logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सर्व शासकीय कार्यालयाच्या कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी मुंबई महानगर क्षेत्रातील महिला अधिकारी/कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थिती: लवचिकतेच्या सवलतीबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जीडी-३२०३६/९४/२०२३-जीडी(रवका-१) (संगणक क्र.५५९१६८). मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई, पिन ४०० ०३२. दिनांक : १० मार्च, २०२६. संदर्भ : १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण २०१४/प्र.क्र.८०/१८ (रवका), दि.३१/१२/२०१४. २) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण २०१४/प्र.क्र.८०/१८ (रवका), दि.३१/०८/२०१६. ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.समय २०१८/प्र.क्र.६२/१८ (रवका), दि.२४/०२/२०२०. ४) शासन निर्णय क्रमांक जीडी-३२०३६/९४/२०२५-जीडी (रवका-१), दि.१६ जुलै, २०२५. प्रस्तावना सर्व शासकीय कार्यालयाच्या कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी आहे. मंत्रालयीन अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीबाबत ६० मिनिटांची लवचिकता संदर्भीय शासन निर्णय क्र.१, दि.३१/१२/२०१४ अन्वये अनुज्ञेय केली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा प्रवासांचा दीर्घ वेळ तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील सकाळी व सायंकाळी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेऊन मुंबई महानगर क्षेत्रातील महिला अधिकारी/कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थितीत लवचिकता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय १) मुंबई महानगर क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला शासकीय अधिकारी/कर्मचारी सकाळी ९.१५ वाजेपासून सकाळी ९.४५ पर्यंत जेवढी मिनिटे कार्यालयात लवकर येऊन कामकाज करतील अशा महिलांना तेवढीच मिनिटे सायंकाळी कार्यालय लवकर सोडण्याची [जास्तीत जास्त अर्धा तासाची (३० मिनिटे) (Come early – Go early)] सवलत देण्यात येत आहे. २) शासकीय कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता संबंधित शासकीय महिला अधिकारी/कर्मचारी यांनी घेणे अनिवार्य राहील. ३) कामकाजाचे महत्व विचारात घेऊन (जसे विधानमंडळ कामकाज, न्यायालयीन प्रकरणे इत्यादी) शासकीय महिला अधिकारी/कर्मचारी यांनी आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेनंतर थांबणे बंधनकारक राहील. ४) कार्यालयीन कामकाजाची तातडी विचारात घेता वरिष्ठ अधिकारी/कार्यालय प्रमुख यांनी विशिष्ट दिवशीच्या कामकाजाबाबत विनिर्दिष्टपणे सूचना दिल्यास त्या सूचना संबंधित महिला अधिकारी/कर्मचारी यांना बंधनकारक राहतील. २. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०३१०१६३९९१५०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

2 hrs ago
user_Ganesh Ekandwar jawala
Ganesh Ekandwar jawala
ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
2 hrs ago
95a77a8c-33d8-4f4e-bc68-349ca1fe0efb

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा जवळा (ता. आर्णी) : प्रतिनिधी बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. आशाताई जाधव या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नम्रताताई विनोद पंचभाई, सौ. रुचिका गणेश एकंडवार, सौ. हर्षला अनिल चौधरी आणि सौ. परमजीत अमोल मुजमुले उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन सौ. मायाताई भीमराव मुजमुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. नम्रताताई पंचभाई यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच सौ. परमजीतताई मुजमुले यांनी भारतीय संविधानात महिलांना दिलेल्या अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सौ. आशाताई जाधव यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित करत समाजात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच भीमराव मुजमुले यांनीही आपले विचार मांडत उपस्थित पाहुण्यांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मीनाबाई मुजमुले यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
    1
    बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
जवळा (ता. आर्णी) : प्रतिनिधी
बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. आशाताई जाधव या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नम्रताताई विनोद पंचभाई, सौ. रुचिका गणेश एकंडवार, सौ. हर्षला अनिल चौधरी आणि सौ. परमजीत अमोल मुजमुले उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन सौ. मायाताई भीमराव मुजमुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. नम्रताताई पंचभाई यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच सौ. परमजीतताई मुजमुले यांनी भारतीय संविधानात महिलांना दिलेल्या अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात सौ. आशाताई जाधव यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित करत समाजात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच भीमराव मुजमुले यांनीही आपले विचार मांडत उपस्थित पाहुण्यांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मीनाबाई मुजमुले यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
    user_Ganesh Ekandwar jawala
    Ganesh Ekandwar jawala
    ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • दारव्हा तालुक्यातील लाखखिंड परिसरात एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मोहीम सकाळी ११. ०० वाजता सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाखखिंड येथील शेतकरी रमेश जाधव यांचे तीवरी रोडलगत शेत आहे. सोमवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास रमेश जाधव शेतात गेले असता विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती दारव्हा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम सुर राबविण्यात आली.वन विभागाकडून बिबट्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चऱ्हाटे यांनी सांगितले.
    1
    दारव्हा तालुक्यातील लाखखिंड परिसरात एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मोहीम सकाळी ११. ०० वाजता सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाखखिंड येथील शेतकरी रमेश जाधव यांचे तीवरी रोडलगत शेत आहे. सोमवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास रमेश जाधव शेतात गेले असता विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसून आला.
ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
दरम्यान, घटनेची माहिती दारव्हा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम सुर राबविण्यात आली.वन विभागाकडून बिबट्याला  पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चऱ्हाटे यांनी सांगितले.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
    1
    जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    22 hrs ago
  • # पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप#news#nandednews#kinwatnews#nandedpolice#spabinashkumar#cmdevendrfadanwis#cmomaharashtra
    1
    # पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप#news#nandednews#kinwatnews#nandedpolice#spabinashkumar#cmdevendrfadanwis#cmomaharashtra
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by सारनाथ अवचार
    1
    Post by सारनाथ अवचार
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    44 min ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer Karanja, Washim•
    22 hrs ago
  • अवकाळी पावसाच्या धास्तीने हिमायतनगर शहर व तालुका परिसरात गहू काढणीला वेग आला आहे. 🌾 वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकरी घाईगडबडीत गहू काढणी करत आहेत. मजूर टंचाईमुळे अनेक ठिकाणी हार्वेस्टरच्या माध्यमातून काढणी केली जात असून प्रति एकर सुमारे २००० रुपये खर्च येत आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतांतील गहू आडवा पडल्याने उत्पादनात घट होत आहे. मेहनत आणि खर्च वाढूनही उतारा कमी येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. #Himayatnagar #WheatHarvest #FarmersIssue #UnseasonalRain #MaharashtraFarmers AgricultureNews FarmerProblems HarvestSeason 🌾
    1
    अवकाळी पावसाच्या धास्तीने हिमायतनगर शहर व तालुका परिसरात गहू काढणीला वेग आला आहे. 🌾
वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकरी घाईगडबडीत गहू काढणी करत आहेत. मजूर टंचाईमुळे अनेक ठिकाणी हार्वेस्टरच्या माध्यमातून काढणी केली जात असून प्रति एकर सुमारे २००० रुपये खर्च येत आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतांतील गहू आडवा पडल्याने उत्पादनात घट होत आहे. मेहनत आणि खर्च वाढूनही उतारा कमी येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
#Himayatnagar #WheatHarvest #FarmersIssue #UnseasonalRain #MaharashtraFarmers AgricultureNews FarmerProblems HarvestSeason 🌾
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.