स्वारातीम विद्यापीठात तीन कर्मचाऱ्यांचा सेवा गौरव समारंभ संपादक:मोहम्मद रफीख स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रदीर्घ काळ सेवा बजावलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा सेवा गौरव समारंभ शुक्रवार, दि.३१ जुलै, २०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी अधीक्षक गणेश मारोतीराव कोंडेकर, सांख्यिक राजू काशिनाथराव द्याडे आणि वरिष्ठ लिपिक रमेश दत्तोबा गंडले यांना सेवापूर्तीनिमित्त सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते. यावेळी कुलसचिव प्रा. डॉ. ज्ञानेश्वर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सेवानिवृत्त होत असलेले गणेश कोंडेकर, राजू द्याडे आणि रमेश गंडले हे सपत्नीक व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन यांनी तिन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या सेवेत प्रदीर्घ काळ केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. विद्यापीठाच्या जडणघडणीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, तिन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करून डॉ. महाजन यांनी तिन्ही कर्मचाऱ्यांना पुढील निवृत्ती जीवनासाठी आरोग्यदायी, आनंदी व सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. परीक्षा विभागातील अधीक्षक गणेश कोंडेकर यांनी विद्यापीठाच्या सेवेत तब्बल ३० वर्षे ७ महिने सेवा बजावली. त्यांनी दि. १ जानेवारी १९९६ रोजी कनिष्ठ लिपिक म्हणून विद्यापीठ सेवेत प्रवेश केला. त्यानंतर वरिष्ठ लिपिक, सहायक अधीक्षक आणि अधीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली. विशेष कक्ष, परीक्षा विभाग, आस्थापना विभाग तसेच शैक्षणिक विभागात त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनिमित्त विद्यापीठाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. राजू द्याडे यांनी दि. २८ फेब्रुवारी २००६ रोजी सांख्यिक पदावर विद्यापीठ सेवेत प्रवेश केला. त्यांनी २० वर्षे ५ महिने ८ दिवस सेवा बजावली. विद्यापीठातील विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त विद्यापीठाच्या वतीने त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. विद्यापीठाच्या लातूर उपपरिसरातील वरिष्ठ लिपिक रमेश गंडले यांनी दि. १३ सप्टेंबर २०१२ रोजी कनिष्ठ लिपिक म्हणून विद्यापीठ सेवेत प्रवेश केला. त्यांनी सुमारे १३ वर्षे १० महिने १८ दिवस सेवा बजावली. आपल्या सेवाकाळात त्यांनी विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या. सेवापूर्तीनिमित्त त्यांचाही विद्यापीठाच्या वतीने सत्कार करून पुढील निवृत्ती जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तिन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विद्यापीठ प्रशासन तसेच कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या योगदानाचा गौरव केला. यावेळी सेवानिवृत्त होत असलेल्या गणेश कोंडेकर, राजू द्याडे आणि रमेश गंडले यांनी विद्यापीठातील आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील विविध अनुभवांना उजाळा दिला. विद्यापीठाच्या सेवेत कार्यरत असताना मिळालेले सहकार्य, मार्गदर्शन आणि आपुलकीच्या आठवणी व्यक्त करत त्यांनी विद्यापीठ प्रशासन, अधिकारी, कर्मचारी व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यापीठाच्या सेवेत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी विद्यापीठाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी तसेच कर्मचारी पतसंस्था व संघटनांचे पदाधिकारी यांचासह सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.1
- भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत नांदेड शहरात ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा नांदेड - भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शन होणार असून राकेश टिकैत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार (टैरिफ ट्रेड डील) धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामचंद्र येईलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाटउमरेकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते, जयवंतराव रुंजे, जगदीश जाधव आदींची उपस्थिती होती.1
- डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! फसवणूक डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! 📞 जर कोणी स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा इतर सरकारी अधिकारी सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर तुम्हाला "डिजिटल अटक" झाल्याचे सांगत असेल, तर तो नक्कीच सायबर फसवणुकीचा प्रयत्न आहे. ⚠️ लक्षात ठेवा: ✅ कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून अटक करत नाही. ✅ OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक तपशील कधीही शेअर करू नका. ✅ घाबरून पैसे ट्रान्सफर करू नका. ✅ संशयास्पद कॉल त्वरित बंद करा. ✅ सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा वर तक्रार नोंदवा. 🛡️ सतर्क नागरिकच सायबर गुन्हेगारांवर सर्वात मोठे शस्त्र आहेत. माहितीपूर्ण राहा, सुरक्षित राहा! #DigitalArrest #CyberFraud #CyberCrime #CyberSafety #NandedPolice #MaharashtraPolice #StopCyberFraud #OnlineSafety #CyberAwareness #Dial1930 #CyberCrimeHelpline #ThinkBeforeYouTrust #StayAlert #SafeDigitalIndia #ALMBharat #NNLMarathi1
- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.1
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथे समाधान शिबिर; दिवंगत नेते अजितदादा पवार यांना अभिवादन लोहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमित्त लोहा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच स्थानिक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांनीही आपल्या समस्या मांडून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले.1
- किनवट तालुक्यात मागील तीन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले व ओढ्याला पूर आला असून अनेक गावामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. याच अनुषंगाने पिंपळगाव सी येथील श्रीमती कमलाबाई गुलाब गुरनुले (विधवा) मु पो पिंपळगाव सि (फाटा) ता किनवट जि नांदेड यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना रडू कोसळले, शासनाने तात्काळ मदत करावी ही अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.1