अहमदपूर पोलिसांनी हाडोळती येथे सापळा लावून पकडला २ लाख ७० हजारांचा सुगंधित गुटखा; एका आरोपीला अटक अहमदपूर पोलिसांनी हाडोळती येथे सापळा लावून पकडला २ लाख ७० हजारांचा सुगंधित गुटखा; एका आरोपीला अटक अहमदपूर ( गोविंद काळे ) महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थांच्या आणि गुटख्याच्या अवैध विक्रीविरोधात अहमदपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जळकोटहून अहमदपूरकडे कारमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी हाडोळती बसस्थानक परिसरात सापळा लावून एका कारसह १ लाख ७० हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत होते. शिरूर ताजबंद येथे गस्त घालत असताना, जळकोट बाजूकडून एका पांढऱ्या रंगाच्या इंडिगो कारमध्ये (क्र. एम.एच.१२ एल.पी.५७५०) प्रतिबंधित गुटखा येत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हाडोळती बसस्थानक परिसरात सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास नाकेबंदी केली. संशयित कार आल्यानंतर पोलिसांनी ती थांबवून पंचासमक्ष झडती घेतली असता, कारच्या मागील सीटवर आणि डिकीमध्ये पांढऱ्या व खाकी पोत्यात लपवून ठेवलेला विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू आणि डायरेक्टर स्पेशल पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत १ लाख २४ हजार ८०० रुपयांचा विमल पानमसाला, ३१ हजार २०० रुपयांची व्ही-१ तंबाखू, १४ हजार ४०० रुपयांचा डायरेक्टर स्पेशल मसाला व तंबाखू आणि १ लाख रुपये किमतीची कार असा एकूण २ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कार चालक आल्लाबक्ष इलाही तांबोळी (वय ३० वर्षे, रा. मारवाडी गल्ली, अहमदपूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५ आणि २२३ अन्वये अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, पोलीस हवालदार तानाजी आरदवाड, गंगाधर चपडे, हरी कांबळवाड आणि दत्तात्रय इंदाळे विशाल सारोळे ,पद्माकर पांचाळ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

- महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती. ₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 01 एप्रिल 2026. लातूर शहरालगतच्या नव्या वस्त्या व गावांना शहरासारख्याच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत येथे ₹१ कोटी ६० लाखांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार निधीतून एकत्रितपणे विविध मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकाच गावात अनेक कामे केल्यास त्यांचा दर्जा सुधारतो आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळतो, असे देशमुख यांनी सांगितले. हद्दवाढीतील तांत्रिक अडचणींमुळे ‘झालर क्षेत्रा’तील नागरिकांना सुविधा मिळण्यात अडथळे येतात, ही समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, रस्ते, सिटीबस सेवा आणि इतर सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या भागासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार १६ विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामे खासदार निधीतूनही राबवली जाणार आहेत. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.1
- खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ1
- Post by Mushtaq Shaikh1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Today One Live1
- Post by Jafar tarodekar1
- महाराष्ट्र दिनी लातूर पोलिसांचा रक्तदानाचा अभिनव उपक्रम. खाकी’तील माणुसकीचा स्पर्श! रक्तदात्यांना हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट; सहा केंद्रांवर उत्स्फूर्त सहभाग. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक 01 मे 2026. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘खाकी’तील माणुसकीचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाअंतर्गत शहरातील पत्रकार प्रकाश कंकाळ यांच्यासह विविध स्तरातील नागरिकांनी रक्तदान करून सहा विविध केंद्रांवर रक्तसंकलन करण्यात आले. सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी दिसून आली. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या शिबिरात उत्साहाने भाग घेतला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास पोलिसांकडून हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे रक्तदानासोबतच रस्ते सुरक्षा जनजागृतीचाही संदेश देण्यात आला. लातूर पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सेवा आणि सुरक्षा’ या ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम ठरला आहे.3
- विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख1
- Post by Today One Live1