logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जालना जिल्ह्यातील वीज पडून दोन युवक ठार ! अवकाळीचा तडाखा जालना जिल्ह्यातील वीज पडून दोन युवक ठार ! अवकाळीचा तडाखा... जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळा शिवारात सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा–साष्टपिंपळगाव रस्त्यावरील थोरवे वस्ती, नाथनगर परिसरात ही घटना घडली. सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट सुरू असताना काही तरुण लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. त्याच वेळी अचानक झाडावर वीज कोसळली आणि या भीषण घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेतील मृतांची नावे गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१) व आदित्य दगडू बेद्रे (वय २०) अशी असून, दोघेही महाकाळा येथील रहिवासी होते. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिस व प्रशासनाला कळविण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान होत असून नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली अथवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, तसेच सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

4 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
4 hrs ago
04740f4f-b841-4d8f-a30d-d5eeb050a970

जालना जिल्ह्यातील वीज पडून दोन युवक ठार ! अवकाळीचा तडाखा जालना जिल्ह्यातील वीज पडून दोन युवक ठार ! अवकाळीचा तडाखा... जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळा शिवारात सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा–साष्टपिंपळगाव रस्त्यावरील थोरवे वस्ती, नाथनगर परिसरात ही घटना घडली. सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट सुरू असताना काही तरुण लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. त्याच वेळी अचानक झाडावर वीज कोसळली आणि या भीषण घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेतील मृतांची नावे गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१) व आदित्य दगडू बेद्रे (वय २०) अशी असून, दोघेही महाकाळा येथील रहिवासी होते. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिस व प्रशासनाला कळविण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान होत असून नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली अथवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, तसेच सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
    1
    जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी..
जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे.
या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शिवसेना नेते नानासाहेब वानखेडे यांच्या वतीने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती.
    3
    शिवसेना नेते नानासाहेब वानखेडे यांच्या वतीने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *जालना जयनगर, महाप्रजापती बौद्ध विहार येथे सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी*.
    1
    *जालना जयनगर, महाप्रजापती बौद्ध विहार येथे सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी*.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.
    1
    (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.  बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.
    1
    आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Sanjay Shirsat Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner
    1
    Sanjay Shirsat Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    17 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.