साकोली येथे व्हाईस आँफ मिडीयाच्या पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी झटणारी संघटना म्हणजे "व्हॉईस ऑफ मीडिया" - जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर • साकोलीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला केले प्रतिपादन • लवकरच कार्यकारिणी होणार घोषित • साकोली : "पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी झटणारी व त्यांच्या कुटुंबीयांना नियमाप्रमाणे लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणजे "व्हॉईस ऑफ मीडिया" होय. आज भारत देशात ४ लाख ७० हजार पत्रकार सदस्यगण असलेली जागतिक पातळीवरील या संघटनेत सर्व क्षेत्रातील पत्रकारांनी सामिल व्हा असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया भंडारा जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर यांनी केले. काल ( गुरु. १६ एप्रिल ) ला साकोली तालुक्यातील पत्रकारांची महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. यात लाखनी व साकोली येथील कार्यकारिणीची लवकरच घोषणा करण्यात येणार असे शशिकांत भोयर यांनी सांगितले. या महत्त्वाच्या बैठकीला अतिथी म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर, पत्रकार डी. जी. रंगारी, भंडाराचे पत्रकार शामकुंवर हे उपस्थित होते. यादरम्यान जिल्हाध्यक्ष भोयर यांनी सांगितले की, ही आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे सर्वच प्रसारमाध्यमे, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील पत्रकार, रिपोर्टर, प्रतिनिधी, सोशल मिडीयाचे युट्यूब चैनल, पोर्टल व इतर प्रसारण करणा-या व त्यात काम करणाऱ्या पत्रकारांना एक खुला मंच उपलब्ध करून देण्यात व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना यशस्वी ठरली आहे. समोर पत्रकारांच्या मुलांना एमपीएससी व यूपीएससीचे मोफत शिक्षण, विमा, बस पास, पत्रकारांना पेन्शन, मुलांना विदेशातील शिक्षण या प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा ही संघटना सातत्याने लढा देत आहे. म्हणून सर्व क्षेत्रातील पत्रकारांनी, सोशल मिडीयावरील आजचे युवा तरबेज रिपोर्टर तथा प्रतिनिधींनी या आंतरराष्ट्रीय संघटनेत सामील व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हा अध्यक्षांनी साकोली तालुक्यातील सर्व पत्रकारांचा संवादातून परीचय मिळवून घेतला व नोंदणी केली. आणि लवकरच जिल्हा स्तरावरून एक कार्य बैठक घेऊन लाखनी व साकोली तालुक्यातील नविन कार्यकारिणी अवघ्या दिवसात घोषित केले जाईल असेही ते म्हणाले. व्हॉईस ऑफ मीडिया या साकोली बैठकीला याप्रसंगी सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल नेटवर्किंग मिडीयाचे पत्रकार व प्रतिनिधींनी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर यांचे व अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत अभिनंदन केले. यावेळी बैठकीला दैनिक सकाळच्या मनिषा काशिवार, युवाराष्ट्र दर्शन चे आशिष चेडगे, नवराष्ट्र चे किशोर रंगारी, देशोन्नती चे ताराचंद कापगते, न्यूज मराठी चे यशवंत कापगते, दै. महासागर चे शाहेद कुरैशी, नवभारत चे सुनिल जगिया, पुरोगामी संदेश चे किशोर बावणे, दि लोकल व्हॉईस चे अयुब खान, साकोली वार्ता चे राकेश भास्कर, सा. आकाशतरंग चे रवि भोंगाणे, नवराष्ट्र चे ऋग्वेद येवले, लोकमान्य मराठी न्यूज चे साहिल रामटेके हे प्रामुख्याने उपस्थित होते. आभार प्रदर्शन मनिषा काशिवार यांनी मानले.
