logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भावी अभियंत्यांच्या स्टार्टअप संकल्पनांना मिळाली भरारी..! मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात आयआयटीकडूम ‘युरेका’ स्पर्धेचे आयोजन भावी अभियंत्यांच्या स्टार्टअप संकल्पनांना मिळाली भरारी..! मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात आयआयटीकडूम ‘युरेका’ स्पर्धेचे आयोजन येवला,ता.२८ : विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना केवळ चांगल्या पॅकेजच्या नोकरीचे ध्येय न ठेवता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करावेत या उद्देशाने धानोरे येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात आयआयटी बॉम्बेच्या ई-सेलअंतर्गत ‘युरेका’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयासह परिसरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील २२ गटांतील ९२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप संकल्पना परीक्षकांसमोर मांडल्या.यामध्ये कृषी, आरोग्य आणि बांधकाम क्षेत्रात आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा प्रभावी वापर कसा करता येईल, तसेच त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नवीन व्यवसाय संधी कशा निर्माण करता येतील,यावर विद्यार्थ्यांनी विविध संकल्पना सादर केल्या. स्पर्धेचे उद्घाटन तसेच परीक्षण शहरातील युवा उद्योजक रोशन भंडारी, एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीए विभागातील प्रा. संयुक्ता अंबोरे, सारिका गंगवाल आणि एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विभागप्रमुख प्रा. अंकिता मेधने यांनी केले. विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत आविष्कार साधला.स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच पुढील फेरीसाठी विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबई येथे आपल्या स्टार्टअप संकल्पना सादर करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गीतेश गुजराथी यांनी दिली.स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील ई-सेलचे विद्यार्थी कार्तिक उबाळे, आरशिया शेख, अंजली कहार, दीक्षा वगार आदींनी परिश्रम घेतले. "अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाच्या इंटरप्रेन्युअरशिप सेलतर्फे आयआयटी बॉम्बे ई-सेलअंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.” डॉ.गीतेश गुजराथी,प्राचार्य,मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय,धानोरे स्पर्धेचा निकाल असा • प्रथम पारितोषिक : सिमरन अस्वले व ग्रुप — ‘एस.पी. अँग्रो’ मोबाईल ॲप्लिकेशन, कृषी क्षेत्रातील माहिती व मार्गदर्शनासाठी. • द्वितीय पारितोषिक : अनुष्का बोरनारे व ग्रुप — आरोग्यविषयक मदतीसाठी मोबाईल ॲप्लिकेशन. • तृतीय पारितोषिक : ऋतिक गोमलादू — बांधकाम व्यवसायाशी संबंधित स्टार्टअप संकल्पना.

2 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago
efd57094-a926-4a57-a2b4-c84f043a60b3

भावी अभियंत्यांच्या स्टार्टअप संकल्पनांना मिळाली भरारी..! मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात आयआयटीकडूम ‘युरेका’ स्पर्धेचे आयोजन भावी अभियंत्यांच्या स्टार्टअप संकल्पनांना मिळाली भरारी..! मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात आयआयटीकडूम ‘युरेका’ स्पर्धेचे आयोजन येवला,ता.२८ : विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना केवळ चांगल्या पॅकेजच्या नोकरीचे ध्येय न ठेवता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करावेत या उद्देशाने धानोरे येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात आयआयटी बॉम्बेच्या ई-सेलअंतर्गत ‘युरेका’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयासह परिसरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील २२ गटांतील ९२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप संकल्पना परीक्षकांसमोर मांडल्या.यामध्ये कृषी, आरोग्य आणि बांधकाम क्षेत्रात आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा प्रभावी वापर कसा करता येईल, तसेच त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नवीन व्यवसाय संधी कशा निर्माण करता येतील,यावर विद्यार्थ्यांनी विविध संकल्पना सादर केल्या. स्पर्धेचे उद्घाटन तसेच परीक्षण शहरातील युवा उद्योजक रोशन भंडारी, एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीए विभागातील प्रा. संयुक्ता अंबोरे, सारिका गंगवाल आणि एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विभागप्रमुख प्रा. अंकिता मेधने यांनी केले. विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत आविष्कार साधला.स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच पुढील फेरीसाठी विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबई येथे आपल्या स्टार्टअप संकल्पना सादर करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गीतेश गुजराथी यांनी दिली.स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील ई-सेलचे विद्यार्थी कार्तिक उबाळे, आरशिया शेख, अंजली कहार, दीक्षा वगार आदींनी परिश्रम घेतले. "अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाच्या इंटरप्रेन्युअरशिप सेलतर्फे आयआयटी बॉम्बे ई-सेलअंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.” डॉ.गीतेश गुजराथी,प्राचार्य,मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय,धानोरे स्पर्धेचा निकाल असा • प्रथम पारितोषिक : सिमरन अस्वले व ग्रुप — ‘एस.पी. अँग्रो’ मोबाईल ॲप्लिकेशन, कृषी क्षेत्रातील माहिती व मार्गदर्शनासाठी. • द्वितीय पारितोषिक : अनुष्का बोरनारे व ग्रुप — आरोग्यविषयक मदतीसाठी मोबाईल ॲप्लिकेशन. • तृतीय पारितोषिक : ऋतिक गोमलादू — बांधकाम व्यवसायाशी संबंधित स्टार्टअप संकल्पना.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम येवला तालुक्यातील देवळाणे बोकटे पाड्यावर रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा, प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा सणाचे औचित्य साधून येवला येथील जनकल्याण सेवा समितीचे 25व्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त अध्यक्ष नारायण मामा शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी वंचित वस्त्यांमध्ये जाऊन कष्टकरी भगिनींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला जातो. यावर्षी येवला तालुक्यातील बोगटे येथील मोरे वस्तीवर जनकल्याण सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी भेट देऊन ८१ कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली. यावेळी भगिनींना साडी-चोळी व छत्रीचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून हा सामाजिक व मानवतावादी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. याप्रसंगी आपल्या मनोगतात नारायण मामा शिंदे म्हणाले, “रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या या दिवशी जात-पात, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून आम्ही या कष्टकरी भगिनींना आपली बहीण मानतो. त्यांच्या हातून राखी बांधून घेत मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.” या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर झळके सर, रावसाहेब दाभाडे, रामेश्वर कलंत्री, डॉ. विलास दाभाडे व गुमानसिंग परदेशी उपस्थित होते. यावेळी समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे, उपाध्यक्ष किशोर कुमावत, सुदाम दाणे पाटील, सुरजमल करवा . दत्ता नागडेकर, विजय पोंदे, शशिकांत मालपुरे, बाळासाहेब देशमुख, रवी नागपुरे, सुदर्शन खिल्लारे, सचिन वखारे, राजेंद्र ताटे, गोविंदा शिंदे व स्वप्निल शिंदे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. गावातील रवींद्र रायबान काळे, नंदू देवरे, शिवाजी कोटमे, बाळासाहेब काळे, चांगदेव मोरे, रंगनाथ मोरे, मच्छिंद्र मोरे तसेच भजनी मंडळातील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी प्रभाकर जळके सर, रावसाहेब दाभाडे व दुर्गा भाऊसाहेब मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जनकल्याण सेवा समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुमानसिंग परदेशी यांनी आभार मानले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला. यावेळी बालगोपालांना बिस्किट व चॉकलेटचे ही वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान
येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम
रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान
येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम
येवला तालुक्यातील देवळाणे बोकटे पाड्यावर रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा, प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा सणाचे औचित्य साधून येवला येथील जनकल्याण सेवा समितीचे 25व्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त अध्यक्ष नारायण मामा शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी वंचित वस्त्यांमध्ये जाऊन कष्टकरी भगिनींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला जातो.
यावर्षी येवला तालुक्यातील बोगटे येथील मोरे वस्तीवर जनकल्याण सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी भेट देऊन ८१ कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली. यावेळी भगिनींना साडी-चोळी व छत्रीचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून हा सामाजिक व मानवतावादी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
याप्रसंगी आपल्या मनोगतात नारायण मामा शिंदे म्हणाले, “रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या या दिवशी जात-पात, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून आम्ही या कष्टकरी भगिनींना आपली बहीण मानतो. त्यांच्या हातून राखी बांधून घेत मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर झळके सर, रावसाहेब दाभाडे, रामेश्वर कलंत्री, डॉ. विलास दाभाडे व गुमानसिंग परदेशी उपस्थित होते.
यावेळी समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे, उपाध्यक्ष किशोर कुमावत, सुदाम दाणे पाटील, सुरजमल करवा . दत्ता नागडेकर, विजय पोंदे, शशिकांत मालपुरे, बाळासाहेब देशमुख, रवी नागपुरे, सुदर्शन खिल्लारे, सचिन वखारे, राजेंद्र ताटे, गोविंदा शिंदे व स्वप्निल शिंदे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
गावातील रवींद्र रायबान काळे, नंदू देवरे, शिवाजी कोटमे, बाळासाहेब काळे, चांगदेव मोरे, रंगनाथ मोरे, मच्छिंद्र मोरे तसेच भजनी मंडळातील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
यावेळी प्रभाकर जळके सर, रावसाहेब दाभाडे व दुर्गा भाऊसाहेब मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जनकल्याण सेवा समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुमानसिंग परदेशी यांनी आभार मानले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला.
