logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

15 hrs ago
user_Sharad Dayedar
Sharad Dayedar
Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
15 hrs ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nagesh Awachar
    1
    Post by Nagesh Awachar
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ​खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खामगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भीमगर्जना आणि 'जय भीम'च्या जयघोषाने संपूर्ण शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते. ​यावर्षीच्या मुख्य मिरवणुकीत शहरातील एकूण ८ सार्वजनिक मंडळांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध देखावे आणि सजावट केली होती. पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत भीमभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ​यावेळच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांची लक्षणीय उपस्थिती. मोठ्या संख्येने महिलांनी निळ्या साड्या परिधान करून आणि हातात निळे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महिला या उत्सवात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. ​मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः मिरवणुकीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि शांततेचे आवाहन केले. ​खामगावच्या या ऐतिहासिक मिरवणुकीने सामाजिक एकतेचा संदेश दिला असून, रात्री उशिरापर्यंत भीमभक्तांचा उत्साह कायम होता.
    1
    ​खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खामगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भीमगर्जना आणि 'जय भीम'च्या जयघोषाने संपूर्ण शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते.
​यावर्षीच्या मुख्य मिरवणुकीत शहरातील एकूण ८ सार्वजनिक मंडळांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध देखावे आणि सजावट केली होती. पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत भीमभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ​यावेळच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांची लक्षणीय उपस्थिती. मोठ्या संख्येने महिलांनी निळ्या साड्या परिधान करून आणि हातात निळे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महिला या उत्सवात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. ​मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः मिरवणुकीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि शांततेचे आवाहन केले. ​खामगावच्या या ऐतिहासिक मिरवणुकीने सामाजिक एकतेचा संदेश दिला असून, रात्री उशिरापर्यंत भीमभक्तांचा उत्साह कायम होता.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • घोटाळा उघड झाला… पण कारवाई कुठे? सोमय्यांचा आवाज का थांबला?
    1
    घोटाळा उघड झाला… पण कारवाई कुठे? सोमय्यांचा आवाज का थांबला?
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • हिमायतनगर शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी! भव्य शोभायात्रा, पंचशील ध्वजारोहण, सामुदायिक त्रिशरण, लेझीम, भीमगीतांचा जल्लोष आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले. शहरातील विविध चौकांमध्ये अभिवादन, तसेच अनुयायांसाठी थंड पाणी व सरबताचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला. जय भीम | जय संविधान #AmbedkarJayanti #JaiBhim #Himayatnagar #SocialUnity #BhimGeet Samvidhan DrBabasahebAmbedkar Maharashtra
    1
    हिमायतनगर शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी! 
भव्य शोभायात्रा, पंचशील ध्वजारोहण, सामुदायिक त्रिशरण, लेझीम, भीमगीतांचा जल्लोष आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले.
शहरातील विविध चौकांमध्ये अभिवादन, तसेच अनुयायांसाठी थंड पाणी व सरबताचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला.
जय भीम | जय संविधान 
#AmbedkarJayanti #JaiBhim #Himayatnagar #SocialUnity #BhimGeet Samvidhan DrBabasahebAmbedkar Maharashtra
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • किन्होळा ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या प्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.मदन कुटे, सरपंच सौ.अर्चना वसंत जाधव. शेख इरफान शेख लड्डू, जाफर भाई, प्राचार्य वसंत जाधव, किशोर निकाळजे, सुनील बाहेकर , पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, ज्ञानेश्वर बाहेकरयांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला आदराने वंदन केले. ताहेरभाई , युनूस मेंबर, अशोक जाधव , अशोक वानखेडे,अरुण सरदार प्रदीप सरदार ,शेषराव वानखेडे , तसेच महिला , व यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.. उपस्थितानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या कार्याला आदराने वंदन केले. याप्रसंगी अनेक वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या अजोड कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे योगदान, दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष, शिक्षण आणि समानतेचे त्यांचे विचार यावर सखोल विवेचन केले... मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व आणि ते आजही कसे प्रासंगिक आहेत, यावर आपले विचार मांडले. प्राचार्य वसंत जाधव यांनीआपल्या भाषणात, डॉ. आंबेडकरांनी समाजाला दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या कार्याची महती विशद केली आणि त्यांच्या स्वप्नातील समतावादी समाज घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि विचारांची नव्याने ओळख झाली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत एक लोकशाही आणि समतावादी राष्ट्र म्हणून उभा आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. किन्होळा ग्रामपंचायतीने आयोजित केलेला हा जयंती सोहळा बाबासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहणारा आणि त्यांच्या विचारांना पुढे नेणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.
