logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

यवतमाळ l गृहउद्योगातून ‘आत्मनिर्भतेकडे’  रूपाली गायकी यांचा ‘गृहिणी ते यशस्वी उद्योजिका’ बनण्याचा प्रवास ;  ‘राघवी लाकडी तेल घाणा’शेतीपूरक व्यवसाय ठरतोय आर्थिक सक्षमतेचे साधन 📍यवतमाळ l गृहउद्योगातून ‘आत्मनिर्भतेकडे’  रूपाली गायकी यांचा ‘गृहिणी ते यशस्वी उद्योजिका’ बनण्याचा प्रवास ;  ‘राघवी लाकडी तेल घाणा’शेतीपूरक व्यवसाय ठरतोय आर्थिक सक्षमतेचे साधन  'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग' योजनेचा आधार यवतमाळ, दि.१५ : "शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल, तर संकटांचे डोंगरही पार करता येतात," हे यवतमाळच्या रूपाली आशिष गायकी यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. घरची परिस्थिती बेताची आणि शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण असताना, रूपाली गायकी यांनी उद्योजिका बनण्याचे स्वप्न पाहिले आणि आज त्या 'राघवी लाकडी तेल घाणा' या उद्योगाच्या माध्यमातून वार्षिक ५ लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. यातून गायकी कुटुंबियांसाठी शेतीपूरक व्यवसाय हा आर्थिक सक्षमतेचे साधन ठरत असून या गृहउद्योगातून रूपाली गायकी यांनी ‘आत्मनिर्भतेकडे’प्रवास सुरु केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कापरा मेथड या गावच्या रूपालीताईंचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले. पती शेती करायचे, परंतु मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवणे केवळ शेतीवर शक्य नव्हते. काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती, पण भांडवल आणि जागेची अडचण मोठी होती. अशा वेळी त्यांनी महिला बचत गटाची कास धरली. बचत गटातून मिळणाऱ्या छोट्या कर्जांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. आरोग्यदायी संकल्पना: 'राघवी लाकडी तेल घाणा' उद्योगाची निवड करताना रूपालीताईंनी केवळ नफ्याचा विचार न करता सामाजिक आरोग्याचा विचार केला. आजच्या काळात वाढत्या आजारांचे मूळ रिफाईंड तेलात असल्याचे ओळखून त्यांनी 'शुद्ध लाकडी तेल घाणा' सुरू करण्याचे निश्चित केले. यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथून प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. शासकीय योजनांचा आधार उद्योगासाठी भांडवल उभारताना त्यांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेचा मोठा आधार मिळाला. कृषी विभाग आणि 'आत्मा' यवतमाळच्या सहकार्याने त्यांचे कागदपत्रे पूर्ण होऊन युनियन बँकेमार्फत ३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. विशेष म्हणजे, यावर त्यांना ३५ टक्के सबसिडी सुद्धा प्राप्त झाली. स्वतःकडील २ लाख आणि बँकेचे ३ लाख अशा एकूण ५ लाख रुपयांतून त्यांनी आपला प्रकल्प उभा केला. कुटुंबाची साथ आणि यशाची गरुडझेप सुरुवातीला अडचणी आल्या, पण खचून न जाता त्यांनी गुणवत्ता टिकवून ठेवली. आज रूपालीताई, त्यांचे पती आणि मुलगा हे सर्व मिळून हा व्यवसाय चालवतात. त्यांच्या तेलाची गुणवत्ता पाहून ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. केवळ तेलच नव्हे, तर त्यातून निघणारी ढेप देखील पशुखाद्य म्हणून विकली जात असल्याने उत्पन्नात भर पडली आहे. नगरपरिषदेचे सहकार्य आणि मार्केटमध्ये स्थान सुरुवातीला घरूनच व्यवसाय सुरू केल्यानंतर, यवतमाळ नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मार्केटमध्ये दुकान उपलब्ध झाले. यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले. आज दोन वर्षे पूर्ण झाली असून, त्यांची ओळख आता एक यशस्वी उद्योजिका म्हणून समाजात निर्माण झाली आहे. भविष्यातील ध्येय आणि संदेश रूपालीताईंचे आता पुढचे ध्येय इतर गरजू महिलांना रोजगार देऊन त्यांना उद्योजिका बनवण्याचे आहे. त्या म्हणतात की, "आपल्यात चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल, तर आपण स्वतःचे ब्रँड नाव नक्कीच निर्माण करू शकतो. भांडवलाची काळजी न करता शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी पुढे यावे." उद्योजिका रूपाली गायकी यांची जिद्द, मेहनत आणि आरोग्याप्रती असलेली त्यांची सामाजिक जाणीव कौतुकास्पद आहे. एका गृहिणीपासून ते एका यशस्वी उद्योजिका होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ

19 hrs ago
user_Ganesh Ekandwar jawala
Ganesh Ekandwar jawala
ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
19 hrs ago
02c3e8ee-92b5-4d4b-b0a5-d7dbb7157a5d

