logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बीड–पुणे रेल्वे सेवेच्या शुभारंभाची जय्यत तयारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी ऐतिहासिक सोहळा; जिल्हाधिकाऱ्यांकडून रेल्वे स्थानकावरील तयारीची पाहणी बीड–पुणे रेल्वे सेवेच्या शुभारंभाची जय्यत तयारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी ऐतिहासिक सोहळा; जिल्हाधिकाऱ्यांकडून रेल्वे स्थानकावरील तयारीची पाहणी बीड, प्रतिनिधी : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बीड–पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बीड रेल्वे स्थानक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी रेल्वे स्थानक परिसरात सुरू आहे. शुभारंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी, बीड यांनी आज रेल्वे स्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या पूर्वतयारीची पाहणी केली. यावेळी कार्यक्रमाची व्यवस्था, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, सुरक्षितता, वाहतूक नियोजन तसेच इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यक्रम सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. बीडच्या रेल्वे संपर्काला नवी दिशा बीड–पुणे रेल्वे सेवा सुरू झाल्याने बीड जिल्ह्याचा पुणे शहराशी रेल्वे संपर्क अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या सेवेचा विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने लाभ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दळणवळण, शिक्षण, रोजगार आणि व्यापाराच्या संधींना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने होणारा हा रेल्वे सेवेचा शुभारंभ बीडच्या रेल्वे प्रवासातील नव्या पर्वाची सुरुवात ठरणार असल्याने या सोहळ्याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमाची माहिती दिनांक : गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ वेळ : सकाळी ११.०० वाजता स्थळ : बीड रेल्वे स्थानक मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा… बीडच्या रेल्वे प्रवासाला नवे पर्व!

1 hr ago
user_बालाजी जगतकर
बालाजी जगतकर
Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
1 hr ago
f9c70e82-6b6e-4134-a1c3-540c28af35ae

बीड–पुणे रेल्वे सेवेच्या शुभारंभाची जय्यत तयारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी ऐतिहासिक सोहळा; जिल्हाधिकाऱ्यांकडून रेल्वे स्थानकावरील तयारीची पाहणी बीड–पुणे रेल्वे सेवेच्या शुभारंभाची जय्यत तयारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी ऐतिहासिक सोहळा; जिल्हाधिकाऱ्यांकडून रेल्वे स्थानकावरील तयारीची पाहणी बीड, प्रतिनिधी : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बीड–पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बीड रेल्वे स्थानक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी रेल्वे स्थानक परिसरात सुरू

ab6770f9-f0ba-4f8a-9f94-e9d6255ecc48

आहे. शुभारंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी, बीड यांनी आज रेल्वे स्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या पूर्वतयारीची पाहणी केली. यावेळी कार्यक्रमाची व्यवस्था, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, सुरक्षितता, वाहतूक नियोजन तसेच इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यक्रम सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. बीडच्या रेल्वे संपर्काला नवी दिशा बीड–पुणे रेल्वे सेवा सुरू झाल्याने बीड जिल्ह्याचा पुणे शहराशी रेल्वे संपर्क अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या सेवेचा

abcd0477-bec5-420d-9510-f9d520676dae

विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने लाभ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दळणवळण, शिक्षण, रोजगार आणि व्यापाराच्या संधींना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने होणारा हा रेल्वे सेवेचा शुभारंभ बीडच्या रेल्वे प्रवासातील नव्या पर्वाची सुरुवात ठरणार असल्याने या सोहळ्याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमाची माहिती दिनांक : गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ वेळ : सकाळी ११.०० वाजता स्थळ : बीड रेल्वे स्थानक मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा… बीडच्या रेल्वे प्रवासाला नवे पर्व!

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन बीड | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” या प्रमुख मागणीसह गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने अदा करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. हलगीच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
    2
    कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या

शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन

कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन
बीड | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” या प्रमुख मागणीसह गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने अदा करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
हलगीच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी जंतर- मंतर येथील देशव्यापी आंदोलनात सहभागी व्हा - अमरजान पठाण बीड(प्रतिनिधी):अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्यासोबतच पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, दबाव तसेच खोटे गुन्हे दाखल करून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर १ डिसेंबरपासून आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पठाण अमरजान यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सक्षम कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असून, देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    3
    पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी जंतर- मंतर येथील देशव्यापी आंदोलनात सहभागी व्हा - अमरजान पठाण 
बीड(प्रतिनिधी):अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.        
शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला.
पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्यासोबतच पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, दबाव तसेच खोटे गुन्हे दाखल करून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर १ डिसेंबरपासून आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पठाण अमरजान यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.
पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सक्षम कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असून, देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Journalist Rajeshkumar Jogdand
    Journalist Rajeshkumar Jogdand
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
    1
    मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका!
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत.
मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
    user_Saath maharashtrachi news
    Saath maharashtrachi news
    News Anchor केज, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! ताफ्यासह 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.ड्रोन व्हिडीओ
    1
    🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! ताफ्यासह 
🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.ड्रोन व्हिडीओ
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 day ago
  • यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनपेठ (दर्शन) :- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
    1
    यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सोनपेठ (दर्शन) :-
यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर
    1
    श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर
    user_Beed News Express
    Beed News Express
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विरोधकांनी संविधानाचा अपमान केला; नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पल हार घालून २५ हजार कर्जतकरांचा अपमान - सुनील शेलार यांचा हल्लाबोल कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून विरोधी नगरसेवकांनी केवळ नगराध्यक्षांचाच नव्हे तर संविधानाचा, घटनेचा आणि कर्जतच्या २५ हजार जनतेचा अपमान केला आहे, असा घणाघात भाजप नेते व नगराध्यक्षा पती सुनील शेलार यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी दलित वस्ती निधी दिला नाही तर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी विरोधकांनी दिली होती, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. निधी वाटप सर्वानुमते झाले - सुनील शेलार यावेळी बोलताना सुनील शेलार म्हणाले की, "दलित वस्ती निधी वाटपाचा विषय हा एकट्या नगराध्यक्षांचा विषय नाही. या संदर्भात सर्व नगरसेवकांनी एकत्रित विशेष सभा घेऊन सर्वानुमते निधीचे वाटप केलेले आहे. प्रभाग क्रमांक १५ ला यापूर्वीच सर्वात जास्त निधीचे वाटप झालेले आहे. कर्जत शहरातील इतर प्रभागात देखील मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय बांधव राहतात. त्यांनाही विकासापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे त्या प्रभागात देखील निधी दिला पाहिजे, या सर्व समावेशक भावनेने हा निधी देण्यात आला आहे. यात कोणताही गैरव्यवहार किंवा नियमबाह्यता झालेली नाही." "मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी मुद्दामहून या विषयाला वेगळे वळण देऊन नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान केला. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे," असेही शेलार म्हणाले. या घटनेचा निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.
    1
    विरोधकांनी संविधानाचा अपमान केला; नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पल हार घालून २५ हजार कर्जतकरांचा अपमान - सुनील शेलार यांचा हल्लाबोल

कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून विरोधी नगरसेवकांनी केवळ नगराध्यक्षांचाच नव्हे तर संविधानाचा, घटनेचा आणि कर्जतच्या २५ हजार जनतेचा अपमान केला आहे, असा घणाघात भाजप नेते व  नगराध्यक्षा पती सुनील शेलार  यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी दलित वस्ती निधी दिला नाही तर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी विरोधकांनी दिली होती, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
निधी वाटप सर्वानुमते झाले - सुनील शेलार
यावेळी बोलताना सुनील शेलार म्हणाले की,
"दलित वस्ती निधी वाटपाचा विषय हा एकट्या नगराध्यक्षांचा विषय नाही. या संदर्भात सर्व नगरसेवकांनी एकत्रित विशेष सभा घेऊन सर्वानुमते निधीचे वाटप केलेले आहे. 
प्रभाग क्रमांक १५ ला यापूर्वीच सर्वात जास्त निधीचे वाटप झालेले आहे. कर्जत शहरातील इतर प्रभागात देखील मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय बांधव राहतात. त्यांनाही विकासापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे त्या प्रभागात देखील निधी दिला पाहिजे, या सर्व समावेशक भावनेने हा निधी देण्यात आला आहे. यात कोणताही गैरव्यवहार किंवा नियमबाह्यता झालेली नाही."
"मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी मुद्दामहून या विषयाला वेगळे वळण देऊन नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान केला. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे," असेही शेलार म्हणाले.
या घटनेचा निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.
    user_SM Rokhthok News
    SM Rokhthok News
    Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    35 min ago
  • देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा केज | प्रतिनिधी केज तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी श्री. पोटभरे यांच्यासह संबंधित सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची विशेष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी दि. ७ एप्रिल २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मा. श्री. चौरे ए.बी. व श्री. हतागळे एस.डी. यांनी दि. ४ जुलै २०२५ रोजी देवगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या चौकशीदरम्यान १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करता सुमारे २ लाख रुपयांची रक्कम कथितरित्या उचलल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. या चौकशीचा अहवाल दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, केज यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधितांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या सर्व कामांची कामनिहाय खर्चासह सखोल चौकशी व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, बीड येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकरणी प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि चौकशी अहवालाच्या आधारे पुढील काय कारवाई केली जाते, याकडे देवगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    4
    देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा

देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी
ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा
केज | प्रतिनिधी
केज तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी श्री. पोटभरे यांच्यासह संबंधित सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची विशेष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणी दि. ७ एप्रिल २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मा. श्री. चौरे ए.बी. व श्री. हतागळे एस.डी. यांनी दि. ४ जुलै २०२५ रोजी देवगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या चौकशीदरम्यान १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करता सुमारे २ लाख रुपयांची रक्कम कथितरित्या उचलल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या चौकशीचा अहवाल दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, केज यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधितांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या सर्व कामांची कामनिहाय खर्चासह सखोल चौकशी व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, बीड येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या प्रकरणी प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि चौकशी अहवालाच्या आधारे पुढील काय कारवाई केली जाते, याकडे देवगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.