logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादाचा राग; चाकूने तीन वार केल्याचा तक्रारीत उल्लेख गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून सुरगाणा येथील २९ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाचे नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी (वय २९, रा. होळी चौक बसस्टॉपजवळ, सुरगाणा) असे आहे. पोलिस तक्रारीनुसार, हेमंत व आरोपी कुणाल परदेशी यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाद झाला होता. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दि. २६ ऑगस्ट रोजी हेमंत हा त्याचे मित्र विजय खंबायत, माधव गवळी व राज गाडेकर यांच्यासोबत सापुतारा येथे मॉनसून फेस्टिव्हल पाहण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास हे मित्र बडोदा बँकेच्या एटीएमजवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. गेले होते. पोलिस तक्रारीतील माहितीनुसार, त्याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी व प्रदीप रविंद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्ल्यानंतर हेमंत व राज गाडेकर तेथे थांबले असताना कुणाल व हेमंत यांच्यात मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह यावर्षीच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर कुणाल याने चाकूसदृश तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटावर दोन वार व छातीच्या खालील भागात एक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर कुणाल मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले. हेमंतला त्याचे मित्र तातडीने मोटारसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री १.१० वाजता हेमंतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती व नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

12 hrs ago
user_नागेश मोरे,पत्रकार
नागेश मोरे,पत्रकार
मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
12 hrs ago

गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादाचा राग; चाकूने तीन वार केल्याचा तक्रारीत उल्लेख गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून सुरगाणा येथील २९ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाचे नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी (वय २९, रा. होळी चौक बसस्टॉपजवळ, सुरगाणा) असे आहे. पोलिस तक्रारीनुसार, हेमंत व आरोपी कुणाल परदेशी यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाद झाला होता. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दि. २६ ऑगस्ट रोजी हेमंत हा त्याचे मित्र विजय खंबायत, माधव गवळी व राज गाडेकर यांच्यासोबत सापुतारा येथे मॉनसून फेस्टिव्हल पाहण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास हे मित्र बडोदा बँकेच्या एटीएमजवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. गेले होते. पोलिस तक्रारीतील माहितीनुसार, त्याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी व प्रदीप रविंद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्ल्यानंतर हेमंत व राज गाडेकर तेथे थांबले असताना कुणाल व हेमंत यांच्यात मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह यावर्षीच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर कुणाल याने चाकूसदृश तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटावर दोन वार व छातीच्या खालील भागात एक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर कुणाल मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले. हेमंतला त्याचे मित्र तातडीने मोटारसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री १.१० वाजता हेमंतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती व नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात... - जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली. #DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात... - जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली. #DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice
    1
    Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात...
-
जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.

या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली.

#DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice 
Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात...
-
जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली.
#DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम येवला तालुक्यातील देवळाणे बोकटे पाड्यावर रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा, प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा सणाचे औचित्य साधून येवला येथील जनकल्याण सेवा समितीचे 25व्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त अध्यक्ष नारायण मामा शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी वंचित वस्त्यांमध्ये जाऊन कष्टकरी भगिनींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला जातो. यावर्षी येवला तालुक्यातील बोगटे येथील मोरे वस्तीवर जनकल्याण सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी भेट देऊन ८१ कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली. यावेळी भगिनींना साडी-चोळी व छत्रीचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून हा सामाजिक व मानवतावादी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. याप्रसंगी आपल्या मनोगतात नारायण मामा शिंदे म्हणाले, “रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या या दिवशी जात-पात, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून आम्ही या कष्टकरी भगिनींना आपली बहीण मानतो. त्यांच्या हातून राखी बांधून घेत मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.” या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर झळके सर, रावसाहेब दाभाडे, रामेश्वर कलंत्री, डॉ. विलास दाभाडे व गुमानसिंग परदेशी उपस्थित होते. यावेळी समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे, उपाध्यक्ष किशोर कुमावत, सुदाम दाणे पाटील, सुरजमल करवा . दत्ता नागडेकर, विजय पोंदे, शशिकांत मालपुरे, बाळासाहेब देशमुख, रवी नागपुरे, सुदर्शन खिल्लारे, सचिन वखारे, राजेंद्र ताटे, गोविंदा शिंदे व स्वप्निल शिंदे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. गावातील रवींद्र रायबान काळे, नंदू देवरे, शिवाजी कोटमे, बाळासाहेब काळे, चांगदेव मोरे, रंगनाथ मोरे, मच्छिंद्र मोरे तसेच भजनी मंडळातील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी प्रभाकर जळके सर, रावसाहेब दाभाडे व दुर्गा भाऊसाहेब मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जनकल्याण सेवा समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुमानसिंग परदेशी यांनी आभार मानले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला. यावेळी बालगोपालांना बिस्किट व चॉकलेटचे ही वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान
येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम
रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान
येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम
येवला तालुक्यातील देवळाणे बोकटे पाड्यावर रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा, प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा सणाचे औचित्य साधून येवला येथील जनकल्याण सेवा समितीचे 25व्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त अध्यक्ष नारायण मामा शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी वंचित वस्त्यांमध्ये जाऊन कष्टकरी भगिनींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला जातो.