यवतमाळ l गृहउद्योगातून ‘आत्मनिर्भतेकडे’  रूपाली गायकी यांचा ‘गृहिणी ते यशस्वी उद्योजिका’ बनण्याचा प्रवास ;  ‘राघवी लाकडी तेल घाणा’शेतीपूरक व्यवसाय ठरतोय आर्थिक सक्षमतेचे साधन 📍यवतमाळ l गृहउद्योगातून ‘आत्मनिर्भतेकडे’  रूपाली गायकी यांचा ‘गृहिणी ते यशस्वी उद्योजिका’ बनण्याचा प्रवास ;  ‘राघवी लाकडी तेल घाणा’शेतीपूरक व्यवसाय ठरतोय आर्थिक सक्षमतेचे साधन  'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग' योजनेचा आधार यवतमाळ, दि.१५ : "शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल, तर संकटांचे डोंगरही पार करता येतात," हे यवतमाळच्या रूपाली आशिष गायकी यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. घरची परिस्थिती बेताची आणि शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण असताना, रूपाली गायकी यांनी उद्योजिका बनण्याचे स्वप्न पाहिले आणि आज त्या 'राघवी लाकडी तेल घाणा' या उद्योगाच्या माध्यमातून वार्षिक ५ लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. यातून गायकी कुटुंबियांसाठी शेतीपूरक व्यवसाय हा आर्थिक सक्षमतेचे साधन ठरत असून या गृहउद्योगातून रूपाली गायकी यांनी ‘आत्मनिर्भतेकडे’प्रवास सुरु केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कापरा मेथड या गावच्या रूपालीताईंचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले. पती शेती करायचे, परंतु मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवणे केवळ शेतीवर शक्य नव्हते. काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती, पण भांडवल आणि जागेची अडचण मोठी होती. अशा वेळी त्यांनी महिला बचत गटाची कास धरली. बचत गटातून मिळणाऱ्या छोट्या कर्जांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. आरोग्यदायी संकल्पना: 'राघवी लाकडी तेल घाणा' उद्योगाची निवड करताना रूपालीताईंनी केवळ नफ्याचा विचार न करता सामाजिक आरोग्याचा विचार केला. आजच्या काळात वाढत्या आजारांचे मूळ रिफाईंड तेलात असल्याचे ओळखून त्यांनी 'शुद्ध लाकडी तेल घाणा' सुरू करण्याचे निश्चित केले. यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथून प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन

00fd8c88-fe19-4cc4-8be9-e243644a4ae3

मिळाले. शासकीय योजनांचा आधार उद्योगासाठी भांडवल उभारताना त्यांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेचा मोठा आधार मिळाला. कृषी विभाग आणि 'आत्मा' यवतमाळच्या सहकार्याने त्यांचे कागदपत्रे पूर्ण होऊन युनियन बँकेमार्फत ३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. विशेष म्हणजे, यावर त्यांना ३५ टक्के सबसिडी सुद्धा प्राप्त झाली. स्वतःकडील २ लाख आणि बँकेचे ३ लाख अशा एकूण ५ लाख रुपयांतून त्यांनी आपला प्रकल्प उभा केला. कुटुंबाची साथ आणि यशाची गरुडझेप सुरुवातीला अडचणी आल्या, पण खचून न जाता त्यांनी गुणवत्ता टिकवून ठेवली. आज रूपालीताई, त्यांचे पती आणि मुलगा हे सर्व मिळून हा व्यवसाय चालवतात. त्यांच्या तेलाची गुणवत्ता पाहून ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. केवळ तेलच नव्हे, तर त्यातून निघणारी ढेप देखील पशुखाद्य म्हणून विकली जात असल्याने उत्पन्नात भर पडली आहे. नगरपरिषदेचे सहकार्य आणि मार्केटमध्ये स्थान सुरुवातीला घरूनच व्यवसाय सुरू केल्यानंतर, यवतमाळ नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मार्केटमध्ये दुकान उपलब्ध झाले. यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले. आज दोन वर्षे पूर्ण झाली असून, त्यांची ओळख आता एक यशस्वी उद्योजिका म्हणून समाजात निर्माण झाली आहे. भविष्यातील ध्येय आणि संदेश रूपालीताईंचे आता पुढचे ध्येय इतर गरजू महिलांना रोजगार देऊन त्यांना उद्योजिका बनवण्याचे आहे. त्या म्हणतात की, "आपल्यात चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल, तर आपण स्वतःचे ब्रँड नाव नक्कीच निर्माण करू शकतो. भांडवलाची काळजी न करता शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी पुढे यावे." उद्योजिका रूपाली गायकी यांची जिद्द, मेहनत आणि आरोग्याप्रती असलेली त्यांची सामाजिक जाणीव कौतुकास्पद आहे. एका गृहिणीपासून ते एका यशस्वी उद्योजिका होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.
    2
    वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना  शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे. #Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue
    1
    घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा
हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली.
ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे.
#Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ​हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. ​२०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. ​अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. ​चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. ​शेतकरी न्यायापासून वंचित ​निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. ​भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. ​भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ​जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    1
    ​हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
​२०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच?
या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे.
​अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली.
​चौकशी पत्रात अनियमितता
अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे.
​शेतकरी न्यायापासून वंचित
​निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत.
​भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही.
​भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
​जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच
"महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • shjfsfhjjfddfhhcxdhhdshhhcdsfgghhgfdddhhfxdd
    1
    shjfsfhjjfddfhhcxdhhdshhhcdsfgghhgfdddhhfxdd
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.