साकोली येथे व्हाईस आँफ मिडीयाच्या पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी झटणारी संघटना म्हणजे "व्हॉईस ऑफ मीडिया" - जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर • साकोलीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला केले प्रतिपादन • लवकरच कार्यकारिणी होणार घोषित • साकोली : "पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी झटणारी व त्यांच्या कुटुंबीयांना नियमाप्रमाणे लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणजे "व्हॉईस ऑफ मीडिया" होय. आज भारत देशात ४ लाख ७० हजार पत्रकार सदस्यगण असलेली जागतिक पातळीवरील या संघटनेत सर्व क्षेत्रातील पत्रकारांनी सामिल व्हा असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया भंडारा जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर यांनी केले. काल ( गुरु. १६ एप्रिल ) ला साकोली तालुक्यातील पत्रकारांची महत्त्वपूर्ण बैठक शासकीय
विश्रामगृहात संपन्न झाली. यात लाखनी व साकोली येथील कार्यकारिणीची लवकरच घोषणा करण्यात येणार असे शशिकांत भोयर यांनी सांगितले. या महत्त्वाच्या बैठकीला अतिथी म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर, पत्रकार डी. जी. रंगारी, भंडाराचे पत्रकार शामकुंवर हे उपस्थित होते. यादरम्यान जिल्हाध्यक्ष भोयर यांनी सांगितले की, ही आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे सर्वच प्रसारमाध्यमे, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील पत्रकार, रिपोर्टर, प्रतिनिधी, सोशल मिडीयाचे युट्यूब चैनल, पोर्टल व इतर प्रसारण करणा-या व त्यात काम करणाऱ्या पत्रकारांना एक खुला मंच उपलब्ध करून देण्यात व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना यशस्वी ठरली आहे. समोर पत्रकारांच्या मुलांना एमपीएससी व
यूपीएससीचे मोफत शिक्षण, विमा, बस पास, पत्रकारांना पेन्शन, मुलांना विदेशातील शिक्षण या प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा ही संघटना सातत्याने लढा देत आहे. म्हणून सर्व क्षेत्रातील पत्रकारांनी, सोशल मिडीयावरील आजचे युवा तरबेज रिपोर्टर तथा प्रतिनिधींनी या आंतरराष्ट्रीय संघटनेत सामील व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हा अध्यक्षांनी साकोली तालुक्यातील सर्व पत्रकारांचा संवादातून परीचय मिळवून घेतला व नोंदणी केली. आणि लवकरच जिल्हा स्तरावरून एक कार्य बैठक घेऊन लाखनी व साकोली तालुक्यातील नविन कार्यकारिणी अवघ्या दिवसात घोषित केले जाईल असेही ते म्हणाले. व्हॉईस ऑफ मीडिया या साकोली बैठकीला
याप्रसंगी सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल नेटवर्किंग मिडीयाचे पत्रकार व प्रतिनिधींनी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर यांचे व अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत अभिनंदन केले. यावेळी बैठकीला दैनिक सकाळच्या मनिषा काशिवार, युवाराष्ट्र दर्शन चे आशिष चेडगे, नवराष्ट्र चे किशोर रंगारी, देशोन्नती चे ताराचंद कापगते, न्यूज मराठी चे यशवंत कापगते, दै. महासागर चे शाहेद कुरैशी, नवभारत चे सुनिल जगिया, पुरोगामी संदेश चे किशोर बावणे, दि लोकल व्हॉईस चे अयुब खान, साकोली वार्ता चे राकेश भास्कर, सा. आकाशतरंग चे रवि भोंगाणे, नवराष्ट्र चे ऋग्वेद येवले, लोकमान्य मराठी न्यूज चे साहिल रामटेके हे प्रामुख्याने उपस्थित होते. आभार प्रदर्शन मनिषा काशिवार यांनी मानले.
- Post by मनिषा विजय काशीवार4
- हिवरा संगम–धनोडा येथे अवैध धंद्यांना उधाण; पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर हिवरा संगम/धनोडा : महागाव तालुक्यातील हिवरा संगम व धनोडा परिसरात सध्या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उधाण आले असून, काही पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. गावातील मुख्य चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर या ठिकाणी संशयितांची वर्दळ दिसून येते. युवक वर्गही या अवैध प्रकारांकडे आकर्षित होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्याने या व्यवसायांना जणू अभय मिळाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा अवैध मटका काउंटरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पानटपऱ्यांच्या आड सुरू असलेल्या या धंद्यांवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- नटवरलाल माणिक लाल दलाल महाविद्यालय, गोंदिया में विश्वरत्न, भारतरत्न, संविधान निर्माता और राष्ट्रनिर्माता परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई।1
- गोंदिया जिले के एकोडी स्थित जिला परिषद भारतीय उच्च माध्यमिक विद्यालय में लगातार तोड़फोड़ की घटनाएं सामने आ रही हैं। हाल ही में अज्ञात लोगों ने स्कूल की खिड़कियों के कांच तोड़ दिए, जिससे परिसर में नुकसान हुआ है। इससे पहले स्कूल में आयोजित लावणी व छत्तीसगढ़ी डांस कार्यक्रम के दौरान कुछ बच्चों द्वारा CCTV कैमरे तोड़े गए थे, जिनकी फुटेज भी सामने आई थी। उस समय डांस कमेटी ने नुकसान की भरपाई करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक कोई भरपाई नहीं की गई। घटना को लेकर प्राचार्य की ओर से गंगाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है, लेकिन 9-10 दिन बीत जाने के बावजूद भी पुलिस द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। लगातार हो रही घटनाओं और पुलिस की निष्क्रियता से स्कूल की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं।1
- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.1
- शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती नागपूर: शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला. प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला1
- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1
- Post by मनिषा विजय काशीवार4