Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- खामगांव : गौ सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन कडून खामगांव शहरातील बेवारस गौ वंश वर उपचार करण्यात आले. येथील आठवडी बाजार स्थित एक नंदीच्या शिंगेला दुखापत होऊन त्याच्या मागच्या पायाची नस कटून तो गंभीर जखमी अवस्थेत जास्त प्रमाणात रक्तस्त्राव वाहून गेल्याने तो रक्त बंबाळ अवस्थेत होता एकनिष्ठा गौ सेवकांनी लगेच त्याच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचविला. आठवडी बाजार स्थित एक वासरूला मोठ्या प्रमाणात विष बाधा झाली होती त्या वासरूवर उपचार करण्यात आले परंतु दुर्दैवाने तो मृत्युमुखी पडला. सिव्हिल लाईन स्थित एक गौ माता विष बाधा होऊन मृत्युमुखी पडलेली होती घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवकांनी नगर परिषद ला माहिती देऊन तिचा अंतिम संस्कार करायला लावला. समन्वय नगर स्थित एक गौ माता दोन दिवसा पासून रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत तडफडत होती तिच्यावर उपचार करून तिला वाचविण्यात गौ सेवकांना यश आले. जगदंबा चौक स्थित एका नंदिच्या पायाला मुका मार लागलेला होता गौ सेवकांनी लगेच उपचार करून त्याचा पाय चांगला केला. बारादरी स्थित एका गौ मातेच्या समोरच्या पायाच्या खुरात जखम झाली होती तिच्यावर उपचार करून तिची जखम बरी करण्यात आली. मेनरोड फरशी भागात एका नंदीच्या समोरच्या पायाला दुखापत होऊन तो तडफडत होता त्या नंदीवर लगेच उपचार करण्यात आले. पाण्याची टाकी वामन नगर स्थित एक गौ माता प्रसूती दरम्यान शॉक मध्ये गेलेली होती तिच्या पोटात वासरू आडवा होऊन फसलेला होता तिच्यावर उपचार करून वासरूला वाचविण्यात डॉक्टर गौ सेवकांना यश आले परंतु दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ती बेवारस गौ माता शांत झाली. अमृत नगर स्थित एका नंदीच्या पाठीच्या मागे मोठ्या प्रमाणात जखम होऊन त्याच्यात अळ्या पडलेल्या होते गौ सेवकांनी लगेच उपचार करून नंदीला चांगले केले. या गौ सेवेत एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनचे गौ सेवक सुरजभैय्या यादव, डॉ. शुभम जरांगे, डॉ. पवन घडेकर, ज्ञानेश सेवक सर, योगेश राऊत, नरेश मसनेवार, आकाश शेंबरे, निलेश हजारे, राहुल नाटेकर, अजय वानखडे, मनिष सिरसाठ, प्रमोद ढोलेकर, भारत इंगळे, दिपक महाकाळे, योगेश ईर, स्वप्निल दांदळे, शुभम, आर्यन निळे, करण ठाकुर, करण मोरे, पृथ्वी जाधव, गौरव कवटेकर, प्रदीप शमी, आशिष शर्मा, चेतन कदम, विशाल ठाकुर, अविनाश इंगळे, सागर अवसरमोल, लखन पिवाल, संतोष जाधव आदि लोकांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे गौ वंश वर उपचारासाठी परिश्रम घेतले या गौ सेवेत संपूर्ण लागलेला खर्च एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आला. अशी माहिती स्वप्निल दांदळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका! हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने खांब न हटवता काम पूर्ण केल्याने सध्या वाहनांची ये-जा अडचणीत आली आहे. अनेक अपघात घडून काहींना गंभीर दुखापत व अपंगत्वही आले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वी उपोषण केल्यानंतर खांब हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दीड महिना उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Nanded #RoadSafety #Mahavitaran #PublicIssue BreakingNews MaharashtraNews TrafficProblem1
- Post by Amol Gawai3
- महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अभाविप व विद्यार्थ्यांविषयी केलेल्या अपमानास्पद व धमकीजनक वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जालना शाखेच्या वतीने छेडण्यात आलेल्या “विद्यार्थी आत्मसन्मान आंदोलन” ला मोठा प्रतिसाद मिळाला. दिनांक ११ एप्रिल रोजी ‘पक्षी मित्र अभियान’ या उपक्रमादरम्यान संबंधित प्राचार्यांनी अभाविप व कार्यकर्त्यांविषयी अवमानकारक व अशोभनीय भाषा वापरली होती. तसेच, विद्यार्थ्यांनी याचा निषेध केल्यानंतर “तुमचे शैक्षणिक करिअर उद्ध्वस्त करीन” व “जीवे मारीन” अशा स्वरूपाच्या गंभीर धमक्या दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अभाविपने आक्रमक भूमिका घेत संस्थेच्या अध्यक्षांना निवेदन सादर केले होते. आंदोलनाची चाहूल लागताच प्राचार्य रजेवर निघून गेले असतांना सुद्धा आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता संबंधित