यावेळी बालगोपालांना बिस्किट व चॉकलेटचे ही वाटप करण्यात आले
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पत्रकाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल येवला येथील पत्रकार दीपक सोनवणे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने येवला शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ व ३५१(३) अन्वये नोंद करण्यात आली असून प्रवीण पवार या संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गंगा दरवाजा परिसरात बँक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून प्रवीण पवार यांनी पत्रकार दीपक सोनवणे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी, “आमच्या नादी लागू नको, तुला जिवंत ठेवणार नाही,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप दीपक सोनवणे यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी या फिर्यादीची नोंद केली आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार दीपक सोनवणे यांनी केली आहे. या घटनेमुळे येवला शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास व कारवाईकडे लक्ष लागले आहे.
    1
    पत्रकाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल
येवला येथील पत्रकार दीपक सोनवणे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने येवला शहर पोलीस ठाण्यात फिर्याद  नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ व ३५१(३) अन्वये नोंद करण्यात आली असून प्रवीण पवार या संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गंगा दरवाजा परिसरात बँक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून प्रवीण पवार यांनी पत्रकार दीपक सोनवणे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.
यावेळी, “आमच्या नादी लागू नको, तुला जिवंत ठेवणार नाही,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप दीपक सोनवणे यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी या फिर्यादीची  नोंद केली आहे.
या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार दीपक सोनवणे यांनी केली आहे. या घटनेमुळे येवला शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास व कारवाईकडे लक्ष लागले आहे.
    user_Prashant kalanke
    Prashant kalanke
    Photographer येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप; ग्रामसभेत लाभार्थ्यांना समोर आणल्याने उडाला खडाजंगी. आरडा तोलाजी ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक! प्रश्नांचा भडिमार... पोलिस बंदोबस्तात पार पडलेली ग्रामसभा अखेर तहकूब!
    1
    सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप
सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप; ग्रामसभेत लाभार्थ्यांना समोर आणल्याने उडाला खडाजंगी.
आरडा तोलाजी ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक! प्रश्नांचा भडिमार...
पोलिस बंदोबस्तात पार पडलेली ग्रामसभा अखेर तहकूब!
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक म वि प्र कृषी महाविद्यालय चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी महाविद्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक म वि प्र कृषी महाविद्यालय चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी महाविद्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न
    2
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक  म वि प्र कृषी महाविद्यालय चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी महाविद्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक  म वि प्र कृषी महाविद्यालय चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी महाविद्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    45 min ago
  • बिहार बेगूसराय में दिनदहाड़े सनसनीखेज वारदात सामने आई है। डंडारी थाना क्षेत्र के राजोपुर गांव में RJD नेता के भाई की गोली मारकर हत्या किए जाने की खबर है। बताया जा रहा है कि उन्हें फोन कर घर से बाहर बुलाया गया, जिसके बाद बगीचे में वारदात को अंजाम दिया गया। घटना के बाद इलाके में तनाव का माहौल है। पुलिस मामले की जांच में जुटी है और आरोपियों की तलाश की जा रही है। वीडियो में जानिए पूरी घटना और अब तक की बड़ी अपडेट। बेगूसराय में दिनदहाड़े सनसनीखेज वारदात सामने आई है। डंडारी थाना क्षेत्र के राजोपुर गांव में RJD नेता के भाई की गोली मारकर हत्या किए जाने की खबर है। बताया जा रहा है कि उन्हें फोन कर घर से बाहर बुलाया गया, जिसके बाद बगीचे में वारदात को अंजाम दिया गया। घटना के बाद इलाके में तनाव का माहौल है। पुलिस मामले की जांच में जुटी है और आरोपियों की तलाश की जा रही है। वीडियो में जानिए पूरी घटना और अब तक की बड़ी अपडेट।
    1
    बिहार बेगूसराय में दिनदहाड़े सनसनीखेज वारदात सामने आई है। डंडारी थाना क्षेत्र के राजोपुर गांव में RJD नेता के भाई की गोली मारकर हत्या किए जाने की खबर है। बताया जा रहा है कि उन्हें फोन कर घर से बाहर बुलाया गया, जिसके बाद बगीचे में वारदात को अंजाम दिया गया।
घटना के बाद इलाके में तनाव का माहौल है। पुलिस मामले की जांच में जुटी है और आरोपियों की तलाश की जा रही है।
वीडियो में जानिए पूरी घटना और अब तक की बड़ी अपडेट।
बेगूसराय में दिनदहाड़े सनसनीखेज वारदात सामने आई है। डंडारी थाना क्षेत्र के राजोपुर गांव में RJD नेता के भाई की गोली मारकर हत्या किए जाने की खबर है। बताया जा रहा है कि उन्हें फोन कर घर से बाहर बुलाया गया, जिसके बाद बगीचे में वारदात को अंजाम दिया गया।
घटना के बाद इलाके में तनाव का माहौल है। पुलिस मामले की जांच में जुटी है और आरोपियों की तलाश की जा रही है।
वीडियो में जानिए पूरी घटना और अब तक की बड़ी अपडेट।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    48 min ago
