logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र शासनाने जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री व वाहतुकीवर बंदी घातलेली असतानाही काही व्यक्तींकडून या आदेशांचे उल्लंघन करत चोरट्या मार्गाने अवैध वाहतूक व विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर कठोर भूमिका घेत, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ११ लाख ६८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ६ जून २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास, उदगीरहून लातूरकडे जाणाऱ्या मार्गावर बावलगाव पाटीजवळ पोलीस पथक गस्त व तपासणी करत असताना एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वाहनातून 'विमल पान मसाला' ब्रँडचे एकूण ३,१२० पुडे जप्त केले, ज्यांची किंमत सुमारे ३ लाख २७ हजार ६०० रुपये आहे. तसेच, 'व्ही-१ सुगंधित तंबाखू' या प्रकारचे ३,१२० पुडे आढळून आले, ज्यांची किंमत १ लाख ४० हजार ४०० रुपये इतकी आहे. याशिवाय, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा कंपनीची कार (एमएच-१२-पीक्यू-१२०९) देखील जप्त करण्यात आली, जिची अंदाजे किंमत ७ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ११ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी, सलीम बाबुमिया शेख (वय ४३ वर्षे, रा. स्वराज नगर, पाखरसांगवी, ता. लातूर) आणि अल्ताफ शफीक सय्यद (वय २९ वर्षे, रा. साळेगाव, ता. केज, जि. बीड) यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम ५९(१)(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपी हे प्रतिबंधित पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार नामदेव चेवले, सचिन नाडागुडे, राजकुमार डबेटवार, संदिप केंद्रे, अभिजीत लोखंडे यांनी केली आहे.

on 7 June
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
on 7 June

महाराष्ट्र शासनाने जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री व वाहतुकीवर बंदी घातलेली असतानाही काही व्यक्तींकडून या आदेशांचे उल्लंघन करत चोरट्या मार्गाने अवैध वाहतूक व विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर कठोर भूमिका घेत, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ११ लाख ६८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि वाहतुकीसाठी

वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ६ जून २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास, उदगीरहून लातूरकडे जाणाऱ्या मार्गावर बावलगाव पाटीजवळ पोलीस पथक गस्त व तपासणी करत असताना एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वाहनातून 'विमल पान मसाला' ब्रँडचे एकूण ३,१२० पुडे जप्त केले, ज्यांची किंमत सुमारे ३ लाख २७ हजार ६०० रुपये आहे. तसेच, 'व्ही-१ सुगंधित

तंबाखू' या प्रकारचे ३,१२० पुडे आढळून आले, ज्यांची किंमत १ लाख ४० हजार ४०० रुपये इतकी आहे. याशिवाय, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा कंपनीची कार (एमएच-१२-पीक्यू-१२०९) देखील जप्त करण्यात आली, जिची अंदाजे किंमत ७ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ११ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी, सलीम बाबुमिया शेख (वय ४३ वर्षे, रा. स्वराज नगर, पाखरसांगवी, ता. लातूर) आणि अल्ताफ शफीक सय्यद (वय २९ वर्षे, रा. साळेगाव, ता. केज, जि. बीड) यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.