    1
    किन्होळा ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या प्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.मदन कुटे, सरपंच सौ.अर्चना वसंत जाधव. शेख इरफान शेख लड्डू, जाफर भाई, प्राचार्य वसंत जाधव, किशोर निकाळजे, सुनील बाहेकर , पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, ज्ञानेश्वर बाहेकरयांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला आदराने वंदन केले.
ताहेरभाई , युनूस मेंबर, अशोक जाधव , अशोक वानखेडे,अरुण सरदार प्रदीप सरदार ,शेषराव वानखेडे , तसेच महिला , व  यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते..
उपस्थितानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या कार्याला आदराने वंदन केले. 
याप्रसंगी अनेक वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या अजोड कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे योगदान, दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष, शिक्षण आणि समानतेचे त्यांचे विचार यावर सखोल विवेचन केले...
मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व आणि ते आजही कसे प्रासंगिक आहेत, यावर आपले विचार मांडले. प्राचार्य वसंत जाधव यांनीआपल्या भाषणात, डॉ. आंबेडकरांनी समाजाला दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या कार्याची महती विशद केली आणि त्यांच्या स्वप्नातील समतावादी समाज घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि विचारांची नव्याने ओळख झाली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत एक लोकशाही आणि समतावादी राष्ट्र म्हणून उभा आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. किन्होळा ग्रामपंचायतीने आयोजित केलेला हा जयंती सोहळा बाबासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहणारा आणि त्यांच्या विचारांना पुढे नेणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ​खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची , १४ एप्रिल २०२६ रोजी साजरी होणारी १3५ वी जयंती उत्सवात साजरी करण्यासाठी खामगाव शहर सज्ज झाले आहे. या निमित्ताने शहरातील नगरपरिषद मैदान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुख्य पुतळ्याला आणि संपूर्ण परिसराला अतिशय सुंदर व भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पुतळा परिसरात रंगीबेरंगी दिव्यांची आरास करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी हे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसत आहे. निळ्या आणि पांढऱ्या विद्युत माळांच्या प्रकाशझोतात महामानवाचा पुतळा न्हाऊन निघाला आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज रात्रीपासूनच नागरिकांनी परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.​शहरातील मुख्य पुतळ्याची ही सजावट भीम अनुयायांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. "कोटी कोटी प्रणाम त्या महामानवाला!" अशा शब्दांत नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. केवळ रोषणाईच नव्हे, तर स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात आला असून, संपूर्ण परिसरात एक चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. ​ १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासूनच विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर दिवसभर शहरातून विविध मिरवणुका आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    1
