logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा ! बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नांदेड : मातंग समाजातील विद्यार्थीनी कु. आकांक्षा मुंजाजी गायकवाड हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली असून या प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक ७ मार्च २०२६ रोजी गुन्हा नोंद क्र.२०२/२०२६ रात्री उशिरा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८, २२३ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारित २०१५ कलम ३(२)(व्हिए) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात जीवन पाटील घोगरे (रा. रुपचंद नगर, नांदेड) याचे नाव आरोपी म्हणून नोंदविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. आपल्या घरात अनधिकृत वसतिगृह चालविणारे आरोपी जीवन पाटील घोगरे तसेच त्याच्यासोबत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणाची नि:ष्पक्ष आणि सखोल चौकशी करुन दोषींना न्यायालयीन प्रक्रियेतून कठोरात कठोर शिक्षा मिळवून द्यावी. तसेच पीडित कुटुंबाला अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष शासकीय आर्थिक मदत समाज कल्याण विभागामार्फत तातडीने मिळवून देण्यात यावी. तसेच घटनेचा संपूर्ण तपास पारदर्शकपणे व्हावा यासाठी मुलीच्या मोबाईल फोनची तपासणी करून मागील एक महिन्याचा कॉल रेकॉर्ड तपासावा, ती राहत असलेल्या हॉस्टेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि पोस्टमार्टम अहवाल पूर्णपणे पारदर्शकपणे जाहीर करावा अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बळावर बहुजन समाज न्यायासाठी उभा आहे. आकांक्षा गायकवाड प्रकरणात जर प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई केली नाही, तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. या निवेदनावर बहुजन समाज पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे, जिल्हा प्रभारी ॲड. शंकरराव कापसे, लोकेश कांबळे, सटवाजी सोनकांबळे, शिवाजी सोनटक्के, जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे, जिल्हा महासचिव सुधाकर सरोदे, जिल्हाध्यक्षा (उत्तर) मायाताई पाटील, नांदेड महानगर अध्यक्ष अनिकेत आळंदीकर, उपाध्यक्ष गोविंद वाघमारे, महासचिव महेश गायकवाड, सचिव स्वप्निल कापसे, कोषाध्यक्ष नारायण घुले, विजय नवसागरे, मुकुंदा खंदारे, रमेश लोणे, दिलीप जमदाडे, उत्तम खंदारे आदींच्या सह्या आहेत.

10 hrs ago
user_Info news
Info news
Nanded, Maharashtra•
10 hrs ago
8ccfcdd4-c245-4ae8-b46e-7c1bac5353cd

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल
नांदेड:
शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला
या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.
प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
"आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
— स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते
आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    9 hrs ago
  • जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
    1
    जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे
प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    46 min ago
  • अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे
    4
    अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार
किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    9 min ago
  • मुखेड नगर परिषदेने रमजान ईद च्या वेळेपूर्वीच संपूर्ण कब्रस्तान परिसराची स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेसाठी नवीन पथदिव्य बसवण्यात यावे व दुरुस्ती करावी या मागणीसाठी मुखेड नगर परिषद येथे आज नपाचे os गिरी साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी निवेदन देताना भाई आसद बल्खी,भाई पांडुरंग लंगेवाड ,रऊफ मुल्ला,यासिर अराफत आदी उपस्थित होते
    2
    मुखेड नगर परिषदेने रमजान ईद च्या वेळेपूर्वीच संपूर्ण कब्रस्तान परिसराची स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेसाठी नवीन पथदिव्य बसवण्यात यावे व दुरुस्ती करावी
या मागणीसाठी मुखेड नगर परिषद येथे आज नपाचे os गिरी साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी निवेदन देताना भाई आसद बल्खी,भाई पांडुरंग लंगेवाड ,रऊफ मुल्ला,यासिर अराफत आदी उपस्थित होते
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    40 min ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.