230494ee-f158-47f0-8b26-7bb5ab81bad2

३५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम ५९(१)(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपी हे प्रतिबंधित पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार नामदेव चेवले, सचिन नाडागुडे, राजकुमार डबेटवार, संदिप केंद्रे, अभिजीत लोखंडे यांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सुपरिचित व्यक्तिमत्त्व कै. वसंत (बापू) मारोतीराव फड यांच्या दशक्रिया विधीचे औचित्य साधून फड परिवाराने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. कुटुंबाने त्यांच्या शेतात आंब्यासह विविध प्रजातींची एकूण १० झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. स्व. वसंत (बापू) फड यांचे १७ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने फड परिवारासह संपूर्ण कन्हेरवाडी परिसराने एक मनमिळावू, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व गमावले, अशी भावना व्यक्त होत आहे. गावातील विकासकामे, सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला होता, त्यामुळे पंचक्रोशीत ते 'वसंत बापू' या नावाने सर्वपरिचित होते. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपलेही योगदान असावे या उद्देशाने फड परिवाराने आपल्या शेतात आंबा, जांभूळ, आवळा, लिंबू, मोसंबी, वड, पिंपळ, चिंच आणि पेरू यांसारख्या १० वृक्षांची लागवड केली. कुटुंबाने या वृक्षांचे संगोपन करून त्यांना जगविण्याचा संकल्पही केला आहे. सध्या मराठवाड्यासह बीड जिल्हा दुष्काळाचा सामना करत असून, घटलेला पाऊस, वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही चिंताजनक बाब आहे. अशा स्थितीत वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज असून, फड परिवाराने यातून समाजासमोर पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवला आहे. 'एखादे दगडी स्मारक काळाबरोबर झिजेल, पण लावलेले झाड अनेकांना सावली, फळे, प्राणवायू आणि जीवन देईल,' या विचारातून हा उपक्रम राबवण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी युवक नेते माणिकभाऊ फड, बाळासाहेब फड, सुरेश (नाना) फड, दत्ता मुंडे, भारत फड, फुलचंद फड, अशोक नागरगोजे, रामभाऊ मुंडे, कांचा, आशु, अक्षय मुंडे, गोविंदभाऊ मुंडे, रायचंद फड, वैभव रोडे, सौरभ कदम, राधाबाई वसंतराव फड, सरस्वती नागरगोजे, सुमन अक्का मुंडे, सुनीता फड, शोभा फड, सत्यभामा फड, चंद्रकला मुंडे, अनुसया शेप, आशाताई गित्ते, अरुण अक्का, अर्चना मुंडे, शोभा गुट्टे, स्वाती फड, छाया फड, सायली व वैष्णवी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. कै. वसंत (बापू) फड यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली आणि गावाच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांचे पुत्र युवा उद्योजक सुरेश (नाना) फड आणि बाळासाहेब फड हे त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. सुरेश (नाना) फड यांनी सांगितले की, स्व. वसंत (बापू) फड हे कुटुंबाचे आधारवड होते आणि त्यांच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जिवंत राहाव्यात या उद्देशाने दशक्रिया विधीदिनी १० वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संवर्धन ही सर्वांची जबाबदारी असून, वडिलांनी दिलेल्या संस्कारातून हा उपक्रम राबवला असून प्रत्येक वृक्षात वडिलांचे अस्तित्व जाणवेल, असेही ते म्हणाले.
    4
    परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सुपरिचित व्यक्तिमत्त्व कै. वसंत (बापू) मारोतीराव फड यांच्या दशक्रिया विधीचे औचित्य साधून फड परिवाराने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. कुटुंबाने त्यांच्या शेतात आंब्यासह विविध प्रजातींची एकूण १० झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.

स्व. वसंत (बापू) फड यांचे १७ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने फड परिवारासह संपूर्ण कन्हेरवाडी परिसराने एक मनमिळावू, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व गमावले, अशी भावना व्यक्त होत आहे. गावातील विकासकामे, सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला होता, त्यामुळे पंचक्रोशीत ते 'वसंत बापू' या नावाने सर्वपरिचित होते.

