Shuru
Apke Nagar Ki App…
उमरखेड शहरातील सारडा पेट्रोल पंप बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाकडून हा पंप त्वरित हटवण्याची मागणी होत असून, प्रशासन यावर कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शाहदत खान अहमद नुर खान
उमरखेड शहरातील सारडा पेट्रोल पंप बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाकडून हा पंप त्वरित हटवण्याची मागणी होत असून, प्रशासन यावर कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- परभणी जिल्ह्यातील खळी येथे अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करण्यात आली.1
- ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर साठ टक्के जनता एकत्र येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये काय परिणाम होतील, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी प्रा. हाके यांनी केली आहे.1
- मंठा तालुक्यात दि. २६ मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केहाळ वडगाव परिसरात मोठे नुकसान झाले आहे. गावातील एक वीज पोल कोसळला असून, शेतातील दोन ठिकाणी प्रत्येकी चार-चार वीज पोल मोडून पडल्याने विद्युत तारा तुटल्या आहेत. या घटनेला तब्बल पाच दिवस उलटूनही महावितरणकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे तसेच जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत कठीण झाले आहे. विहिरी व बोअरवेलच्या मोटारी बंद पडल्याने अनेक शेतकऱ्यांना जनावरांना हाताने पाणी शेंदून पाजावे लागत आहे, ज्यामुळे पशुपालक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, गावात कोसळलेला वीज पोल रस्त्यावर आडवा पडल्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय, अनेक मीटरधारकांनी स्वतःच्या खर्चाने वायर खरेदी करून दूरवरून घरापर्यंत वीज जोडणी केल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या गोरगरीब नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडला आहे. पावसाळा तोंडावर आला असून लवकरच खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू होणार आहेत. पेरणी झाल्यानंतर शेतांमध्ये वीज पोल उभारणे व दुरुस्तीची कामे करणे अधिक अवघड होणार असल्याने, पाऊस व पेरणीपूर्वीच तातडीने नवीन पोल उभारून तुटलेल्या तारा दुरुस्त कराव्यात आणि वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी केहाळ वडगाव येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महावितरणच्या या दिरंगाईमुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना व पशुपालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून ही समस्या तातडीने मार्गी लावावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.1
- ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी तक्रार निवारण दिनानिमित्त दत्तापूर पोलीस ठाण्यास भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. अधीक्षकांनी पोलीस ठाण्याची सविस्तर पाहणी करत अधिकारी, अमलदार व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी त्यांनी संयमाने ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या तत्काळ निराकरणाच्या सूचना दिल्या. याव्यतिरिक्त, काही आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना कायद्याचे पालन करण्याबाबत समुपदेशनही करण्यात आले. त्यांनी शहर व परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून ते पूर्णपणे बंद ठेवण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक कदम यांनी उपस्थितांशी हितगुज करत त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या आणि पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ११२ या हेल्पलाईन क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आगमनावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास दत्तापूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, अमलदार व कर्मचारी उपस्थित होते. या तक्रार निवारण दिनामुळे नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपली मते व समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.1
- गुन्हे शाखेने अवैध दारू निर्मितीवर मोठी कारवाई करत छापा टाकला. या छाप्यात २ लाख ७६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.1
- एका प्रेमी युगुलाची खरी प्रेम कहाणी समोर आली आहे. आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या प्रेयसीला 'दुसऱ्या जन्मातही तूच माझी हो' असे म्हणत, तिच्या प्रियकराने दवाखान्यातच तिच्याशी लग्नगाठ बांधली.1
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या समता यात्रेच्या आगमनामुळे आज मंठा शहर सामाजिक जागृतीच्या वातावरणाने भारावून गेले. पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्यात १ जानेवारी १८४८ रोजी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली होती. स्त्री शिक्षणाच्या या ऐतिहासिक वारशाचे स्मरण व्हावे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने भिडे वाड्याची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली होती. या प्रदर्शनाद्वारे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा व विचारांचा जागर करण्यात आला. या प्रतिकृतीला नागरिक, विद्यार्थी आणि महिलांनी मोठी गर्दी केली, अनेकजणांनी महापुरुषांच्या कार्याची माहिती जाणून घेत सामाजिक परिवर्तनाच्या या चळवळीला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी निघालेली “समता यात्रा” मंठा तालुक्यात दाखल झाली. या यात्रेचे शहरात विविध ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष आणि घोषणाबाजी करत उत्साहात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश देणारी ही यात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली. सामाजिक समता, शिक्षण, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार करणाऱ्या या यात्रेमुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. एकूणच, भिडे वाड्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन आणि समता यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत या दुहेरी सामाजिक प्रबोधन पर्वामुळे मंठा शहरात उत्साहपूर्ण आणि शांततेत महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारा कार्यक्रम पार पडला.1
- अमरावती शहरातील रहमतनगर भागातील नागरिकांनी कचरा वाहने रोखत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. रहमतनगरच्या नागरिकांनी हे पाऊल उचलून प्रशासनाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.1
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मध्यरात्रीपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक दिवस चाललेल्या उपोषणामुळे शरीरात अशक्तपणा, पाण्याची कमतरता आणि इतर आरोग्यविषयक तक्रारी निर्माण झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवावे लागले. उपोषण मागे घेतल्याबद्दल कार्यकर्ते व समर्थकांनी समाधान व्यक्त केले असले तरी, त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, डॉक्टरांकडून आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्या जात असून, प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.1