Shuru
Apke Nagar Ki App…
मुखेड शहेअतील प्रभाग क्र. ९ मधील फॉरेस्ट ऑफिस रस्त्यावर सांडपाणी साचून मोठी घाण निर्माण झाली आहे. अनेक वेळा प्रशासनाला तोंडी व लेखी सूचना देऊनही अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सोमवारी बाजार असल्याने या रस्त्यावरून शेकडो महिला आणि नागरिकांना या घाण पाण्यातून वाट काढावी लागते, ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
Press Mukhed Bablu Mulla
मुखेड शहेअतील प्रभाग क्र. ९ मधील फॉरेस्ट ऑफिस रस्त्यावर सांडपाणी साचून मोठी घाण निर्माण झाली आहे. अनेक वेळा प्रशासनाला तोंडी व लेखी सूचना देऊनही अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सोमवारी बाजार असल्याने या रस्त्यावरून शेकडो महिला आणि नागरिकांना या घाण पाण्यातून वाट काढावी लागते, ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Press Mukhed Bablu Mulla2
- प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- Post by Nanded_71
- हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.1
- Post by Info news1
- Post by Mohammad Rafikh1
- महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद1
- Post by Nanded_71