेचे उमेदवार गणेश लोखंडे यांना १३४ मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजप, ठाकरे सेना आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत झाली होती, मात्र मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुहास शिरसाट यांनी आघाडी कायम राखत एकतर्फी विजय संपादन केला. या विजयानंतर ठाकरे सेनेच्या उमेदवाराने (गणेश लोखंडे) हा विजय 'सत्तेचा आणि पैशांचा' असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
    1
    औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

मतमोजणीत सुहास शिरसाट यांना तब्बल ४५४ मते मिळाली, तर ठाकरे सेनेचे उमेदवार गणेश लोखंडे यांना १३४ मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजप, ठाकरे सेना आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत झाली होती, मात्र मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुहास शिरसाट यांनी आघाडी कायम राखत एकतर्फी विजय संपादन केला.

या विजयानंतर ठाकरे सेनेच्या उमेदवाराने (गणेश लोखंडे) हा विजय 'सत्तेचा आणि पैशांचा' असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी नुकतेच राबवलेले 'ऑपरेशन ऑल आऊट' यशस्वी ठरले आहे. या मोहिमेअंतर्गत, चिकलठाणा पोलिसांनी एकाच रात्रीत मोठी कारवाई करत ११ वाहने जप्त केली. या कारवाईतून पोलिसांनी ८ गुन्हे दाखल केले असून, एकूण ₹१ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी नुकतेच राबवलेले 'ऑपरेशन ऑल आऊट' यशस्वी ठरले आहे. या मोहिमेअंतर्गत, चिकलठाणा पोलिसांनी एकाच रात्रीत मोठी कारवाई करत ११ वाहने जप्त केली. या कारवाईतून पोलिसांनी ८ गुन्हे दाखल केले असून, एकूण ₹१ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
    user_Salman Fayyaz khan
    Salman Fayyaz khan
    Video editing service खुलदाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • बाणेगाव प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावल्याने केदारखेडावासीयांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांची ही पाण्याची हेळसांड थांबवण्यासाठी सरपंच संदीप शेळके यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने तात्काळ पाण्याचे टँकर सुरू केले, ज्यामुळे केदारखेडा गावातील नागरिकांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर झाली.
    1
    बाणेगाव प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावल्याने केदारखेडावासीयांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांची ही पाण्याची हेळसांड थांबवण्यासाठी सरपंच संदीप शेळके यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने तात्काळ पाण्याचे टँकर सुरू केले, ज्यामुळे केदारखेडा गावातील नागरिकांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर झाली.
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सिल्लोड पंचायत समिती येथे योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी वैद्यकीय विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग यांसारख्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
    1
    सिल्लोड पंचायत समिती येथे योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी वैद्यकीय विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग यांसारख्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • गावात कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरू असतानाही, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई वाढल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज घागर घेऊन निवेदन दिले. ही परिस्थिती अशा वेळी निर्माण झाली आहे, जेव्हा पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च करण्यात आला आहे; मात्र, ग्रामपंचायतीने पाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आपली मागणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून घागरी घेऊन निवेदन सादर केले.
    1
    गावात कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरू असतानाही, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई वाढल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज घागर घेऊन निवेदन दिले.

ही परिस्थिती अशा वेळी निर्माण झाली आहे, जेव्हा पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च करण्यात आला आहे; मात्र, ग्रामपंचायतीने पाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आपली मागणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून घागरी घेऊन निवेदन सादर केले.
    user_श्री व्यंकटेश देवराव कदम
    श्री व्यंकटेश देवराव कदम
    Voice of people बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    37 min ago
  • वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव वाघलगाव आणि भगुर शिवारात बिबट्याचे दर्शन झाले आहे. या बिबट्याच्या दर्शनाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
    1
    वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव वाघलगाव आणि भगुर शिवारात बिबट्याचे दर्शन झाले आहे. या बिबट्याच्या दर्शनाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
    user_Salman Fayyaz khan
    Salman Fayyaz khan
    Video editing service खुलदाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • सिल्लोड शहरा नजीकच्या रजाळवाडी परिसरात एक दुःखद घटना घडली आहे, जिथे रजाळवाडी तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव बोला कडमिन असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोला कडमिन आणि त्याचे तीन मित्र असे एकूण चार तरुण या परिसरात काहीतरी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी, 'कोण किती लांब जाते' यावरून त्यांच्यात पैज लागली. याच पैजेच्या शर्यतीदरम्यान बोला कडमिन पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
    1
    सिल्लोड शहरा नजीकच्या रजाळवाडी परिसरात एक दुःखद घटना घडली आहे, जिथे रजाळवाडी तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव बोला कडमिन असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोला कडमिन आणि त्याचे तीन मित्र असे एकूण चार तरुण या परिसरात काहीतरी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी, 'कोण किती लांब जाते' यावरून त्यांच्यात पैज लागली. याच पैजेच्या शर्यतीदरम्यान बोला कडमिन पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, यामध्ये ७०० हून अधिक वारकरी भगव्या पताका घेऊन सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे निघाली. शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ही पालखी ३३ दिवसांत पूर्ण करेल आणि २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन ही पालखी २८ जुलैपर्यंत पंढरपुरातच मुक्काम करणार आहे. या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण संत नगरी 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पंढरपुरातील मुक्कामानंतर, पालखी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघेल.
    4
    विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, यामध्ये ७०० हून अधिक वारकरी भगव्या पताका घेऊन सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे निघाली.

शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ही पालखी ३३ दिवसांत पूर्ण करेल आणि २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन ही पालखी २८ जुलैपर्यंत पंढरपुरातच मुक्काम करणार आहे.

या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण संत नगरी 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पंढरपुरातील मुक्कामानंतर, पालखी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघेल.
    user_गजानन कडुजी राऊत
    गजानन कडुजी राऊत
    Graphic designer मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.