Shuru
Apke Nagar Ki App…
खासदार संजय जाधव यांचा व्यंकटराव शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जंगी सत्कार केला.
Sayad Jamil
खासदार संजय जाधव यांचा व्यंकटराव शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जंगी सत्कार केला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- तुकाराम मुंढे यांनी हॉटेलच्या किचनमध्ये लागू होणाऱ्या नियमांविषयी एक मोठे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानुसार, आता हॉटेलच्या स्वयंपाकघरात काही नियम बंधनकारक असतील.1
- समाजकल्याण विभागाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी केली.1
- खासदार संजय जाधव यांचा व्यंकटराव शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जंगी सत्कार केला.1
- परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सुपरिचित व्यक्तिमत्त्व कै. वसंत (बापू) मारोतीराव फड यांच्या दशक्रिया विधीचे औचित्य साधून फड परिवाराने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. कुटुंबाने त्यांच्या शेतात आंब्यासह विविध प्रजातींची एकूण १० झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. स्व. वसंत (बापू) फड यांचे १७ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने फड परिवारासह संपूर्ण कन्हेरवाडी परिसराने एक मनमिळावू, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व गमावले, अशी भावना व्यक्त होत आहे. गावातील विकासकामे, सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला होता, त्यामुळे पंचक्रोशीत ते 'वसंत बापू' या नावाने सर्वपरिचित होते. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपलेही योगदान असावे या उद्देशाने फड परिवाराने आपल्या शेतात आंबा, जांभूळ, आवळा, लिंबू, मोसंबी, वड, पिंपळ, चिंच आणि पेरू यांसारख्या १० वृक्षांची लागवड केली. कुटुंबाने या वृक्षांचे संगोपन करून त्यांना जगविण्याचा संकल्पही केला आहे. सध्या मराठवाड्यासह बीड जिल्हा दुष्काळाचा सामना करत असून, घटलेला पाऊस, वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही चिंताजनक बाब आहे. अशा स्थितीत वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज असून, फड परिवाराने यातून समाजासमोर पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवला आहे. 'एखादे दगडी स्मारक काळाबरोबर झिजेल, पण लावलेले झाड अनेकांना सावली, फळे, प्राणवायू आणि जीवन देईल,' या विचारातून हा उपक्रम राबवण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी युवक नेते माणिकभाऊ फड, बाळासाहेब फड, सुरेश (नाना) फड, दत्ता मुंडे, भारत फड, फुलचंद फड, अशोक नागरगोजे, रामभाऊ मुंडे, कांचा, आशु, अक्षय मुंडे, गोविंदभाऊ मुंडे, रायचंद फड, वैभव रोडे, सौरभ कदम, राधाबाई वसंतराव फड, सरस्वती नागरगोजे, सुमन अक्का मुंडे, सुनीता फड, शोभा फड, सत्यभामा फड, चंद्रकला मुंडे, अनुसया शेप, आशाताई गित्ते, अरुण अक्का, अर्चना मुंडे, शोभा गुट्टे, स्वाती फड, छाया फड, सायली व वैष्णवी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. कै. वसंत (बापू) फड यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली आणि गावाच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांचे पुत्र युवा उद्योजक सुरेश (नाना) फड आणि बाळासाहेब फड हे त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. सुरेश (नाना) फड यांनी सांगितले की, स्व. वसंत (बापू) फड हे कुटुंबाचे आधारवड होते आणि त्यांच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जिवंत राहाव्यात या उद्देशाने दशक्रिया विधीदिनी १० वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संवर्धन ही सर्वांची जबाबदारी असून, वडिलांनी दिलेल्या संस्कारातून हा उपक्रम राबवला असून प्रत्येक वृक्षात वडिलांचे अस्तित्व जाणवेल, असेही ते म्हणाले.4
- हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदार पवार यांनी संजय दिना पाटील यांचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचे स्पष्टपणे म्हटले. आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जोर दिला की, असे वक्तव्य लोकशाहीसाठी घातक आहे. त्यांनी हे विधान अतिशय चुकीचे असल्याचे पुनरुच्चारित केले. यावेळी त्यांनी कर्जमाफीसह विविध विषयांवरही पत्रकारांशी चर्चा केली.1
- उदगीर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार यांनी केली आहे. त्यांनी सभापतींना विनंती केली आहे की त्यांनी या बाजारपेठ बंदीवर काहीतरी उपाययोजना करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची अडचण दूर होऊ शकेल.1
- उमरी येथील तहसील कार्यालयात एका शेतकरी पुत्राने बैलावर बसून सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेऊन हा अनोखा निषेध नोंदवण्यात आला.1
- परभणी जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1