    ​खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची , १४ एप्रिल २०२६ रोजी साजरी होणारी १3५ वी जयंती उत्सवात साजरी करण्यासाठी खामगाव शहर सज्ज झाले आहे. या निमित्ताने शहरातील नगरपरिषद मैदान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुख्य पुतळ्याला आणि संपूर्ण परिसराला अतिशय सुंदर व भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पुतळा परिसरात रंगीबेरंगी दिव्यांची आरास करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी हे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसत आहे. निळ्या आणि पांढऱ्या विद्युत माळांच्या प्रकाशझोतात महामानवाचा पुतळा न्हाऊन निघाला आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज रात्रीपासूनच नागरिकांनी परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.​शहरातील मुख्य पुतळ्याची ही सजावट भीम अनुयायांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. "कोटी कोटी प्रणाम त्या महामानवाला!" अशा शब्दांत नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. केवळ रोषणाईच नव्हे, तर स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात आला असून, संपूर्ण परिसरात एक चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. ​ १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासूनच विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर दिवसभर शहरातून विविध मिरवणुका आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • गुडघेदुखी, कंबरदुखी, मान दुखी, पायाला मुंग्या येणे, हातपाय बधीर होणे अशा त्रासांनी त्रस्त आहात का? या व्हिडिओमध्ये एका आजीबाईंचा खरा अनुभव पाहा, ज्यांना शिवराज नॅचरोपॅथी सेंटर, शेगाव येथे उपचार घेतल्यानंतर आराम मिळाला. 🌿 येथे उपलब्ध सेवा: मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी गुडघेदुखी | सांधेदुखी | नस दबणे पॅरलिसीस | शुगर | पोटाचे विकार वजन कमी / वाढणे | मुंग्या येणे 💆‍♂️ उपचार: मसाज | पोटली चिकित्सा | कांस्यथाळी यंत्र 👩‍⚕️ डॉ. निकिता शं. मंडवाले (Acupressure, D.N.Y.S – निसर्गोपचार योगतज्ञ) 📍 पत्ता: गौलखेड रोड, डॉ. प्रविण पाटील हॉस्पिटल बाजूला, शेगाव, जि. बुलढाणा – 444203 📅 प्रत्येक रविवारी चेकअप 💰 नोंदणी फी: ₹100 ⏰ वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 7 📞 संपर्क: 8329006289 “आजच संपर्क करा आणि नैसर्गिक उपचारांचा अनुभव घ्या!” “उशीर करू नका, तुमच्या वेदनांना आराम द्या!” 👉 “अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी लगेच कॉल करा – 8329006289” “तुम्हालाही असा त्रास असेल तर लगेच संपर्क करा – 8329006289 📞”
    1
    गुडघेदुखी, कंबरदुखी, मान दुखी, पायाला मुंग्या येणे, हातपाय बधीर होणे अशा त्रासांनी त्रस्त आहात का?
या व्हिडिओमध्ये एका आजीबाईंचा खरा अनुभव पाहा, ज्यांना शिवराज नॅचरोपॅथी सेंटर, शेगाव येथे उपचार घेतल्यानंतर आराम मिळाला.
🌿 येथे उपलब्ध सेवा:
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी
गुडघेदुखी | सांधेदुखी | नस दबणे
पॅरलिसीस | शुगर | पोटाचे विकार
वजन कमी / वाढणे | मुंग्या येणे
💆‍♂️ उपचार:
मसाज | पोटली चिकित्सा | कांस्यथाळी यंत्र
👩‍⚕️ डॉ. निकिता शं. मंडवाले
(Acupressure, D.N.Y.S – निसर्गोपचार योगतज्ञ)
📍 पत्ता:
गौलखेड रोड, डॉ. प्रविण पाटील हॉस्पिटल बाजूला,
शेगाव, जि. बुलढाणा – 444203
📅 प्रत्येक रविवारी चेकअप
💰 नोंदणी फी: ₹100
⏰ वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 7
📞 संपर्क: 8329006289
“आजच संपर्क करा आणि नैसर्गिक उपचारांचा अनुभव घ्या!”
“उशीर करू नका, तुमच्या वेदनांना आराम द्या!”
👉 “अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी लगेच कॉल करा – 8329006289”
“तुम्हालाही असा त्रास असेल तर लगेच संपर्क करा – 8329006289 📞”
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    11 hrs ago
  • बुलढाणा :- वरवंड नगरीत भक्तीचा मळा फुलला ! शतकानुशतकांची 'देवीच्या सोंगाची' परंपरा उत्साहात संपन्न
    1
    बुलढाणा :- वरवंड नगरीत भक्तीचा मळा फुलला ! शतकानुशतकांची 'देवीच्या सोंगाची' परंपरा उत्साहात संपन्न
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.