नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार; गुन्हा दाखल करण्याची नगराध्यक्षा छाया शेलार यांची मागणी हा माझा नव्हे, संविधान, लोकशाही आणि कर्जतकरांचा अपमान”; पत्रकार परिषदेत छाया शेलार आक्रमक कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याचा प्रकार हा केवळ व्यक्तीचा अपमान नसून लोकशाही व्यवस्थेचा, संविधानाने प्रदान केलेल्या पदाचा आणि समस्त कर्जतकर जनतेचा अवमान असल्याचा आरोप करीत संबंधितांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगराध्यक्षा सौ. छाया सुनील शेलार यांनी केली. दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी कर्जत नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात काही व्यक्तींनी प्रवेश करून नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घातल्याचा प्रकार घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. निधीच्या विषयाला राजकीय रंग दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाल्या की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन २०२६-२७ अंतर्गत प्राप्त निधी शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या वस्ती तसेच राखीव प्रभागासाठी खर्च करण्यात येत आहे. मात्र, या विषयाला जाणूनबुजून राजकीय रंग देऊन नगरपंचायत कार्यालयात गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मला कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. माझ्याकडे या विषयाची कोणतीही विचारपूस करण्यात आली नाही. थेट नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून अवमान करण्यात आला. लोकशाहीमध्ये प्रश्न मांडण्याचे अनेक मार्ग असताना अशा प्रकारे पदाचा अवमान करणे योग्य नाही,” असे शेलार यांनी सांगितले. “खुर्चीचा अवमान म्हणजे पदाचा अवमान” “नगराध्यक्षा हे शहराचे प्रथम नागरिक पद आहे. नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान हा केवळ माझा वैयक्तिक अपमान म्हणून पाहता येणार नाही. हा संविधानिक लोकशाही व्यवस्थेने दिलेल्या पदाचा अवमान आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे नगराध्यक्षा शेलार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गटनेते सतिश पाटील, नगरसेविका अश्विनी दळवी,लालासाहेब शेळके, दत्ता पिसाळ, रवी सुपेकर,नंदकुमार भैलुमे, सुनील शेलार उपस्थित होते.
नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार; गुन्हा दाखल करण्याची नगराध्यक्षा छाया शेलार यांची मागणी हा माझा नव्हे, संविधान, लोकशाही आणि कर्जतकरांचा अपमान”; पत्रकार परिषदेत छाया शेलार आक्रमक कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याचा प्रकार हा केवळ व्यक्तीचा अपमान नसून लोकशाही व्यवस्थेचा, संविधानाने प्रदान केलेल्या पदाचा आणि समस्त कर्जतकर जनतेचा अवमान असल्याचा आरोप करीत संबंधितांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगराध्यक्षा सौ. छाया सुनील शेलार यांनी केली. दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी कर्जत नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात काही व्यक्तींनी प्रवेश करून नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घातल्याचा प्रकार घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर
नगराध्यक्षा शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. निधीच्या विषयाला राजकीय रंग दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाल्या की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन २०२६-२७ अंतर्गत प्राप्त निधी शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या वस्ती तसेच राखीव प्रभागासाठी खर्च करण्यात येत आहे. मात्र, या विषयाला जाणूनबुजून राजकीय रंग देऊन नगरपंचायत कार्यालयात गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मला कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. माझ्याकडे या विषयाची कोणतीही विचारपूस करण्यात आली नाही. थेट नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून अवमान करण्यात आला. लोकशाहीमध्ये प्रश्न मांडण्याचे अनेक मार्ग असताना अशा प्रकारे पदाचा अवमान
करणे योग्य नाही,” असे शेलार यांनी सांगितले. “खुर्चीचा अवमान म्हणजे पदाचा अवमान” “नगराध्यक्षा हे शहराचे प्रथम नागरिक पद आहे. नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान हा केवळ माझा वैयक्तिक अपमान म्हणून पाहता येणार नाही. हा संविधानिक लोकशाही व्यवस्थेने दिलेल्या पदाचा अवमान आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे नगराध्यक्षा शेलार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गटनेते सतिश पाटील, नगरसेविका अश्विनी दळवी,लालासाहेब शेळके, दत्ता पिसाळ, रवी सुपेकर,नंदकुमार भैलुमे, सुनील शेलार उपस्थित होते.
- नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार; गुन्हा दाखल करण्याची नगराध्यक्षा छाया शेलार यांची मागणी हा माझा नव्हे, संविधान, लोकशाही आणि कर्जतकरांचा अपमान”; पत्रकार परिषदेत छाया शेलार आक्रमक कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याचा प्रकार हा केवळ व्यक्तीचा अपमान नसून लोकशाही व्यवस्थेचा, संविधानाने प्रदान केलेल्या पदाचा आणि समस्त कर्जतकर जनतेचा अवमान असल्याचा आरोप करीत संबंधितांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगराध्यक्षा सौ. छाया सुनील शेलार यांनी केली. दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी कर्जत नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात काही व्यक्तींनी प्रवेश करून नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घातल्याचा प्रकार घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. निधीच्या विषयाला राजकीय रंग दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाल्या की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन २०२६-२७ अंतर्गत प्राप्त निधी शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या वस्ती तसेच राखीव प्रभागासाठी खर्च करण्यात येत आहे. मात्र, या विषयाला जाणूनबुजून राजकीय रंग देऊन नगरपंचायत कार्यालयात गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मला कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. माझ्याकडे या विषयाची कोणतीही विचारपूस करण्यात आली नाही. थेट नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून अवमान करण्यात आला. लोकशाहीमध्ये प्रश्न मांडण्याचे अनेक मार्ग असताना अशा प्रकारे पदाचा अवमान करणे योग्य नाही,” असे शेलार यांनी सांगितले. “खुर्चीचा अवमान म्हणजे पदाचा अवमान” “नगराध्यक्षा हे शहराचे प्रथम नागरिक पद आहे. नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान हा केवळ माझा वैयक्तिक अपमान म्हणून पाहता येणार नाही. हा संविधानिक लोकशाही व्यवस्थेने दिलेल्या पदाचा अवमान आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे नगराध्यक्षा शेलार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गटनेते सतिश पाटील, नगरसेविका अश्विनी दळवी,लालासाहेब शेळके, दत्ता पिसाळ, रवी सुपेकर,नंदकुमार भैलुमे, सुनील शेलार उपस्थित होते.3
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक; युगेंद्र पवारांची तत्परता, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल1
- यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.1
- 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..1
- महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (मठाधिपती नारायणगड संस्थान), आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी), महंत महादेव महाराज भारती (बेलेश्वर संस्थान बेलगाव) श्री क्षेत्र भालचंद्र गणपतीच्या चरणी नतमस्तक.:-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर1
- कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन बीड | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” या प्रमुख मागणीसह गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने अदा करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. हलगीच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.2
- बारामती सुपा घाटात विदयार्थ्यांची S T बस. पलटी घटनास्थळी युगेंद्र पावरांची भेट.1