फुलसावंगी येथे अवैध सावकारावर धाड सावकार दाम्पत्याच्या घराची झडती; अनेक कागदपत्रे जप्त महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील वॉर्ड क्रमांक २ मधील रहिवासी असलेल्या काटोले दाम्पत्याच्या घरी आज पुसद व महागाव येथील सहायक निबंधकांच्या संयुक्त पथकाने धाड टाकून सखोल झडती घेतली. जवळपास पाच तास चाललेल्या या कारवाईत पथकाने अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असल्याची माहिती मिळाली आहे. सततची नापिकी व दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अनेक जण अवैध सावकारांच्या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. मनमानी व अवाजवी व्याजदरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. मात्र काही शेतकरी अन्यायाविरोधात आवाज उठवत अवैध सावकारांना आव्हान देत आहेत. याच पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यातील वरोडी (नवीन) येथील महिला शेतकरी देवशाला अरविंद कोनपत्रीवार यांनी फुलसावंगी येथील संतोष गणपत काटोले व त्यांच्या पत्नी सविता काटोले यांच्या विरोधात अवैध सावकारीबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पुसद व महागाव येथील सहायक निबंधकांच्या पथकाने संयुक्तरित्या काटोले दाम्पत्याच्या राहत्या घरी छापा टाकला. छाप्यावेळी संतोष काटोले हे नांदेड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने घरातील कागदपत्रांची ऑन-कॅमेरा तपासणी सुरू केली. तपासादरम्यान काही दरवाजे व आलमारीची कुलपे तोडून शोध घेण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे.

- Post by मनिषा विजय काशीवार4
- திண்டுக்கல் மாவட்டம் வேடசந்தூர் சட்டமன்றத் தொகுதி அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் பரமசிவம் அவருக்கு ஆதரவாக முன்னாள் பாரதிய ஜனதா கட்சியின் தலைவர் அண்ணாமலை அவர்கள் தீவிர வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அவருக்கு வழி எங்கிலும் கட்சியினர் உற்சாக வரவேற்பு அளித்தனர்.1
- चंद्रपुरातील प्रदूषणाबाबत तोडगा काढण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात आल्या होत्या मात्र यावेळी त्यांचे वाहन प्रदूषणाच्या धुळीने माखल्या गेले. यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिले आहे.1
- मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri1
- "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by मनिषा विजय काशीवार4
- Post by Pitam Parjapati1
- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1