logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून होत असलेल्या चौफेर विकास कामांमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासाला मोठी चालना मिळत असल्याचे मत राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट दिली असता, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची रेखीव प्रतिमा, कृपावस्त्र आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उद्योगमंत्र्यांसमवेत खासदार ज्योतीताई वाघमारे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना सो.म.पा. नगरसेवक अमोल बापू शिंदे, प्रियदर्शन साठे, शिवसेनेचे महेश साठे, संजय पाटील, मनीष काळजे उपस्थित होते. तसेच न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, पुरोहित सोमकांत कुलकर्णी, निखील पाटील, प्रवीण घाटगे, बाळासाहेब पोळ, दत्ता मोरे, दत्ता माने, शुभम सावंत, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी आणि भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

5 hrs ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
db51c16e-c898-47d5-bc61-8754c2e51644

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून होत असलेल्या चौफेर विकास कामांमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासाला मोठी चालना मिळत असल्याचे मत राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट दिली असता, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची रेखीव प्रतिमा, कृपावस्त्र आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उद्योगमंत्र्यांसमवेत खासदार ज्योतीताई वाघमारे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना सो.म.पा. नगरसेवक अमोल बापू शिंदे, प्रियदर्शन साठे, शिवसेनेचे महेश साठे, संजय पाटील, मनीष काळजे उपस्थित होते. तसेच न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, पुरोहित सोमकांत कुलकर्णी, निखील पाटील, प्रवीण घाटगे, बाळासाहेब पोळ, दत्ता मोरे, दत्ता माने, शुभम सावंत, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी आणि भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमधील ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मूलभूत हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. महांतेश लक्ष्मण हत्तूरे (मु. आळगे, ता. अक्कलकोट) यांनी या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाकडून मूलभूत सुविधा पुरवण्यात सतत अपयश येत असल्याचा आरोप करत, महाजन आयोगाच्या शिफारशींनुसार अक्कलकोट व दक्षिण सोलापूरमधील काही भागाचा कर्नाटकात समावेश करण्याचा विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या मागणीसाठी आता ग्रामसभांमधून रीतसर ठराव मंजूर करून ते थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवले जाणार असल्याचे महांतेश हत्तूरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, सर्व सुविधा मिळेपर्यंत आंदोलनाची ही भूमिका कायम ठेवली जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
    1
    सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमधील ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मूलभूत हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. महांतेश लक्ष्मण हत्तूरे (मु. आळगे, ता. अक्कलकोट) यांनी या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाकडून मूलभूत सुविधा पुरवण्यात सतत अपयश येत असल्याचा आरोप करत, महाजन आयोगाच्या शिफारशींनुसार अक्कलकोट व दक्षिण सोलापूरमधील काही भागाचा कर्नाटकात समावेश करण्याचा विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

या मागणीसाठी आता ग्रामसभांमधून रीतसर ठराव मंजूर करून ते थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवले जाणार असल्याचे महांतेश हत्तूरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, सर्व सुविधा मिळेपर्यंत आंदोलनाची ही भूमिका कायम ठेवली जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये स्वतःचेच गुण कमी असताना गुरुजनांना मार्गदर्शन करण्याच्या स्थितीवर उपरोधिक प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आमचे स्वतःचेच मार्क कमी आहेत, तर आम्ही तुम्हा गुरुजनांना काय मार्गदर्शन करावे, असा थेट सवाल करत या परिस्थितीवर तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
    1
    लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये स्वतःचेच गुण कमी असताना गुरुजनांना मार्गदर्शन करण्याच्या स्थितीवर उपरोधिक प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आमचे स्वतःचेच मार्क कमी आहेत, तर आम्ही तुम्हा गुरुजनांना काय मार्गदर्शन करावे, असा थेट सवाल करत या परिस्थितीवर तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
    1
    उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दररोज सकाळी जगाच्या कल्याणासाठी आणि मानवतेसाठी संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक प्रार्थना "पसायदान" म्हटली जाते. मात्र, या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षित शाळा इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे मिळतील काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून निधीचे "दान" मिळेल काय, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे।
    1
    बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दररोज सकाळी जगाच्या कल्याणासाठी आणि मानवतेसाठी संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक प्रार्थना "पसायदान" म्हटली जाते. मात्र, या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षित शाळा इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे मिळतील काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून निधीचे "दान" मिळेल काय, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे।
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    पाटोदा, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.
    1
    अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सोलापूर येथील रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी अभिनेते अरबाज शेख यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या भेटीदरम्यान चिवटे यांनी तेथील उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून शेख यांच्या उपचारांबाबत सविस्तर माहिती घेतली आणि त्यांची योग्य ती काळजी घेण्याची विनंती प्रशासनाला केली. यासोबतच, त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून (CM Relief Fund) जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत.
    1
    सोलापूर येथील रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी अभिनेते अरबाज शेख यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या भेटीदरम्यान चिवटे यांनी तेथील उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून शेख यांच्या उपचारांबाबत सविस्तर माहिती घेतली आणि त्यांची योग्य ती काळजी घेण्याची विनंती प्रशासनाला केली. यासोबतच, त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून (CM Relief Fund) जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळल्याने काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याला अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
    1
    मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळल्याने काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.

या दुर्घटनेनंतर घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याला अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.