Shuru
Apke Nagar Ki App…
शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; शेतकरी वर्ग आक्रमक प्रस्तावित शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी वर्ग आक्रमक झाले असल्याचे दिसून आले चोंडी येथे शेतकरी बांधवांनी तिव्र विरोध दर्शविला
दिपक हैबतराव चोरमले
शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; शेतकरी वर्ग आक्रमक प्रस्तावित शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी वर्ग आक्रमक झाले असल्याचे दिसून आले चोंडी येथे शेतकरी बांधवांनी तिव्र विरोध दर्शविला
More news from Hingoli and nearby areas
- शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; शेतकरी वर्ग आक्रमक प्रस्तावित शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी वर्ग आक्रमक झाले असल्याचे दिसून आले चोंडी येथे शेतकरी बांधवांनी तिव्र विरोध दर्शविला1
- जनकल्याण प्रतिष्ठान ग्रुप च्या वतीने घोटा देवी येथे गणेश मूर्ती ची स्थापना हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे आत्मग्रस्त शेतकरी निराधार व मेंढपाळांच्या मुलांच्या आश्रमामध्ये जनकल्याण प्रतिष्ठान ग्रुप च्या वतीने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी उपस्थित धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे व आश्रमातील सर्व मुली उपस्थित होते1
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- काळजाला थरकाप उडवणारी घटना "तुम्ही माझी आई घेऊन आले का हो?" माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्यासमोर आत्महत्याग्रस्त महिलेच्या लेकीचा टाह़ो! सेनगाव/विश्वनाथ देशमुख सण-उत्सवाच्या दिवशी जिथे अवघा महाराष्ट्र बळीराजाच्या कृतज्ञतेत मग्न होता,तिथेच हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.कर्जाचा डोंगर आणि सततची नापिकी या दुष्टचक्रात अडकलेल्या महिला शेतकरी कमलाबाई सोपान कांदे यांनी बैलपोळ्याच्या दिवशीच विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ऐन सणासुदीला घरातून उठलेल्या या अंत्ययात्रेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.या दुर्दैवी घटनेनंतर विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी गोजेगाव येथे जाऊन पीडित कांदे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.मात्र,या भेटीदरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले. "माझी आई आणली का हो?..." विवाहित लेकीच्या आक्रोशाने काळीज पाझरले माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे कांदे यांच्या घरी पोहोचताच,मृत कमलाबाई यांच्या विवाहित मुलीने त्यांना पाहताच हंबरडा फोडला. "तुम्ही माझी आई घेऊन आले का हो?"असा आर्त प्रश्न विचारत तिने थेट त्यांचा समोर टाहो फोडला.आईच्या विरहाने व्याकुळ झालेल्या त्या लेकीचा आक्रोश आणि डोळ्यांतील अश्रू पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हृदय पिळवटून निघाले.जिचे माहेरचे छत्र कायमचे हरपले आहे,त्या दुःखी कन्येचा हा प्रश्न केवळ एका नेत्याला नसून,संपूर्ण शासकीय व्यवस्थेला आणि समाजाच्या संवेदनशीलतेला सुन्न करणारा होता.माहितीनुसार,कांदे कुटुंबाने शेतीसाठी घेतलेले कर्ज तसेच नातेवाईकांचे कर्ज होते.यंदाही पावसाने दगा दिल्यामुळे शेतातून हाती काहीच लागणार नाही,ही भीती आणि कर्जाच्या हप्त्यांचा तगादा यांमुळे कमलाबाई अत्यंत मानसिक तणावात होत्या.अखेर याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. विरोधी पक्षनेते पोहोचले,पण सरकार कधी जागे होणार? या हृदयद्रावक घटनेची दखल घेत विरोधी पक्षाचे नेते गोजेगावच्या या पीडित कुटुंबाच्या दारापर्यंत पोहोचले. त्यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करत मराठवाड्यातील कोरड्या दुष्काळाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.मात्र,अत्यंत खेदाची बाब अशी की,घटना घडून एवढे दिवस झाले तरी शासकीय यंत्रणा आणि हक्काची सरकारी मदत अद्याप या अनाथ कुटुंबापर्यंत पोहोचलेली नाही.एकीकडे शासन विविध योजनांचे ढोल पिटत असताना,दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर मात्र मदतीअभावी शेतकरी कुटुंबांची अशी वाताहत होत आहे.या दुःखी लेकीच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आणि या कुटुंबाला तातडीने आर्थिक आधार देण्यासाठी मायबाप सरकार आतातरी जागे होऊन तात्काळ मदत जाहीर करणार का? हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त1
- आमच्या घरी गणरायाचे थाटात मंगलमय आगमन! मंगलमय वातावरण पूजा अर्चना 🙏🌺 सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची… 🌺🙏 आमच्या घरी गणरायाचे थाटात मंगलमय आगमन! गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना— सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो…! 🙏❤️ 🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺 #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्तीमोरया #गणेशचतुर्थी #गणरायाचेआगमन #बाप्पाचाआगमनसोहळा #गणेशोत्सव #गणराया #सुखकर्तादुःखहर्ता #श्रीगणेश #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #Ganeshotsav1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- आकाशात चंद्र-चांदणीचा दुर्मिळ योग; मनमोहक दृश्याने वेधले लक्ष आकाश निरीक्षकांसाठी सोमवारी एक अनोखी पर्वणी ठरली. आकाशात चंद्राच्या कोरीसोबत तेजस्वी चांदणीचे मनोहारी दर्शन घडल्याने नागरिकांचे लक्ष या खगोलीय दृश्याकडे वेधले गेले. पावसाळ्यानंतर स्वच्छ होत चाललेल्या आकाशात चंद्राची कोर आणि जवळ चमकणारी चांदणी यांचे दृश्य अत्यंत आकर्षक दिसत होते. अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपत सोशल मीडियावर शेअर केले. खगोल अभ्यासकांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात आकाश निरीक्षणासाठी अनेक विशेष घटना घडत आहेत. १४ सप्टेंबर रोजी चंद्र, शुक्र आणि बुध यांच्या कोरीसदृश दृश्याचे दर्शन होणे ही विशेष खगोलीय घटना ठरली. सायंकाळच्या आकाशात चंद्राच्या आसपास दिसणारी तेजस्वी चांदणी पाहण्यासाठी नागरिकांनी काही काळ आकाशाकडे नजर लावली. निसर्गाचे हे सुंदर रूप पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खगोलीय घटनांबाबत वाढते कुतूहल अशा दुर्मीळ खगोलीय घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि खगोलप्रेमींमध्ये आकाश निरीक्षणाची उत्सुकता वाढत आहे. दुर्बीण नसतानाही काही घटना स्वच्छ आकाशात साध्या डोळ्यांनी पाहता येतात, त्यामुळे या घटनांकडे नागरिकांचे विशेष आकर्षण असते.1