logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*"मातृभूमीसाठी जगणं आणि तिच्यासाठीच मरणं हाच खरा धर्म आहे." हा संदेश महाराणा प्रताप यांच्या जीवनातून आजही जगाला मिळतो.- श्री. दीपक तांदळे संस्कार प्राथमिक शाळा, विद्यानगर विभागात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी शहरातील श्री पद्मावती शिक्षण संस्था संचलित, संस्कार प्राथमिक शाळा, विद्यानगर विभागात महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कैलास तांदळे सर (अध्यक्ष,श्री पद्मावती शिक्षण संस्था) तर प्रमुख पाहुणे श्री. दीपक तांदळे सर (सचिव,श्री पद्मावती शिक्षण संस्था) व श्री. अमरशील गायकवाड सर (प्र. मुख्याध्यापक, संस्कार प्राथमिक शाळा) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप व शिक्षणमहर्षी कै.विठ्ठलरावजी तांदळे सर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री. दीपक तांदळे सर यांनी महाराणा प्रताप यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, "महान योद्धा महाराणा प्रताप यांचा जन्म राजस्थानमधील मेवाडमधील राजपूत कुटुंबात ९ मे १५४० रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव राणा उदयसिंह आणि आईचे नाव जयवंताबाई होते. तर त्यांच्या पत्नीचे नाव अजबडे पुनवार असे होते. त्यांना दोन पुत्र होते, अमरसिंह आणि भगवान दास. महान योद्धा महाराणा प्रताप ज्या घोड्याची स्वारी करत होते त्याचं नाव चेतक असे होते. चेतक देखील महाराणा प्रतापांप्रमाणेच योद्धा होता. महाराणा प्रताप लहानपणापासूनच शूर योद्धा होते. त्यांनी लहानपणापासूनच लढाईचे कौशल्य शिकले होते. तथापि, ते नायक आणि योद्धा असूनही धर्म पारायण आणि मानवतेचे पुजारी होते. त्यांनी माता जयवंताबाई यांना आपले पहिले गुरु मानले होते. ते सिसोदिया घराण्यातील मेवाडचा राजपूत राजा होते. मुघल साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी १५७६ मधील हल्दीघाटीच्या लढाईसह अकबराविरुद्ध अनेक मोठ्या लढाया केल्या. गनिमी युद्धाद्वारे त्यांच्या लष्करी प्रतिकारासाठी प्रताप लोकनायक बनले जे नंतर मलिक अंबर आणि शिवाजी महाराजांसह मुघलांच्या विरुद्ध बंडखोरांसाठी प्रेरणादायी ठरले. तसेच महाराणा प्रताप हे अनेक गुणांनी युक्त एक आदर्श राजा आणि स्वातंत्र्यवीर होते. तसेच त्यांचे धैर्य, इच्छाशक्ती, नेतृत्वगुण, न्यायप्रियता, शौर्य, दानशूरता आणि धार्मिकता यांसारख्या गुणांमुळे ते आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत." या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गोडबोले सर तर आभार श्री. कराड सर यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

2 hrs ago
user_M. p. gitte
M. p. gitte
परळी, बीड, महाराष्ट्र•
2 hrs ago
b15243db-d719-490b-9a11-6a685630926f

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
    1
    चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    1
    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    14 hrs ago
  • सांगलीत पत्रकार संजय भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळत तीन आरोपींना अटक केली आहे. अंबाबाई तालीम संस्थेच्या वादामुळे हा कट रचला गेल्याचा संशय असून, आरोपी फेब्रुवारीपासून भोकरेंची रेकी करत होते. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून, भोकरेंना तातडीने 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.
    1
    सांगलीत पत्रकार संजय भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळत तीन आरोपींना अटक केली आहे. अंबाबाई तालीम संस्थेच्या वादामुळे हा कट रचला गेल्याचा संशय असून, आरोपी फेब्रुवारीपासून भोकरेंची रेकी करत होते. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून, भोकरेंना तातडीने 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    18 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
    2
    लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
    user_Mahesh NIKAM
    Mahesh NIKAM
    औसा, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.
    user_RAFTAR HINDUSTAN KI
    RAFTAR HINDUSTAN KI
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
    1
    नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने वारकरी संप्रदायातील संतांवर कथित 'प्रतिगामी विचारांच्या घुसखोरी'चा आरोप केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे वारकरी संघटना आणि हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यभर निषेध आंदोलने केली आहेत. आंदोलकांनी प्रवक्त्याची जाहीर माफी आणि तात्काळ अटकेची मागणी केली असून, प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.
    1
    राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने वारकरी संप्रदायातील संतांवर कथित 'प्रतिगामी विचारांच्या घुसखोरी'चा आरोप केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे वारकरी संघटना आणि हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यभर निषेध आंदोलने केली आहेत. आंदोलकांनी प्रवक्त्याची जाहीर माफी आणि तात्काळ अटकेची मागणी केली असून, प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.