3 महिने रेशन दुकानदारांकडे जाण्याची गरज नाही, काय आहे नवीन निर्णय* राज्य शासनाने रेशनकार्ड धारकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. यानुसार रेशन दुकानदारांना एकाच महिन्यात तिप्पट धान्य देण्यात येणार आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एप्रिलमध्येच वितरित करण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना पुढील दोन महिने धान्य घेण्यासाठी रेशन दुकानदारांकडे जाण्याची गरज भासणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धान्य वाटपाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी सर्व रेशन दुकानदारांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. पण, धान्याच्या उपलब्धतेनुसार धान्य वितरीत केले जाणार आहे. कोणत्या रेशन कार्डधारकांना दिलासा ? यामध्ये अंत्योदय अन्न योजने (एएवाय) अंतर्गत येणारे अत्यंत गरीब कुटुंब, तसेच प्राधान्य गट (पीएचएच) यामधील लाभार्थी यांचा समावेश आहे. या दोन्ही गटांतील नागरिकांना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एप्रिल महिन्यातच दिले जाणार आहे. कोणते धान्य किती किलो मिळणार ? प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्त्ती, प्रति महिना पाच किलो धान्य दिले जाते. त्यामुळे तीन महिन्यांसाठी एकूण १५ किलो प्रति व्यक्ती धान्य मिळणार आहे. अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति महिना ३५ किलो थान्य दिले जाते. त्यामुळे तीन महिन्यांसाठी एकूण १०५ किलो प्रति कुटुंब धान्य मिळणार आहे. यामध्ये तांदूळ आणि गहू यांचा समावेश असतो. कशामुळे घेतला निर्णय ? कडक उन्हात नागरिकांना वारंवार रेशन दुकानांवर जावे लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लाभार्थ्यांना उन्हातान्हात होणारा त्रास टाळण्यासाठी हा उपाय केला आहे. अंगठ्याशिवाय रेशन नाही राज्यात रेशन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पडताळणी सक्तीची केली आहे. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना धान्य घेण्यासाठी अंगठ्याचा ठसा देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

- महावितरणचा 'शॉक'! बुलढाण्यात विद्युत तारेच्या घर्षणामुळे साडेचार एकर मका जळून खाक1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- Post by Amol Gawai3
- छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाईसाहेब यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा उत्सव आज करवंड येथे संपन्न झाले.1
- खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध मंडळांनी सादर केलेली लेझीम पथके आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, मध्यरात्री १२ वाजेपर्यंत चाललेली ही मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली. शोभायात्रेची सुरुवात करण्यापूर्वी सर्व मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय भीम'च्या जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली. या शोभायात्रेत शहर पोलीस स्टेशन आणि शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण ८ प्रमुख मंडळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सम्राट अशोक क्रीडा मंडळ (बाळापूर फैल), मिमशक्ती क्रीडा मंडळ (बाळापूर फैल), पंचशील क्रीडा मंडळ (बकरी बाजार, बाळापूर फैल), सम्राट क्रीडा मंडळ (हरी फैल), समता क्रीडा मंडळ (शंकर नगर), तथागत बहुउद्देशीय नवयुवक मंडळ (हिरा नगर) व अशोक क्रीडा मंडळ (दालफैल), सिद्धार्थ क्रीडा मंडळ (नवा फैल) सहभागी झाले होते.मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांनी लेझीमचा चित्तथरारक खेळ सादर केला. तसेच, अनेक मंडळांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे जिवंत देखावे सादर केले होते. रस्ते भीमभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आणि सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत चाललेली ही मिरवणूक कोणत्याही गालबोटाविना शांततेत पार पडली. प्रशासनाने आणि शहरवासीयांनी या शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक केले आहे.1
- जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदन.. मातंग समाजाच्या वतीने निवेदन1
- न्याय मिळाला नाही, शेवटी एसडीओ कार्यालयात विष प्राशन! ५ आदिवासी शेतकऱ्यांचा हृदयद्रावक आत्महत्येचा प्रयत्न राजुरा (चंद्रपूर), एप्रिल २०२६ : १५ वर्षांपासून न्यायासाठी भटकणाऱ्या पाच आदिवासी शेतकऱ्यांनी आज दुपारी राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडवून गेली आहे. कुसुंबी (कोरपना तालुका) गावातील कोलाम आदिवासी समाजातील पाच शेतकऱ्यांनी माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक)च्या चुनखडी खाणीसाठी दिलेल्या आपल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले. गेल्या १५ वर्षांपासून वारंवार निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा करूनही प्रशासन आणि कंपनीकडून कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. घटना कशी घडली? दुपारी सुमारे १.३० वाजता हे पाचही शेतकरी उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांच्या कार्यालयात आपल्या मागण्या घेऊन गेले होते. न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी थेट कार्यालयातच विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. राजुरा पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. शेतकरी कोण आहेत? हे सर्व कोलाम आदिवासी कुटुंबातील शेतकरी आहेत. त्यांच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने खाणीच्या उद्देशाने घेतल्या होत्या. कंपनीने प्रारंभी काही मोबदला दिला, मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो अपुरा आणि अपुरा होता. उर्वरित मोबदला किंवा जमीन परत मिळण्याची मागणी ते १५ वर्षे करत आहेत. प्रशासनाची भूमिका घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी शेतकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली असून, त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीकडूनही याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. ही घटना आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन हक्क, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि मोबदल्याच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधते. “न्याय मिळाला नाही तर शेवटी विष प्यावे लागते,” अशी भावना व्यक्त करणारी ही घटना महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रलंबित प्रश्नांची दुखरी आठवण करून देते. अधिक अपडेटसाठी : शेतकऱ्यांची प्रकृती स्थिर होत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. प्रशासन लवकरात लवकर न्याय देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. (ही बातमी विविध वृत्तस्रोतांवरून संकलित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रकृती आणि प्रशासकीय कारवाईबाबत अधिक माहिती येत राहील.)1
- *किन्होळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावामध्ये शोभायात्रा* प्रतिनिधी - संतोष बाहेकर..( बुलडाणा) बुलडाणा - येथुन जवळच असलेल्या किन्होळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज किन्होळा येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. राजकीय, शासकीय, व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने हजर होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सदर मिरवणूक बस स्टँड वरील पुतळ्यापासून सुरुवात झाली.1