जालना - धक्कादायक घटना – गोठ्याला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान धक्कादायक घटना – गोठ्याला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथे अज्ञात व्यक्तीने गोठ्याला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी शिवाजी साहेबराव वरगणे यांच्या गोठ्यात ही आग लागली. या आगीत जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा व भुस पूर्णतः जळून खाक झाला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जाफराबाद नगरपंचायत अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सावंगी परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

- जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..1
- भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक1
- भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।7
- मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.1
- प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.1
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- Post by AapTak Hindi News Channel1
- जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.1