यावर्षी येवला तालुक्यातील बोगटे येथील मोरे वस्तीवर जनकल्याण सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी भेट देऊन ८१ कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली. यावेळी भगिनींना साडी-चोळी व छत्रीचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून हा सामाजिक व मानवतावादी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
याप्रसंगी आपल्या मनोगतात नारायण मामा शिंदे म्हणाले, “रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या या दिवशी जात-पात, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून आम्ही या कष्टकरी भगिनींना आपली बहीण मानतो. त्यांच्या हातून राखी बांधून घेत मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर झळके सर, रावसाहेब दाभाडे, रामेश्वर कलंत्री, डॉ. विलास दाभाडे व गुमानसिंग परदेशी उपस्थित होते.
यावेळी समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे, उपाध्यक्ष किशोर कुमावत, सुदाम दाणे पाटील, सुरजमल करवा . दत्ता नागडेकर, विजय पोंदे, शशिकांत मालपुरे, बाळासाहेब देशमुख, रवी नागपुरे, सुदर्शन खिल्लारे, सचिन वखारे, राजेंद्र ताटे, गोविंदा शिंदे व स्वप्निल शिंदे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
गावातील रवींद्र रायबान काळे, नंदू देवरे, शिवाजी कोटमे, बाळासाहेब काळे, चांगदेव मोरे, रंगनाथ मोरे, मच्छिंद्र मोरे तसेच भजनी मंडळातील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
यावेळी प्रभाकर जळके सर, रावसाहेब दाभाडे व दुर्गा भाऊसाहेब मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जनकल्याण सेवा समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुमानसिंग परदेशी यांनी आभार मानले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला.
यावेळी बालगोपालांना बिस्किट व चॉकलेटचे ही वाटप करण्यात आले
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पत्रकाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल येवला येथील पत्रकार दीपक सोनवणे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने येवला शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ व ३५१(३) अन्वये नोंद करण्यात आली असून प्रवीण पवार या संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गंगा दरवाजा परिसरात बँक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून प्रवीण पवार यांनी पत्रकार दीपक सोनवणे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी, “आमच्या नादी लागू नको, तुला जिवंत ठेवणार नाही,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप दीपक सोनवणे यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी या फिर्यादीची नोंद केली आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार दीपक सोनवणे यांनी केली आहे. या घटनेमुळे येवला शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास व कारवाईकडे लक्ष लागले आहे.
    1
    पत्रकाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल
येवला येथील पत्रकार दीपक सोनवणे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने येवला शहर पोलीस ठाण्यात फिर्याद  नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ व ३५१(३) अन्वये नोंद करण्यात आली असून प्रवीण पवार या संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गंगा दरवाजा परिसरात बँक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून प्रवीण पवार यांनी पत्रकार दीपक सोनवणे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.
यावेळी, “आमच्या नादी लागू नको, तुला जिवंत ठेवणार नाही,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप दीपक सोनवणे यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी या फिर्यादीची  नोंद केली आहे.
या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार दीपक सोनवणे यांनी केली आहे. या घटनेमुळे येवला शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास व कारवाईकडे लक्ष लागले आहे.
    user_Prashant kalanke
    Prashant kalanke
    Photographer येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे. कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
    1
    कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे.
कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
    user_Sandip Aaling
    Sandip Aaling
    Agricultural service कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरती आज रक्षाबंधन निमित्ताने सुंदर अशी फुलांची आरास कळवण तालुक्यातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ समाजाला सप्तशृंगी गडावरती आज रक्षाबंधनच्या औचित्य साधून आज सुंदर अशी फुलांची आरासही करण्यात आली होती . आज पावसाने उसंत घेतल्यानंतर सप्तशृंगी गडावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळेस सप्तशृंगी देवीच्या मंदिर गाभाऱ्यामध्ये नाशिक येथील नगरसेवक प्रविण तिदमे यांनी पौर्णिमेचा औचित्य साधून सुंदर अशी फुलांची आरास ही सप्तशृंगी माता मंदिर गाभाऱ्याला केलेली होती हे आरास पाहून भाविकांचे मन हे प्रसन्न वाटत होते आज सप्तशृंगी गडावरती रक्षाबंधन व श्रावणी पौर्णिमा असल्याने आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती यासाठी न्यासाने चौक बंदोबस्त ही ठेवला होता व मंदिर गाभारात शांततेत भाविकांनी दर्शन घ्यावे घेण्याचे आवाहन सुनील कासार यांनी केले आहे . शामराव सोनवणे सप्तशृंगी गड कळवण
    1
    साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरती आज रक्षाबंधन निमित्ताने सुंदर अशी फुलांची आरास 
कळवण तालुक्यातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ समाजाला सप्तशृंगी गडावरती आज रक्षाबंधनच्या औचित्य साधून आज सुंदर अशी फुलांची आरासही करण्यात आली होती . आज पावसाने उसंत घेतल्यानंतर सप्तशृंगी गडावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळेस सप्तशृंगी देवीच्या मंदिर गाभाऱ्यामध्ये नाशिक येथील नगरसेवक प्रविण तिदमे यांनी पौर्णिमेचा औचित्य साधून सुंदर अशी फुलांची आरास ही सप्तशृंगी माता मंदिर गाभाऱ्याला केलेली होती हे आरास पाहून भाविकांचे मन हे प्रसन्न वाटत होते आज सप्तशृंगी गडावरती रक्षाबंधन व श्रावणी पौर्णिमा असल्याने आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती यासाठी न्यासाने चौक बंदोबस्त ही ठेवला होता व मंदिर गाभारात शांततेत भाविकांनी दर्शन घ्यावे घेण्याचे आवाहन सुनील कासार यांनी केले आहे  . शामराव सोनवणे सप्तशृंगी गड कळवण