त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपलेही योगदान असावे या उद्देशाने फड परिवाराने आपल्या शेतात आंबा, जांभूळ, आवळा, लिंबू, मोसंबी, वड, पिंपळ, चिंच आणि पेरू यांसारख्या १० वृक्षांची लागवड केली. कुटुंबाने या वृक्षांचे संगोपन करून त्यांना जगविण्याचा संकल्पही केला आहे. सध्या मराठवाड्यासह बीड जिल्हा दुष्काळाचा सामना करत असून, घटलेला पाऊस, वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही चिंताजनक बाब आहे. अशा स्थितीत वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज असून, फड परिवाराने यातून समाजासमोर पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवला आहे. 'एखादे दगडी स्मारक काळाबरोबर झिजेल, पण लावलेले झाड अनेकांना सावली, फळे, प्राणवायू आणि जीवन देईल,' या विचारातून हा उपक्रम राबवण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी युवक नेते माणिकभाऊ फड, बाळासाहेब फड, सुरेश (नाना) फड, दत्ता मुंडे, भारत फड, फुलचंद फड, अशोक नागरगोजे, रामभाऊ मुंडे, कांचा, आशु, अक्षय मुंडे, गोविंदभाऊ मुंडे, रायचंद फड, वैभव रोडे, सौरभ कदम, राधाबाई वसंतराव फड, सरस्वती नागरगोजे, सुमन अक्का मुंडे, सुनीता फड, शोभा फड, सत्यभामा फड, चंद्रकला मुंडे, अनुसया शेप, आशाताई गित्ते, अरुण अक्का, अर्चना मुंडे, शोभा गुट्टे, स्वाती फड, छाया फड, सायली व वैष्णवी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. कै. वसंत (बापू) फड यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली आणि गावाच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांचे पुत्र युवा उद्योजक सुरेश (नाना) फड आणि बाळासाहेब फड हे त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. सुरेश (नाना) फड यांनी सांगितले की, स्व. वसंत (बापू) फड हे कुटुंबाचे आधारवड होते आणि त्यांच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जिवंत राहाव्यात या उद्देशाने दशक्रिया विधीदिनी १० वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संवर्धन ही सर्वांची जबाबदारी असून, वडिलांनी दिलेल्या संस्कारातून हा उपक्रम राबवला असून प्रत्येक वृक्षात वडिलांचे अस्तित्व जाणवेल, असेही ते म्हणाले.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • उमरी येथील तहसील कार्यालयात एका शेतकरी पुत्राने बैलावर बसून सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेऊन हा अनोखा निषेध नोंदवण्यात आला.
    1
    उमरी येथील तहसील कार्यालयात एका शेतकरी पुत्राने बैलावर बसून सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेऊन हा अनोखा निषेध नोंदवण्यात आला.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • एका खाजगी बसने अचानक वळण घेतल्यामुळे बसमधील ४२ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. ही गंभीर परिस्थिती ओळखून शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत केली, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आणि प्रवाशांना सुरक्षितता मिळाली.
    1
    एका खाजगी बसने अचानक वळण घेतल्यामुळे बसमधील ४२ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. ही गंभीर परिस्थिती ओळखून शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत केली, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आणि प्रवाशांना सुरक्षितता मिळाली.
    user_नागेश शिवशंक र करपे
    नागेश शिवशंक र करपे
    लोहारा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • तुकाराम मुंढे यांनी हॉटेलच्या किचनमध्ये लागू होणाऱ्या नियमांविषयी एक मोठे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानुसार, आता हॉटेलच्या स्वयंपाकघरात काही नियम बंधनकारक असतील.
    1
    तुकाराम मुंढे यांनी हॉटेलच्या किचनमध्ये लागू होणाऱ्या नियमांविषयी एक मोठे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानुसार, आता हॉटेलच्या स्वयंपाकघरात काही नियम बंधनकारक असतील.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • समाजकल्याण विभागाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी केली.
    1
    समाजकल्याण विभागाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी केली.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • खासदार संजय जाधव यांचा व्यंकटराव शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जंगी सत्कार केला.
    1
    खासदार संजय जाधव यांचा व्यंकटराव शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जंगी सत्कार केला.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    12 hrs ago
  • कर्जमाफी झाली पाहिजे, या मागणीसाठी एका शेतकरी पुत्राने तहसील कार्यालयात अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. त्याने बैलावर बसून प्रशासनाच्या विरोधात आपले आंदोलन केले.
    1
    कर्जमाफी झाली पाहिजे, या मागणीसाठी एका शेतकरी पुत्राने तहसील कार्यालयात अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. त्याने बैलावर बसून प्रशासनाच्या विरोधात आपले आंदोलन केले.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आमदार रोहित पवार यांनी परभणी येथे पत्रकार परिषद घेतली.
    1
    आमदार रोहित पवार यांनी परभणी येथे पत्रकार परिषद घेतली.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.