कीर्तनकार आणि संतांविरोधातील आरोपांनंतर पंढरपूर, आळंदीसह अनेक ठिकाणी निषेध; जाहीर माफी व अटकेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात कथित “प्रतिगामी विचारांची घुसखोरी” झाल्याचा आरोप करत काही कीर्तनकार आणि संत-महंतांची नावे सार्वजनिक केल्याने राज्यभर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय, हिंदू संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असून, लवांडे यांच्या विधानाने संत परंपरेचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे. पंढरपूर, आळंदी यांसह अनेक ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी लवांडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तात्काळ अटकेची मागणी केली. दरम्यान, संबंधित संत आणि वारकरी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विविध संघटनांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- कीर्तनकार आणि संतांविरोधातील आरोपांनंतर पंढरपूर, आळंदीसह अनेक ठिकाणी निषेध; जाहीर माफी व अटकेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात कथित “प्रतिगामी विचारांची घुसखोरी” झाल्याचा आरोप करत काही कीर्तनकार आणि संत-महंतांची नावे सार्वजनिक केल्याने राज्यभर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय, हिंदू संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असून, लवांडे यांच्या विधानाने संत परंपरेचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे. पंढरपूर, आळंदी यांसह अनेक ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी लवांडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तात्काळ अटकेची मागणी केली. दरम्यान, संबंधित संत आणि वारकरी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विविध संघटनांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड फाटा परिसरात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता डिझेल मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन पुकारण्यात आले. संतप्त आंदोलकांनी शासनाचा जीआर (सरकारी अध्यादेश) जाळून आपला निषेध नोंदवला.1
- मयत कुटुंबियांची वैजनाथ पावडे यांनी घेतली भेट 👏👏👏 हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथील रहिवासी धोंडीबा बार्शी हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करत आहेत. त्यांचा मुलगा योगेश धोंडीबा बार्शी हा देखील आपल्या आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी रात्रंदिवस रानोमाळ फिरून मेंढपाळ व्यवसाय करत होता. परंतु नियतीने अचानक घाला घातल्याने योगेश बार्शी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील पूर्णा परिसरामध्ये मेंढ्या चारत असताना दिनांक ६ मे रोजी योगेश यांनी मेंढ्यांना तलावावर पाणी पाजण्यासाठी नेले होते. त्यानंतर स्वतः आंघोळ करण्यासाठी तलावात उतरले असता अचानक पाय घसरल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतरही संबंधित प्रशासनाने अद्याप या कुटुंबाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष – वैजनाथ पावडे यांनी मयताच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संबंधित भागातील तहसीलदार आणि मतदारसंघातील आमदार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. “गरीब मेंढपाळ कुटुंबावर ओढवलेले हे संकट अत्यंत वेदनादायी असून शासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे करावा,” अशी अपेक्षा यावेळी वैजनाथ पावडे यांनी व्यक्त केली. धनगर समाज युवा मल्हार सेना ही सदैव मेंढपाळ समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास देखील त्यांनी कुटुंबियांना दिला.1
- बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.1
- बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अकोला बायपास परिसरात एका भरधाव कारने अचानक पेट घेतला. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- धाराशिव-उजनी राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात बीएलओचे काम पूर्ण करून परतणाऱ्या एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून, राज्यमार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.1