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त Dhule Crime News | धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त - धुळे / साक्री - बळसाणे शिवारात शेत विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चोरी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला निजामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2,04,350 रुपयांचे 10 मोटर पंप जप्त केले आहेत. अटक आरोपींची नावे: शुभम रतनसिंग गिरासे (22) वसीमखाँ युसुफखाँ पठाण (32) रावसाहेब हिम्मत सोनवणे (24) रतनसिंग हिम्मतसिंग ठाकूर (26) करण अर्जुन ठाकरे (18) नवनाथ छोटू गायकवाड (19) - सर्व रा. बळसाणे, ता. साक्री फिर्यादी चैत्राम न्याहळदे यांच्या शेतात 22 ऑगस्ट रोजी झालेल्या चोरीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या टोळीने इतरही चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपींना दि. 29/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. #DhuleCrime #NizampurPolice #DhuleNews #MotorPumpChori #Sakri
    1
    धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
Dhule Crime News | धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
-
धुळे / साक्री - बळसाणे शिवारात शेत विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चोरी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला निजामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2,04,350 रुपयांचे 10 मोटर पंप जप्त केले आहेत.
अटक आरोपींची नावे:
शुभम रतनसिंग गिरासे (22)
वसीमखाँ युसुफखाँ पठाण (32)
रावसाहेब हिम्मत सोनवणे (24)
रतनसिंग हिम्मतसिंग ठाकूर (26)
करण अर्जुन ठाकरे (18)
नवनाथ छोटू गायकवाड (19) - सर्व रा. बळसाणे, ता. साक्री
फिर्यादी चैत्राम न्याहळदे यांच्या शेतात 22 ऑगस्ट रोजी झालेल्या चोरीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या टोळीने इतरही चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपींना दि. 29/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
#DhuleCrime #NizampurPolice #DhuleNews #MotorPumpChori #Sakri
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादाचा राग; चाकूने तीन वार केल्याचा तक्रारीत उल्लेख गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून सुरगाणा येथील २९ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाचे नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी (वय २९, रा. होळी चौक बसस्टॉपजवळ, सुरगाणा) असे आहे. पोलिस तक्रारीनुसार, हेमंत व आरोपी कुणाल परदेशी यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाद झाला होता. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दि. २६ ऑगस्ट रोजी हेमंत हा त्याचे मित्र विजय खंबायत, माधव गवळी व राज गाडेकर यांच्यासोबत सापुतारा येथे मॉनसून फेस्टिव्हल पाहण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास हे मित्र बडोदा बँकेच्या एटीएमजवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. गेले होते. पोलिस तक्रारीतील माहितीनुसार, त्याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी व प्रदीप रविंद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्ल्यानंतर हेमंत व राज गाडेकर तेथे थांबले असताना कुणाल व हेमंत यांच्यात मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह यावर्षीच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर कुणाल याने चाकूसदृश तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटावर दोन वार व छातीच्या खालील भागात एक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर कुणाल मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले. हेमंतला त्याचे मित्र तातडीने मोटारसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री १.१० वाजता हेमंतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती व नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
    1
    गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या
मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादाचा राग; चाकूने तीन वार केल्याचा तक्रारीत उल्लेख
गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून सुरगाणा येथील २९ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत युवकाचे नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी (वय २९, रा. होळी चौक बसस्टॉपजवळ, सुरगाणा) असे आहे. पोलिस तक्रारीनुसार, हेमंत व आरोपी कुणाल परदेशी यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाद झाला होता. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दि. २६ ऑगस्ट रोजी हेमंत हा त्याचे मित्र विजय खंबायत, माधव गवळी व राज गाडेकर यांच्यासोबत सापुतारा येथे मॉनसून फेस्टिव्हल पाहण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास हे मित्र बडोदा बँकेच्या एटीएमजवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. गेले होते.
पोलिस तक्रारीतील माहितीनुसार, त्याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी व प्रदीप रविंद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्ल्यानंतर हेमंत व राज गाडेकर तेथे थांबले असताना कुणाल व हेमंत यांच्यात मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह यावर्षीच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाला.
वाद वाढल्यानंतर कुणाल याने चाकूसदृश तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटावर दोन वार व छातीच्या खालील भागात एक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर कुणाल मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले.
हेमंतला त्याचे मित्र तातडीने मोटारसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री १.१० वाजता हेमंतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती व नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.