सामाजिक बांधिलकीतुन सेनगाव पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम,१७ सप्टेंबरला भव्य शिक्षण परिषद;पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीने वाढणार सोहळ्याची शोभा! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित,सेनगाव या संस्थेच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त दि.१७ सप्टेंबर रोजी गुरुवारला दुपारी ठीक १:०० वाजता 'साई मंगलम् कार्यालय,येलदरी टी-पॉईंट, सेनगाव' येथे एका भव्य शिक्षण परिषद व सत्कार सोहळ्याचे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या अभूतपूर्व परिषदेला सेनगाव तालुका व हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे जाहीर व आग्रहाचे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष व्ही.डी. देशमुख यांनी केले आहे. या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. नरहरी झिरवाळ साहेब लाभणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढणार आहे.'साई मंगलम्' कार्यालयाच्या भव्य प्रांगणात रंगणाऱ्या या शिक्षण परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात उपस्थित शिक्षकांना थेट जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय प्रमुखांचे मार्गदर्शन लाभणार आहे.यामध्ये हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता साहेब,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड साहेब,प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंजुषा कल्लेवाड मॅडम हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित शिक्षकांशी सुसंवाद साधणार असून,यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीला एक नवी दिशा आणि ऊर्जा मिळणार आहे.या ऐतिहासिक सोहळ्याला परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष भैय्या पाटील गोरेगावकर,हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिलभाऊ पतंगे यांच्यासह शिवाजीराव मुटकुळे,अप्पासाहेब देशमुख, संदेशभाऊ देशमुख,शशिकांत वडकुते,दिनकरराव देशमुख,कांतराव हराळ,विनायकराव देशमुख,अशोकराव ठेंगल,शंकरराव बोरुडे यांसारखे सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक नामांकित मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत.सेनगाव येथील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेने सहकार क्षेत्रात ३० वर्षे पूर्ण करून विश्वासार्हतेचे एक नवे शिखर गाठले आहे.या ३० वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि समाजाचा कणा असलेल्या शिक्षक वर्गाचा गौरव करण्यासाठी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून,गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे यासाठी पतसंस्थेचे अध्यक्ष व्ही.डी. देशमुख,उपाध्यक्ष माधव जाधव, सचिव एम. आर. गडदे आणि कोषाध्यक्ष रामदास गोरे यांनी विशेष नियोजन केले आहे.तसेच संचालक मंडळातील सदस्य श्रीमती सुशीला चिलगर,राहुल खिल्लारे,माधव कोकाटे,रमेश कावरखे,लक्ष्मण वाव्हळ,गजानन पायघन,पंजाब देवकर,विपुल सरनाईक,समाधान देशमुख,रमेश कोरडे,प्रदीप कावरखे आणि श्रीमती सविता कोटकर यांनी सर्व शिक्षक बांधवांना या शिक्षण परिषदेला आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........1
- घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा1
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त1
- जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; शेतकरी वर्ग आक्रमक प्रस्तावित शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी वर्ग आक्रमक झाले असल्याचे दिसून आले चोंडी येथे शेतकरी बांधवांनी तिव्र विरोध दर्शविला1