Shuru
Apke Nagar Ki App…
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, धान पऱ्हे टाकण्यासाठी शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय होऊन जिल्ह्यात पुरेसा पाऊस कधी बरसेल या आशेने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
A K
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, धान पऱ्हे टाकण्यासाठी शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय होऊन जिल्ह्यात पुरेसा पाऊस कधी बरसेल या आशेने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, धान पऱ्हे टाकण्यासाठी शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय होऊन जिल्ह्यात पुरेसा पाऊस कधी बरसेल या आशेने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.2
- आज दिनांक २४/६/२०२६ रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास साकोली तालुक्यातील आमगाव बुज येथील नागरिक हरिश्चंद्र श्रीराम मडावी (वय ४० वर्ष) हे शेतात गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात हरिश्चंद्र मडावी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी भंडारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.1
- आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात झालेल्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी विधानसभेत या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. मुनगंटीवार यांनी सभागृहात यावर दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याचे नमूद केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न प्रदान करणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या तेजस्वी इतिहासाला आणि राष्ट्रभक्तीच्या अखंड परंपरेला अभिवादन आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. त्यांनी शासनाने दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी ठाम मागणी विधानसभेत केली.1
- Post by SUBHASH BORKAR1
- आरटीआय कार्यकर्त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केले.1
- पद्म पुरस्कार २०२६ ने सन्मानित महाराष्ट्र आणि देशभरातील सर्व आदरणीय व्यक्तींचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. कला क्षेत्रातील अमूल्य योगदान आणि प्रेरणादायी वारसा यासाठी मरणोत्तर सन्मानित व्यक्तिमत्त्वाला विनम्र श्रद्धांजली. हे प्रतिष्ठित सन्मान त्यांच्या विविध क्षेत्रांतील असामान्य योगदान, उल्लेखनीय यश आणि राष्ट्रनिर्मितीत बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचे गौरवपूर्ण प्रतीक आहेत. मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कार २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातील सात विशिष्ट व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ट कार्य आणि असामान्य यशासाठी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित अलका याज्ञिक (कला) आहेत, तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तींमध्ये सतीश शाह (कला, मरणोत्तर), भिकल्या लाडक्या धिंडा (कला), डॉ. आर्मिडा फर्नांडिस (चिकित्सा), डॉ. अशोक खाडे (व्यापार आणि उद्योग), माधवन रंगनाथन (कला), आणि रोहित शर्मा (खेळ) यांचा समावेश आहे. या सर्व सन्मानित व्यक्ती आपल्या प्रतिभा, समर्पण आणि उत्कृष्ट कार्याद्वारे समाज आणि राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत आहेत. पद्म पुरस्कार हे त्यांच्या अथक प्रयत्नांचे आणि देशाप्रती दिलेल्या अमूल्य योगदानाचे सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून एक गौरवपूर्ण प्रतीक आहेत.1
- भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी दणदणीत विजय संपादन केला. त्यांच्या विजयाच्या घोषणेनंतर समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आमदार परिणय फुके आणि विजयी उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी विजय मिरवणुकीत सहभाग घेत जल्लोष साजरा केला. मिरवणुकीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी दंड थोपटून विरोधकांना राजकीय मैदानात पुन्हा एकदा ‘धोबीपछाड’ दिल्याचा संदेश दिला. महायुतीच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, हा विजय म्हणजे विकासकामांवरील जनतेच्या विश्वासाची पावती असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जिल्हाभरातून विजयी उमेदवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.1
- उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात एका कोचिंग क्लासमध्ये भीषण अग्निकांड घडले आहे.1