  • मविप्र समाज संस्थेचा नाशिकच्या जडणघडणीत मोलाचा वाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नूतन इमारतीचे उद्घाटन नाशिक:- चाचडगाव दिंडोरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांच्या हस्ते तसेच पालकमंत्री गिरीश महाजन,यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.यावेळी मंत्री छगन भुजबळ,मंत्री दादाजी भुसे मंत्री नरहरी झिरवाळ, महापौर हिमगौरी आहेर-आडके,खासदार भास्कर भगरे खा राजाभाऊ वाजे,आमदार राहुल आहेर,आमदार सीमाताई हिरे आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार गोकुळ गिते, उपमहापौर विलास शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी संस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांच्या सह सर्व कार्यकारिणी, सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    4
    मविप्र समाज संस्थेचा नाशिकच्या जडणघडणीत मोलाचा वाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नूतन इमारतीचे उद्घाटन 
नाशिक:- चाचडगाव दिंडोरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांच्या हस्ते तसेच पालकमंत्री गिरीश महाजन,यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.यावेळी मंत्री छगन भुजबळ,मंत्री दादाजी भुसे मंत्री नरहरी झिरवाळ, महापौर हिमगौरी आहेर-आडके,खासदार भास्कर भगरे खा राजाभाऊ वाजे,आमदार राहुल आहेर,आमदार सीमाताई हिरे आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार गोकुळ गिते, उपमहापौर विलास शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी संस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांच्या सह सर्व कार्यकारिणी, सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_PRASIDHI PRAMUKH NEWS
    PRASIDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • हा माझा महाराष्ट्र अभिमान आहे मला ह्या मातीत असल्या चा..
    1
    हा माझा महाराष्ट्र अभिमान आहे मला ह्या मातीत असल्या चा..
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादाचा राग; चाकूने तीन वार केल्याचा तक्रारीत उल्लेख गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून सुरगाणा येथील २९ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाचे नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी (वय २९, रा. होळी चौक बसस्टॉपजवळ, सुरगाणा) असे आहे. पोलिस तक्रारीनुसार, हेमंत व आरोपी कुणाल परदेशी यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाद झाला होता. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दि. २६ ऑगस्ट रोजी हेमंत हा त्याचे मित्र विजय खंबायत, माधव गवळी व राज गाडेकर यांच्यासोबत सापुतारा येथे मॉनसून फेस्टिव्हल पाहण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास हे मित्र बडोदा बँकेच्या एटीएमजवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. गेले होते. पोलिस तक्रारीतील माहितीनुसार, त्याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी व प्रदीप रविंद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्ल्यानंतर हेमंत व राज गाडेकर तेथे थांबले असताना कुणाल व हेमंत यांच्यात मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह यावर्षीच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर कुणाल याने चाकूसदृश तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटावर दोन वार व छातीच्या खालील भागात एक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर कुणाल मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले. हेमंतला त्याचे मित्र तातडीने मोटारसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री १.१० वाजता हेमंतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती व नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
    1
    गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या
मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादाचा राग; चाकूने तीन वार केल्याचा तक्रारीत उल्लेख
गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून सुरगाणा येथील २९ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत युवकाचे नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी (वय २९, रा. होळी चौक बसस्टॉपजवळ, सुरगाणा) असे आहे. पोलिस तक्रारीनुसार, हेमंत व आरोपी कुणाल परदेशी यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाद झाला होता. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दि. २६ ऑगस्ट रोजी हेमंत हा त्याचे मित्र विजय खंबायत, माधव गवळी व राज गाडेकर यांच्यासोबत सापुतारा येथे मॉनसून फेस्टिव्हल पाहण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास हे मित्र बडोदा बँकेच्या एटीएमजवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. गेले होते.
पोलिस तक्रारीतील माहितीनुसार, त्याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी व प्रदीप रविंद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्ल्यानंतर हेमंत व राज गाडेकर तेथे थांबले असताना कुणाल व हेमंत यांच्यात मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह यावर्षीच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाला.
वाद वाढल्यानंतर कुणाल याने चाकूसदृश तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटावर दोन वार व छातीच्या खालील भागात एक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर कुणाल मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले.
हेमंतला त्याचे मित्र तातडीने मोटारसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री १.१० वाजता हेमंतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती व नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.