'भाऊंच्या' आशीर्वादाने गुंजमध्ये सुरेशचा हैदोस ?महागाव तालुक्यातील गुंज महागाव तालुक्यातील गुंज परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मटका, जुगार, अवैध दारूविक्री आणि हाणामाऱ्या यांसारख्या गुन्हेगारी प्रकारांनी डोके वर काढले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व अवैध धंद्यांच्या मागे सुरेशनावाच्या व्यक्तीचा हात असल्याची चर्चा परिसरात रंगली असून त्याला उमरखेड येथील एका सत्ताधारी पक्षाशी संबंधित 'भाऊ'चा वरदहस्त असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुंज भागात सट्टा, जुगार आणि दारूविक्रीचे अड्डे खुलेआम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सुरेशवर हाणामाऱ्या, दहशत निर्माण करणे आणि शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची चर्चा असूनही तो परिसरात उजळमाथ्याने फिरत असल्याने पोलिसांचा धाक उरला नसल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे. नुकत्याच घडलेल्या एका अॅट्रॉसिटी प्रकरणातही कठोर कारवाईन होता केवळ सूचनादेऊन प्रकरणसोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगू लागली आहे. गुंज परिसर शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. मात्र येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे अल्पवयीन विद्यार्थी आणि तरुण वर्ग चुकीच्या मार्गाकडेवळत असल्याची चिंता पालक आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे. काही कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक परिणामही दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर गुंजमधील अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि राजकीय आडोशाला चालणाऱ्या अशा प्रवृत्तींना लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
'भाऊंच्या' आशीर्वादाने गुंजमध्ये सुरेशचा हैदोस ?महागाव तालुक्यातील गुंज महागाव तालुक्यातील गुंज परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मटका, जुगार, अवैध दारूविक्री आणि हाणामाऱ्या यांसारख्या गुन्हेगारी प्रकारांनी डोके वर काढले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व अवैध धंद्यांच्या मागे सुरेशनावाच्या व्यक्तीचा हात असल्याची चर्चा परिसरात रंगली असून त्याला उमरखेड येथील एका सत्ताधारी पक्षाशी संबंधित 'भाऊ'चा वरदहस्त असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुंज भागात सट्टा, जुगार आणि दारूविक्रीचे अड्डे खुलेआम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सुरेशवर हाणामाऱ्या, दहशत निर्माण करणे आणि शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची चर्चा असूनही तो परिसरात
उजळमाथ्याने फिरत असल्याने पोलिसांचा धाक उरला नसल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे. नुकत्याच घडलेल्या एका अॅट्रॉसिटी प्रकरणातही कठोर कारवाईन होता केवळ सूचनादेऊन प्रकरणसोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगू लागली आहे. गुंज परिसर शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. मात्र येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे अल्पवयीन विद्यार्थी आणि तरुण वर्ग चुकीच्या मार्गाकडेवळत असल्याची चिंता पालक आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे. काही कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक परिणामही दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर गुंजमधील अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि राजकीय आडोशाला चालणाऱ्या अशा प्रवृत्तींना लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका! हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने खांब न हटवता काम पूर्ण केल्याने सध्या वाहनांची ये-जा अडचणीत आली आहे. अनेक अपघात घडून काहींना गंभीर दुखापत व अपंगत्वही आले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वी उपोषण केल्यानंतर खांब हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दीड महिना उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Nanded #RoadSafety #Mahavitaran #PublicIssue BreakingNews MaharashtraNews TrafficProblem1
- हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. २०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी न्यायापासून वंचित निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक १७ एप्रिल नांदेड: शहरातील जलाराम मंदिर, दिलीप सिंग कॉलनी परिसरात अचानक विद्युत वाहक तार तुटल्याची घटना घडली. भरवस्तीत तार तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक तुलजाराम यादव यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे. दिलीप सिंग कॉलनी भागात विद्युत तार तुटल्याची तक्रार स्थानिकांनी नगरसेवक तुलजाराम यादव यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. नगरसेवक यादव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आणि धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून नगरसेवकांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Today One Live1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष! हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली. #DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews1
- Post by Nandkumar Motiram Totewad1