logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानातून युवकांनी प्रेरणा घ्यावी – पंडित अवचार जागतिक कीर्तीचे प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त 1 ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठीतील विविध ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक पंडित अवचार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानावर मार्गदर्शन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींमधून समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण झाले असून, त्यांच्या लेखनातून युवकांनी प्रेरणा घेऊन लेखनाकडे वळावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, गजानन शिंदे, संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, शंभोनाथ दुभळकर, डिगंबर झुंजारे तसेच ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठी भाषेतील विविध विषयांवरील दर्जेदार ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरू नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे सर्वांसाठी खुले आहे. नागरिक, विद्यार्थी, युवक, साहित्यप्रेमी तसेच वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा आणि अधिकाधिक नागरिकांनी जिल्हा ग्रंथालयाचे सभासद होऊन वाचन संस्कृतीला चालना द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

8 hrs ago
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
8 hrs ago
6cad1d11-a5d1-4d42-b883-7cd7e9795e1a

लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानातून युवकांनी प्रेरणा घ्यावी – पंडित अवचार जागतिक कीर्तीचे प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त 1 ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठीतील विविध ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक पंडित अवचार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानावर मार्गदर्शन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींमधून समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण झाले असून, त्यांच्या लेखनातून युवकांनी प्रेरणा घेऊन लेखनाकडे वळावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, गजानन शिंदे, संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, शंभोनाथ दुभळकर, डिगंबर झुंजारे तसेच ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठी भाषेतील विविध विषयांवरील दर्जेदार ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरू नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे सर्वांसाठी खुले आहे. नागरिक, विद्यार्थी, युवक, साहित्यप्रेमी तसेच वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा आणि अधिकाधिक नागरिकांनी जिल्हा ग्रंथालयाचे सभासद होऊन वाचन संस्कृतीला चालना द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे.  जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे.  हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. 
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. 
हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    1
    महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    1
    पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! 
पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा!
#Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर
    1
    उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन 
उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • उमरखेड आगाराला मोठी भेट! पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या. नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रवाशांच्या अपेक्षा काय? दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात. वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी. सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. "नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    3
    उमरखेड आगाराला मोठी भेट!

पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन

महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा
उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या.
नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रवाशांच्या अपेक्षा काय?
दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात.
वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी.
सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा
सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
"नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 day ago
  • ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले.  या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    2
    ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न



मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. 
या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती माहूरगड प्रतिनिधी: धनंजय आराध्ये श्रीक्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय शिखर संस्थानाचे श्री श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज (गुरु मधुसूदन भारती) यांच्या शुभहस्ते पहाटे श्री दत्तात्रेय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधीपूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. या धार्मिक विधींचे पुरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले. यानंतर श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथीवाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित संत-महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलविली. या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक जी. एन. नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अखेरीस "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", "देवदत्त श्री दत्तात्रय महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
    1
    गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती
गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती
माहूरगड प्रतिनिधी: धनंजय आराध्ये 
श्रीक्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय शिखर संस्थानाचे श्री श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज (गुरु मधुसूदन भारती) यांच्या शुभहस्ते पहाटे श्री दत्तात्रेय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधीपूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. या धार्मिक विधींचे पुरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले.
यानंतर श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथीवाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित संत-महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलविली.
या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक जी. एन. नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सोहळ्याच्या अखेरीस "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", "देवदत्त श्री दत्तात्रय महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
    user_सक्षम महाराष्ट्र न्यूज
    सक्षम महाराष्ट्र न्यूज
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    1 day ago
  • माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती
    1
    माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती
माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.