logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Global Legislative Summit: अमेरिकेतील जागतिक विधिमंडळ परिषदेत आ. जितेश अंतापूरकरांचा सहभाग; देगलूर-बिलोलीच्या शाश्वत विकासाला जागतिक संकल्पनांची नवी दिशा शिकागोतील जागतिक विधिमंडळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व; तज्ज्ञांशी संवादातून लोकाभिमुख शासन, आधुनिक तंत्रज्ञान व विकासाच्या नाविन्यपूर्ण मॉडेल्सचा मतदारसंघाच्या योजनांमध्ये समावेश... देगलूर : देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांना अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित 'एनसीएसएल लेजिस्लेटिव्ह समिट-२०२६' या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची संधी लाभली आहे. जागतिक पातळीवरील धोरणनिर्मिती, लोकशाही बळकटीकरण आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विविध देशांतील लोकप्रतिनिधी आणि धोरण तज्ज्ञांशी संवाद साधला. या परिषदेत हवामान बदल, शाश्वत विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रशासनातील प्रभावी वापर, लोकाभिमुख शासनव्यवस्था आणि भविष्यातील विकास धोरणे अशा विविध विषयांवर सखोल चर्चा होत आहे. जगभरातील यशस्वी उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि विकासाची प्रभावी मॉडेल्स जाणून घेण्याची संधी या परिषदेमुळे उपलब्ध होत असल्याचे आ.अंतापूरकर यांनी सांगितले. देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी या परिषदेतून मिळणारे अनुभव, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध देशांच्या यशस्वी थोरणांचा अभ्यास निश्चितच उपयुक्त ठरेल. मतदारसंघातील विकासकामे अधिक परिणामकारक करण्यासाठी तसेच लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या परिषदेत विविध तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या परिषदेत सहभागामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघाला जागतिक दर्जाच्या विकास संकल्पनांची जोड मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, स्थानिक विकासाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

1 day ago
user_Jawed
Jawed
Press reporter देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
1 day ago
3a6e2317-77e3-4cc0-8e04-384c2eaa92ed

Global Legislative Summit: अमेरिकेतील जागतिक विधिमंडळ परिषदेत आ. जितेश अंतापूरकरांचा सहभाग; देगलूर-बिलोलीच्या शाश्वत विकासाला जागतिक संकल्पनांची नवी दिशा शिकागोतील जागतिक विधिमंडळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व; तज्ज्ञांशी संवादातून लोकाभिमुख शासन, आधुनिक तंत्रज्ञान व विकासाच्या नाविन्यपूर्ण मॉडेल्सचा मतदारसंघाच्या योजनांमध्ये समावेश... देगलूर : देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांना अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित 'एनसीएसएल लेजिस्लेटिव्ह समिट-२०२६' या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची संधी लाभली आहे. जागतिक पातळीवरील धोरणनिर्मिती, लोकशाही बळकटीकरण आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विविध देशांतील लोकप्रतिनिधी आणि धोरण तज्ज्ञांशी संवाद साधला. या परिषदेत हवामान बदल, शाश्वत विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रशासनातील प्रभावी वापर, लोकाभिमुख शासनव्यवस्था आणि भविष्यातील विकास धोरणे अशा विविध विषयांवर सखोल चर्चा होत आहे. जगभरातील यशस्वी उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि विकासाची प्रभावी मॉडेल्स जाणून घेण्याची संधी या परिषदेमुळे उपलब्ध होत असल्याचे आ.अंतापूरकर यांनी सांगितले. देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी या परिषदेतून मिळणारे अनुभव, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध देशांच्या यशस्वी थोरणांचा अभ्यास निश्चितच उपयुक्त ठरेल. मतदारसंघातील विकासकामे अधिक परिणामकारक करण्यासाठी तसेच लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या परिषदेत विविध तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या परिषदेत सहभागामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघाला जागतिक दर्जाच्या विकास संकल्पनांची जोड मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, स्थानिक विकासाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले.  या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    2
    ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न



मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. 
या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. ​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    1
    नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल


नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले.
​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    1
    मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    1
    महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    15 min ago
  • पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    1
    पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! 
पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा!
#Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    1
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • माहूर गडाकडे जाणाऱ्या भाविकांनी प्रवास टाळावा; पैनगंगा नदीला पूर, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे आवाहन नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पैनगंगा धनोडा नदीवर सध्या पाण्याची पातळी वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माहूर गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी सध्याचा प्रवास शक्यतो टाळावा, असे नम्र आवाहन माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी केले आहे. ​परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी पूर्ण सतर्कता बाळगावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी नगर पंचायत माहूर, तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन तत्पर आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी राहावे आणि गरज भासल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
    1
    माहूर गडाकडे जाणाऱ्या भाविकांनी प्रवास टाळावा; पैनगंगा नदीला पूर, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे आवाहन


नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पैनगंगा धनोडा नदीवर सध्या पाण्याची पातळी वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माहूर गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी सध्याचा प्रवास शक्यतो टाळावा, असे नम्र आवाहन माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी केले आहे.
​परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी पूर्ण सतर्कता बाळगावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी नगर पंचायत माहूर, तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन तत्पर आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी राहावे आणि गरज भासल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
    1
    चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती.
चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026.
लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. 
या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे.
शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.