प्राचार्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल व्हिडिओ कॉल वरून माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, संस्थेकडून या प्रकरणात उद्या योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही समजते. अभाविपची भूमिका पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे: • प्राचार्यांची माफी ही सकारात्मक पाऊल असले तरी, केवळ माफी पुरेशी नाही • संबंधित प्राचार्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा • संस्थेकडून ठोस व पारदर्शक कारवाई करण्यात यावी यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. आंदोलनानंतर प्राचार्यांनी माफी मागितली, ही बाब लक्षात घेतली आहे; मात्र इतक्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात केवळ माफी पुरेशी ठरत नाही. संस्थेकडून उद्या होणाऱ्या कारवाईकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. जर कारवाई समाधानकारक नसेल, तर अभाविप पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन उभारेल.” अभाविपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी लढा सुरूच राहील आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहील. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, जालना जिल्हा संयोजक पवन नरवडे, शहर मंत्री गणेश बोंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.1
- Post by Mohsin ahmed khan1
- shjfsfhjjfddfhhcxdhhdshhhcdsfgghhgfdddhhfxdd1
- खामगाव : नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ महिलांनी शहरातून रॅली काढून जल्लोष केला. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे संकल्पनेतून लोकसभा व राज्यसभा सभागृहात नारी शक्ती वंदन हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे देशाच्या विकास यात्रेत हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी येत्या 16,17 व 18 एप्रिल रोजी विशेष अधिवेशनसुद्धा बोलाविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल 15 एप्रिल रोजी भाजपा महिला आघाडी व विविध सामाजिक संघटनाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.शहरात भव्य रॅली काढून या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला वंदन करून अर्जुन जल मंदिर येथून दुपारी 4 वाजता रॅलीला सुरवात झाली . महावीर चौक, मेन रोड, मोहन चौक, शहीद भगतसिंग चौक, एकबोटे चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत भाजप कार्यालय टॉवर चौक येथे झाला. नगरध्यक्षा सौ अपर्णा फुंडकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीत भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ सारिकाताई डागा, खामगाव तालुकाध्यक्षा सौ श्रद्धा धोरण धोरण,तालुकाध्यक्षा श्रद्धा जोशी,शहराध्यक्षा सौ भाग्यश्री मानकर ,माजी प. स. सौ उर्मिलाताई गायकी सौ शिवानी कुलकर्णी नगरसेविका सौ कांता पवार,सौ नीलिमा डोरले, सौ जानवी कुलकर्णी,रुबीना पटेल, सौ ज्योती काळे,सौ सत्यभामा दही, सौ ज्योती पवार,सौ सरला नेमाने, सौ लता ताठे, सौ इंद्रायणी घोगले, सौ वंदना मानकर, सो मनकर्णा क्षीरसागर,सौ आशा करंगळे, सौ सुरेखा बोचरे, सौ मनीषा खंडारे, सौ उमा ठोंबरे, सौ कोकिला देशमुख,सौ खडसनेताई, सौ सुनीता पानझाडे, सौ प्रमिला मोरे रजनी भारसाकडे, सौ छाया भावसार, सौ रेखा शेळके, सौ अनिता डाहे, सौ सविता साने, सौ सुरेखा जाधव, सौ मयुरी बोदडे, सौ कोमल थानवी, सौ लीलावती जोशी, सौ सोनल सदावर्ते, सौ शितल सदावर्ते, सौ पायल कडाळे, सौ सुरेखा ठाकरे, सौ अश्विनी हेलोडे,सौ विद्या इंगळे रेखा हेलोडे, सो मंगला सुळे, सौ गीता देशमुख, सौ सरस्वती वेरुळकर, सौ सारिका शमी, सौ ज्योती शर्मा,सौ कल्पना कस्तुरे,सौ कांचन मंदानी, सौ वर्षा शमी,सौ रुपाली पारस्कर, सौ पौर्णिमा चोटलानी, सौ कल्पना वाघाडे, सौ अरुणा राऊत, सौ शितल मोरे, सौ शारदा खुमकर, सौ रुख्मा काटे , सौ अनिता वानखडे, सौ राधा गायकवाड, सौ वैशाली चांभारे, सौ वर्षा हिवराळे, सौ दीक्षा चोपडे, सौ सोनू इंगळे, आधी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या व जल्लोष करीत या विधेयकाचे स्वागत केले. यावेळी या विधेयकाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. शेकडो महिला व नागरिकांनी फलकावर स्वाक्षरी केल्या.1
- घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे. #Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue1